7वी समाज विज्ञान
प्रकरण 3 – युरोपियनांचे भारतात आगमन
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2022 सुधारित
विषय – स्वाध्याय
अभ्यास
1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. भारतात व्यापारासाठी समुद्रमार्गाने सर्वप्रथम आलेले युरोपियन कोण ?
उत्तर – पोर्तुगीज हे भारतात व्यापारासाठी समुद्रमार्गाने सर्वप्रथम आलेले युरोपियन होय.
2. भारतातील पोर्तुगीजांच्या व्यापारी केंद्रांची नावे लिहा.
उत्तर – गोवा,दीव-दमण,साल्सेट,बेस्सीन, चौल, मुंबई, सॅनथोम,हुगली येथे भारतातील पोर्तुगीजांची व्यापारी केंद्रे होती.
3. भारतामध्ये आलेली इंग्लिश व्यापारी संस्था कोणती ?
उत्तर – इस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये आलेली इंग्लिश व्यापारी संस्था होय.
4. ‘दस्तक’ म्हणजे काय ?
उत्तर -‘दस्तक’ म्हणजे इंग्रज व्यापाऱ्यांना करमुक्त व्यापार करण्यासाठी दिलेला विशेष परवाना होय.