6th SS Textbook Solution 1.3 Kalaburagi Devision 1.आपले गौरवशाली राज्य कर्नाटक 1.3 कलबुरगी विभाग



6वी समाज विज्ञान 

प्रकरण 2 – आपले गौरवशाली राज्य कर्नाटक

(1.3 कलबुरगी विभाग)



इयत्ता – सहावी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 2 – आपले गौरवशाली राज्य कर्नाटक

(1.3 कलबुरगी विभाग)



रिकाम्या जागा भरा.

  1. विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.
  2. कलबुर्गी विभागातील जिल्ह्यांना 1956 साली स्वातंत्र्य मिळाले.
  3. कलबुर्गी विभागातील हट्टी येथे सोन्याची खाण आहे.
  4. बळ्ळारी जिल्ह्यामध्ये दारोजी प्राणी संग्रहालय आहे.
  5. कर्नाटक केंद्रीय विश्वविद्यालय कलबुरगी येथे आहे.
  6. विजयनगर जिल्ह्यामधील हंपीमधील विश्वविद्यालयाचे नांव कन्नड विश्वविद्यालय आहे.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये कलबुरगी विभागातील जिल्ह्यांना विशेष स्थान दिले आहे?

उत्तर – संविधानातील कलम 371 (J) नुसार कलबुरगी विभागातील जिल्ह्यांना विशेष स्थान दिले आहे.

2) निजाम संस्थान कोणत्या साली भारतात विलीन झाले?

उत्तर -निजाम संस्थान 1948 मध्ये भारतात विलीन झाले.

3) विजयनगर जिल्हयातील हंपी ही कोणत्या राजवंशाची राजधानी होती ?

उत्तर -विजयनगर जिल्हयातील हंपी ही विजयनगर राजवंशाची राजधानी होती.

4) विजयनगर आणि बहामनी राज्यांच्या पतनानंतर राज्यकारभार
केलेल्या दोन पाळेगारांची नांवे लिहा
?

उत्तर -विजयनगर आणि बहामनी राज्यांच्या पतनानंतर हरपणहळ्ळी,जरीमले, संडुरू आणि सुरपूरचे नायक इत्यादी पाळेगारांनी राज्य केले.




5) कलबुर्गी विभागातील प्रमुख दोन नद्या कोणत्या ?

उत्तर -कलबुर्गी विभागातील प्रमुख नद्या म्हणजे भीमा,तुंगभद्रा,कृष्णा,मुल्लमारी, बेण्णेतोर इत्यादी होय.

6) बिदर जिल्हयातील एका धरणाचे नांव लिहा.

उत्तर -बिदर जिल्ह्यातील कारंज हे धरण प्रसिद्ध आहे.

7) बळ्ळारी,विजयनगर आणि रायचूरू जिल्हयांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाचे नांव लिहा.

उत्तर – बळ्ळारी,विजयनगर आणि रायचुरू जिल्ह्यांना तुंगभद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

8) कलबुरगी विभागातील प्रमुख उद्योगांची नावे लिहा.

उत्तर – कलबुरगी विभागामध्ये लोखंड आणि पोलाद कारखाने, साखर कारखाने,सिमेंट कारखाने आणि दगडी कोळश्यापासून तयार होणारी विद्युत केंद्रे इत्यादी प्रमुख उद्योगधंदे आहेत.

9) कलबुरगी विभागातील कोणत्या जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजाच्या खाणी आहेत ?

उत्तर -कलबुरगी विभागातील बळ्ळारी आणि कोप्पळ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजांच्या खाणी आहेत.

10) कलबुरगीमधील प्रसिध्द दर्ग्याचे नांव काय?

उत्तर – कलबुरगीमध्ये ख्वाजा बंदेनवाज हा प्रसिध्द दर्गा आहे.

11) कलबुरगी विभागात प्राचीन काळात रचना केलेल्या दोन काव्यांची नांवे लिहा.

उत्तर – कलबुरगी विभागात प्राचीन काळात रचना केलेल्या दोन काव्यांची नांवे –

1. कविराज मार्ग

2. विक्रमार्जुन विजय

12) वचन चळवळीबद्दल माहिती लिहा.

उत्तर – बाराव्या शतकात कर्नाटकात उदयास आलेली महत्वाची समाजसुधारणा म्हणजे वचन चळवळ होय.या चळवळीमध्ये सर्व बाबतीत असमानतेचा तिरस्कार केला. या चळवळीने अस्पृश्यतेचा विरोध केला.(या चळवळीचे प्रमुख नेते जगद्गुरु बसवेश्वर हे होय.)

13) दास साहित्यामध्ये साधना केलेल्या दोन श्रेष्ठ दासांची नांवे लिहा.

उत्तर – दास साहित्यामध्ये साधना केलेल्या दोन श्रेष्ठ दासांची नांवे – 

1. पुरंदरदास 

2.कनकदास

14) कलबुरगी विभागातील लोकनृत्यांची नांवे लिहा.

उत्तर – कलबुरगी विभागातील लोकनृत्यांची नांवे खालीलप्रमाणे –

नंदी बैलाचे नृत्य

आल्लावा नृत्य

चौडंम्माचे नृत्य

लमानी नृत्य

टिपरी नृत्य

दुरगु – मुरगी (लाड लक्ष्मी)



15) या विभागातील रायचूर जिल्हयात असलेली विश्वविद्यालये कोणती ?

उत्तर – कलबुर्गी विभागातील रायचूर जिल्ह्यात कर्नाटक केंद्रीय विश्वविद्यालय,कृषी विश्व विद्यालय इ.
विद्यालये आहेत.

16) बळ्ळारी जिल्हयातील दोन विश्वविद्यालये कोणती ?

उत्तर – बळ्ळारी जिल्हयातील दोन विश्वविद्यालये खालील प्रमाणे-

1.विजयनगर श्री कृष्णदेवराय विश्वविद्यालय

2. कन्नड विश्वविद्यालय



17) कन्नड विश्वविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर – कन्नड विश्वविद्यालय बळ्ळारी जिल्ह्यातील हंपी या ठिकाणी आहे.

18) कलबुरगी विभागातील स्वातंत्र्य चळवळी बरोबर आणखीन दोन चळवळी सुरू होत्या त्या कोणत्या ?

उत्तर – कलबुरगी विभागातील स्वातंत्र्य चळवळी बरोबर आणखीन दोन चळवळी सुरू होत्या त्या म्हणजे

1. वाचनालय चळवळ

2. केंद्रीय शाळा स्थापन चळवळ

19) निजामाच्या खाजगी सेनेचे नांव काय ?

उत्तर – निजामाच्या खाजगी सेनेचे नांव रजाकार असे होते.

20) कलबुरगी विभागात स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून सुरू
झालेल्या दोन राष्ट्रीय शाळांची नावे लिहा.

उत्तर – कलबुरगी विभागात स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून सुरू झालेल्या दोन राष्ट्रीय शाळांची नावे

1. नूतन विद्यालय कलबुरगी (1907)

2. विद्यानंद गुरुकुल,कुकनूर (1922)

 

21) हैदराबादचे निजाम संस्थान कोणत्या तारखेस भारतात विलीन झाले?

उत्तर – हैदराबादचे निजाम संस्थान 17 सप्टेंबर 19४८ रोजी भारतात विलीन झाले.

22) कलबुरगी विभागातील प्रमुख नेत्यांची नांवे काय?

उत्तर – कलबुरगी विभागातील प्रमुख नेत्यांची नांवे- श्री रामानंद तीर्थ,सरदार शरणगौडा इनामदार, महागावचे चंद्रशेखर पाटील आणि कल्याणशेट्टी….इ.


 


 

 

 




Share your love

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *