Subject – Marathi
Topic – Grammar
Samas ani Samasache prakar
समास
दोन शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे किंवा प्रत्यय लोप पावून त्या दोन शब्दाचा जो एकत्र संयोग होतो त्यास समास म्हणतात.
सामासिक शब्द
समासातील शब्दांचा संबंध स्पष्ट करून सांगण्याच्या पद्धतीस समासाचा विग्रह असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.
समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.
1)अव्ययीभाव समास
2) तत्पुरुष समास
3) द्वंद्व समास
4) बहुव्रीही समास.
3) द्वंद्व समास
4) बहुव्रीही समास.
1) अव्ययीभाव समास -:
ज्या सामासिक शब्दामध्ये दुसऱ्या पदाचा अर्थ पहिल्या पदाने मर्यादीत केलेला असतो. तेव्हा अव्ययीभाव समास होतो.
यामध्ये पहिल्या पदाला अधिक महत्व असते. पहिला पदाचा अर्थ प्रत्येक, पर्यंत असा असतो.
उदा. दररोज, हरघडी, आजन्म, घरोघर, बिनतक्रार.
उदा. दररोज, हरघडी, आजन्म, घरोघर, बिनतक्रार.
2) तत्पुरुष समास :-
ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करतांना दुसऱ्या पदाला महत्व दिले जाते, व प्रथमपद गौण असते. त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे प्रकार
तत्पुरुष समासाचे प्रकार पुढीलप्रमाणे-
1) विभक्ती तत्पुरूष समास
2) उपपद तत्पुरूष समास
3) नञ् तत्पुरूष समास
4) कर्मधारय समास
5) द्विगु समास
6) मध्यमपदलोपी असे उपप्रकार आहेत. समास
उदा. राजवाडा, नीलकमल, पुरणपोळी, पंचवटी, विद्याधन.
उदा. राजवाडा, नीलकमल, पुरणपोळी, पंचवटी, विद्याधन.
तत्पुरुष समास म्हणतात.
तत्पुरुष समासाचे चार प्रकार पुढीलप्रमाणे-
1) विभक्ती तत्पुरूष :-
तत्पुरुष समासात अर्थदृष्ट्या गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द विग्रहामध्ये घालावा लागतो त्या समासास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा. दुःखप्राप्त दुखाला प्राप्त – तोंडपाठ तोंडाने पाठ
पोळपाट- पोळीसाठी पाठ बालमित्र बालपणापासूनचा मित्र
राजपुत्र -राजाचा पुत्र
वनभोजन – वनातील भोजन
उदा. दुःखप्राप्त दुखाला प्राप्त – तोंडपाठ तोंडाने पाठ
पोळपाट- पोळीसाठी पाठ बालमित्र बालपणापासूनचा मित्र
राजपुत्र -राजाचा पुत्र
वनभोजन – वनातील भोजन
2) नञ् तत्पुरुष समास –
ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते. त्यास ‘नञ् तत्पुरुष’ असे म्हणतात.
या समासात ‘अ, अन्, न, ना, नि, बे, गैर’ अशी अभाव किंवा निषेध दर्शविणारी पहिली पदे येतात.
उदा : अयोग्य-योग्य नव्हे ते,
अनादर – आदर नसलेला.
नापसंत – पसंत नाही ते
नावड -आवड नसलेले
3) उपपद तत्पुरुष समास :
ज्यात समासामध्ये दुसरे पद धातुसाधित किंवा कृदन्त असते. त्या समासाला ‘उपपद’ तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
उदा :
पंकज – पंकात जन्मणारे ते,
ग्रंथकार ग्रंथ लिहितो तो.
4) कर्मधारय तत्पुरुष समास :-
तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा कर्मधारय समास होतो.
उदा. महादेव = महान असा देव
वेषांतर= दुसरा वेष
कमलनयन = कमलासारखे डोळे.
5) द्विगु तत्पुरुष समास–
कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविशेषण असते. त्यास द्विगु समास म्हणतात (एकवचनी असतो)
उदा. –
1) पंचवटी – पाच वडांचा समूह
2) नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
6) मध्यमपदलोपी तत्पुरुष समास :-
सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्याला मध्यमपदलोपी समास म्हणतात.
उदा. :- 1) पुरणपोळी – पुरण भरून तयार केलेली पोळी.
2) साखरभात- साखर घालून तयार केलेला भात.
3) चुलतसासरा – नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा
3) द्वंद्व समास :-
यात दोन्ही पदे महत्वाची असतात.
यात समासाचा विग्रह करताना दोन पदाचा संबंध आणि, व, अथवा, किंवा अशा उभयान्वयी अव्ययांनी स्पष्ट करावा लागतो.
उदा.
मातापिता – माता आणि पिता
पापपुण्य – पाप अथवा पुण्य
न्यायान्याय – न्याय किंवा अन्याय
मीठभाकर मीठ भाकरी व इतर साधे पदार्थ
चहापाणी चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
4) बहुव्रीही समास :-
ज्या समासिक शब्दांतील दोन्ही पदावरून तिसऱ्याच एखाद्या वस्तूचा अर्थ सूचीत होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा. गजानन, चौकोन, मृगनयना, सार्थ, अष्टपैलू.
बहुव्रीही समास :- यात दोन्ही पदे गौण असून ही दोन्ही पदे मिळून निराळ्याच गोष्टीचा बोध होतो.त्यास बहुव्रीही समास म्हणतात.
1) लंबोदर – लंब आहे उदर ज्यांचे तो – गणपती.
2) नीलकंठ – नीळा असा कंठ असलेला -शंकर
3) जिनेंद्रिय – जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो -मारुती
पुढील समासांचा विग्रह करून त्याची नावे द्या.
1) यथान्याय- न्यायाप्रमाणे – अव्ययीभाव समास
2) आमरण – मरेपर्यंत– अव्ययीभाव समास
3) देवघर – देवाचे घर – षष्ठी तत्पुरुष
4) नीलकंठ – नीळा असा कंठ असलेला शंकर- बहुव्रीही समास
5) नवरात्र नऊ रात्रीचा समूह द्विगु (तत्पुरुष)
6) बटाटेभात- बटाटे युक्त भात – मध्यमपदलोपी समास (तत्पुरूष समास)
7) बालमित्र – बालपणापासूनचा मित्र – मध्यमपदलोपी समास (तत्पुरूष समास)
2) आमरण – मरेपर्यंत– अव्ययीभाव समास
3) देवघर – देवाचे घर – षष्ठी तत्पुरुष
4) नीलकंठ – नीळा असा कंठ असलेला शंकर- बहुव्रीही समास
5) नवरात्र नऊ रात्रीचा समूह द्विगु (तत्पुरुष)
6) बटाटेभात- बटाटे युक्त भात – मध्यमपदलोपी समास (तत्पुरूष समास)
7) बालमित्र – बालपणापासूनचा मित्र – मध्यमपदलोपी समास (तत्पुरूष समास)
समासांच्या अधिक सरावासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
तत्पुरुष समास – येथे क्लिक करा..
अव्ययीभाव समास – येथे क्लिक करा..
बहुव्रीही समास – येथे क्लिक करा..
मराठी व्याकरण इतर महत्वाचे खालील घटक नक्की पहा…
अ.नं. | पाठाचे नाव | लिंक |
1. | शब्दांच्या जाती भाग 1 | |
2. | शब्दांच्या जाती भाग 2 | |
3. | नाम व नामाचे प्रकार | |
4. | वचन | |
5. | विरुद्धार्थी शब्द | |
6. | समानार्थी शब्द | |
7. | काळ व काळाचे प्रकार | |
8. | सर्वनाम | |
9. | विशेषण | |
10. | क्रियापद | |
11. | क्रियाविशेषण | |
12. | शब्दयोगी अव्यय | |
13. | उभयान्वयी अव्यय | |
14. | केवलप्रयोगी अव्यय | |
15. | वाक्प्रचार | |
16. | शब्दसमुहाबद्दल एक शब्द | |
17. | विभक्ती व विभक्तीचे प्रकार | |
18. | प्रयोग व प्रयोगाचे प्रकार | |
१९. | मराठी वर्णमाला | |
20. | संधी,स्वर संधी | |
21 | विरामचिन्हे | |
22 | म्हणी व त्यांचे अर्थ | |
23 | समास व समासाचे प्रकार | |
24 | अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुव्रीही समास |
|
|
|