सेतूबंध हा कार्यक्रम वैज्ञानिक,अचूक आणि वस्तुनिष्ठ असला पाहिजे.तो एक प्रक्रिया म्हणून न घेता, मागील वर्गातील अध्ययन आणि पुढील वर्गातील अध्ययन यांना जोडण्याचा प्रयत्न असावा आणि विद्यार्थ्याची प्राप्त सामर्थ्ये समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समस्या विद्यार्थ्यामध्ये किंवा शिक्षकांमध्ये असू शकते.ती समस्या किंवा कमतरता शोधण्याचे प्रयत्न सेतुबंधासारख्या कार्यक्रमाने शक्य झाले पाहिजे.त्यामुळे ही प्रक्रिया अधिक बळकट केली पाहिजे.या संदर्भात सेतुबंधाचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले तर काही अध्ययनातील अडथळे टाळता येतील आणि अध्ययनाची सोय करता येईल.
सेतूबंध म्हणजे काय?
सद्या शिकण्यास आवश्यक अध्ययनांश किंवा अध्ययन निष्पत्तीस संबंधीत पूरक अध्ययन सामर्थ्य किंवा अध्ययनांश जोडणे.मुलांची शिकण्याची पातळी, त्यांची क्षमता ओळखणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करणे हा एक क्रियाकलाप आहे. थोडक्यात मुलांनी जे शिकले आहे आणि जे शिकत आहेत त्यात परस्परसंबंध निर्माण करणे म्हणजे सेतुबंध म्हणता येईल.
सेतुबंधचे टप्पे कोणकोणते? (Steps of bridge course)
⇒`नैदानिक (पूर्व) परीक्षे’चे नियोजन आणि आयोजन
⇒प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाचे /अध्ययन कमतरतेचे विश्लेषण करणे.
⇒परिहार बोधन नियोजन आणि अंमलबजावणी
⇒साफल्य परीक्षेद्वारे पुन्हा एकदा प्राप्त सामर्थ्य तपासणे.
⇒येथे प्रामुख्याने नैदानिक (पूर्व) परीक्षा आणि साफल्य परीक्षा अशी दोन साधने आहेत.सेतुबंध कार्यक्रमानंतर ज्या विद्यार्थ्याने क्षमता गाठली नाही,अशा विद्यार्थ्याना निरंतर परिहार बोधन अध्यापनाचे नियोजन करावे.
Bridge Course Pre Test Sub MARATHI CLASS 5
सेतुबंध पूर्व परीक्षा
इयत्ता – पाचवी
विषय – मराठी
तोंडी परीक्षा
1. तुम्हाला माहीत असलेली कोणतीही एक प्रार्थना म्हणा.
2. नाटकातील हा संवाद सादर करा.
शून्य: अरे, मी आहे म्हणून तुम्ही मोठेपणा सांगता,
पण तुम्ही लक्षात घ्या की या खुर्चीवर बसण्याचा मान फक्त माझाच आहे.
एक: ए ऽ ऽ ऽ काहीतरी बोलू नकोस, मीच मोठा आहे. या खुर्चीवर बसण्याचा मान माझा.
शून्य : तो कसा काय बुवा !
3. खालीलपैकी एका बद्दल सांगा.
1) आमच्या गावची जत्रा
2) माझे कुटुंब.
4. तुम्ही वाचलेले कोणतेही विनोद सांगा.
5. खाली दिलेल्या पर्यायांमधून ‘दिवस‘ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा,
अ. रात्र ब. संध्याकाळ क.सकाळ ड. दुपार
6. कोडे ओळखा.
1) सुपले कान खांबासारखे पाय
शेपटी बारीक सांगा मी कोण ?
7. नमक्सार (या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द सांगा.)
8. शब्दकोशाप्रमाणे लिहा. ऋषी , ईश्वर , औषध
9. दिलेली अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
यं र क भ
10. अनुलेखन करा.(शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील लिखाण लिहिण्यास सांगणे.)
जिजाबाईंनी शिवाजीला वीर आणि सद्गुणांच्या कथा सांगून एक योद्धा म्हणून तयार केले.
लेखी परीक्षा
11.खालील वाक्यातील चुका शोधून वाक्य लिहा.
“राजाणे सिपायांना बोलावले.”
12. आम्हासनी पेरू पायजे. (हे वाक्य प्रमाण मराठीत लिहा.)
13. बक्षीस (या शब्दाचा वाक्यात उपयोग करा.)
14. गरज सरो नि …. मरो.(म्हण पूर्ण करा.)
15. लिंग बदला. राजा –
16. गटात न जुळणारा शब्द लिहा.
शिक्षक , शाळा , घर , फळा
17. आहे / रोप / तुळशीचे / मी / आणले. ( वाक्य अर्थपूर्ण पद्धतीने लिहा.)
18. उतारा वाचून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा.
महाराष्ट्रातले पुणे हे शहर पूर्वीपासून ज्ञानाचे माहेरघर. विचारवंतांचे शहर, ऐतिहासिक महत्त्वाचे शहर. भारतात अनेक जुन्या चालीरीती, अंधश्रद्धा होत्या. त्यांचे निर्मूलन करून नवीन परंपरा निर्माण करणारे शहर म्हणून ओळखले जाते. याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
प्रश्न – शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
19. तुम्ही भारताचे पंतप्रधान झाला तार काय कराल? याविषयी 4 वाक्ये लिहा.
20. कोडे सोडवा.
सुपले कान खांबासारखे पाय
शेपटी बारीक सांगा मी कोण?