11.01.2023 रोजीच्या आदेशानुसार 2022-23 सालातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा शिक्षकांचे अतिरिक्त शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रिया आज रोजी प्रत्येक तालुकास्तरावर आयोजित करण्यात आली होती.सदर प्रक्रिया स्थगित करण्यात यावी असा आदेश माननीय शिक्षण मंत्र्यांनी दिला आहे.
दिनांक: 24.01.2023 रोजी “अतिरिक्त शिक्षकांसाठी कौन्सिलिंगद्वारे” पद नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे त्यामध्ये कांही तांत्रिक अडचणी असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.सदर प्रक्रियेतील अतिरिक्त शिक्षकांच्या यादीत कमतरता असूनही कौन्सिलिंग प्रक्रिया आयोजित केली जात आहे.तरी सदर कारणामुळे ,” आजची कौन्सिलिंग प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी तसेच आज झालेली पूर्ण प्रक्रिया रद्द करावी.
पुढील कौन्सिलिंग प्रक्रियासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येतील.तसेच पुढील सर्व प्रकारची अतिरिक्त शिक्षक बदली कौन्सिलिंग प्रक्रियाही रद्द करण्यात यावी..असे माननीय शिक्षण मंत्र्यांनी आदेशात म्हटले आहे.
दिनांक: 24.01.2023 रोजी ज्या अतिरक्त शिक्षकांना नियुक्क्ती आदेश देण्यात आले आहेत ते सर्व आदेश रद्द करण्यात यावेत.कौन्सिलिंग प्रक्रियेची नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल.