सेतुबंध साफल्य परीक्षा
इयत्ता – पाचवी
विषय – गणित
लेखी परीक्षा
1.दिलेल्या आकृतीच्या छायांकित भागाचे
क्षेत्रफळ काढा. (प्रत्येक चौरस 1 सेमी आहे)
2. दोन हजार दोनशे दहा संख्या रूपात लिहा.
3.4,796, 2,150, 8,712, 6,020 या संख्या
उतरत्या क्रमात लिहा.
खालील जोड्या जुळवा आणि लिहा.
अ ब
4. 6,896+1,780 5,056
5. 8,708-2,984 8,676
6. 632×8 544
7. 4,896÷9 5,724
8.4,326 या संख्येत सहस्त्र स्थानाची
अंदाजे किंमत लिहा.
9. कैवार वापरून वर्तुळ काढा आणि वर्तुळ
केंद्र दाखवा.
10. 4/8 अपूर्णांक आकृतीमध्ये
दर्शवा.
11. अनिलचे वजन 45 किलो आहे.अस्लमचे वजन त्याच्यापेक्षा 3
किलो जास्त असल्यास अस्लमचे वजन किती?
12. तुमच्या शहरापासून शेजारच्या गावापर्यंतचे
अंतर…… मोजतात.
अ) मिलिमीटर आ)
सेंटीमीटर इ) मीटर ई) किलोमीटर.
13. 6000 ग्रॅम =………………
कि.ग्रॅ.
14. साध्या सममितीय आकृत्यांची रचना पूर्ण
करा.
तोंडी परीक्षा
15. एका
पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे, एका
पेनची किंमत 50 रुपये आहे,हातबॅगची किंमत 20 रुपये
आहे आणि शाळेच्या बॅगची किंमत 130 रुपये आहे तर सर्व वस्तूंची एकूण किंमत किती होईल?
16. घड्याळानुसार
वेळ सांगा, (शिक्षक घड्याळ दाखवतात आणि मुलांना वेळ सांगायला
सांगतात.) (तोंडी)
17. रात्री 8 वाजताची
वेळ 24 तासांमध्ये
सांगा.
18. वर्ष 2020 मध्ये
किती दिवस होते?
19. शिक्षक
आलेख पेपरवर काढलेला आलेख दाखवतात आणि विद्यार्थ्यांना आलेख बघून प्रश्नांची
उत्तरे देण्यास सांगतात. (प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारा) (तोंडी)
प्रमाण
– 1 सेमी = 5 विद्यार्थी
1) स्तंभा
लेखात कोणते मुद्दे दाखविले आहेत?
2) कोणत्या
स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे?
3) कोणत्या
स्पर्धेत सर्वात कमी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता?
4) एकूण 4 स्पर्धांमध्ये
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे?
5) वादविवाद
स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा यांची तुलना करता कोणत्या स्पर्धेत जास्त विद्यार्थी सहभागी झाले?
20) शिक्षक
घनाकृती दाखवतील आणि त्यांचे नाव सांगण्यास सांगतील आणि त्यातील कडा, शिरोबिंदू
इत्यादी विचारतील. (तोंडी)