8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11)

इयत्ता – आठवी 

विषय – मराठी 

कलिका चेतरिके 
 

8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11) 

अध्ययन
निष्पत्ती क्रमांकः
11 वेगवेगळ्या संदर्भाचा विविध उद्देशांसाठी केल्या जाणाऱ्या विविध विषयांच्या लेखनाल यो शब्द
वाक्य प्रचार यांचा प्रयोग करतात.

अध्ययन कृती क्रमांक : 11.1 कृतीचे नांव – शब्द भांडार
वर्तुळातील शब्दांना जोडणारा कंसातील योग्य शब्द घेऊन
वाक्यप्रचार तयार करा.


8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11)
उत्तर – 
वेड लावणे

 

 

थक्क होणे

पारणे फिटणे

मोल समजणे

पाणी पाजणे

तक्क लावणे

नख लागणे

नतमस्तक होणे

सार्थक होणे 
 
अध्ययन
कृती क्रमांक :
11.2

वाटया शब्दावरून तयार होणारे वाक्प्रचार लिहा.


1.
वाटेस लागणे –
चांगल्या मार्गास लागणे
2.

वाटेवर येणे
शुद्धीवर येणे
3.

वाटेल जाणे – आडवे
जाणे
4.

वाट दाखवणे – मार्ग
दाखवणे
5.

वाट वाकडी करणे – मुद्दाम मार्ग सोडणे

 
 
अध्ययन
कृती क्रमांक :
11.4
अर्थ पाहून वाक्प्रचारांच्या योग्य जोड्या लावणे.
       
             
            अर्थ                  वाक्प्रचार
 


1.
भांडण लावणारा         कळीचा नारद

2. आकस्मित संकट येणे आभाळ फाटणे

3. पूर्ण पराभव करणे      धूळ चारणे

4. मत बदलणे              पगडी फिरविणे

5. विश्वासघात करणे      केसाने गळा कापणे

अध्ययन
कृती क्रमांक :
11.5

वाक्य वाचून रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार लिहा.

(
पाणी पाजणे, पाणी सोडले, तिलांजली देतात, खसखस पिकली)


1.
गुरुजींनी विनोद सांगताच वर्गात
खसखस पिकली
.
2.

सैनिक देशासाठी स्वतःच्या
प्राणांची तिलांजली देतात.
3.

संत पुरंदर दासांनी आपल्या
संपत्ती वर पाणी सोडले.
4.

भारताने अनेकदा पाकिस्तानला
युद्धात पाणी पाजले.

 

 

मूल्यमापन कृती क्रमांक 1-
दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ
सांगून वाक्यात उपयोग कर.

1.
इतिश्री होणे – शेवट होणे
सरांनी इतिहासाचा पाठ संपून पाठाचा ही इतिश्री केला.
2.
करुणा भाकणे – विनंती करणे
रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लोक डॉक्टरांकडे करुणा भाकत
होते.

3.
जिवाचे रान करणे – अतिशय कष्ट करणे

सामना जिंकण्यासाठी खेळाडूंनी जीवाचे रान केले.
4.
फत्ते होणे – यशस्वी होणे
सुभेदार तानाजीने कोंढाण्याची मोहीम फत्ते केली.
5.
पाठीत खंजीर खुपसणे – विश्वासघात करणे

अडचणीच्या वेळी माझ्या मित्राने माझ्या पाठीत खंजीर खुपसले. 

तुमच्या पुस्तकातील दहा वाक्प्रचार शोधून अर्थासहित लिहा.

 
1.जिवाची मुंबई करणे – चैन करणे

2. धायमोकलून रडणे – मोठ्याने रडणे

3. हळहळणे – दु:ख करणे

4. देवा घरी जाणे – मरण पावणे

5. असंगाशी संग – अयोग्य माणसांशी संग

6. कळवळणे – तळमळणे

7. तोंड न पाहणे – नाराजी व्यक्त करणे

8.हंबरडा फोडणे – जोरात ओरडणे

9.भडभडून येणे- रडायला येणे

10.वाऱ्यावर सोडणे – मोकळे सोडणे

*तुम्हाला माहित असलेल्या देश भक्ती गीतांची नावे लिहा?

1.हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
 
2.अजिंक्य भारत अजिंक्य जनता

3.गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार

4.बलसागर भारत होवो

5.खरा तो एकची धर्म

6.जिंकू किंवा मरू

*तुम्हाला माहित असलेल्या राष्ट्रीय सणांची नावे लिहा?

1.स्वातंत्र्य दिन

2.प्रजासत्ताक दिन

3.महात्मा गांधी जयंती

4.बाल दिन

5.शिक्षक दिन

6.भारतीय संविधान दिन

7.राष्ट्रीय एकता दिन

8.राष्ट्रीय विज्ञान दिन


 *तिरंगा ध्वजाचे चित्र काढून त्याची माहिती लिहा.

 

8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11)


केसरी,पांढरा,हिरवा
असा आयताकृती तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे.झेंड्याच्या वरच्या बाजूला केसरी
,मध्यभागी
पांढरा आणि खाली गडद हिरवा रंगाचे पट्टे समान प्रमाणात आहेत.ध्वजाच्या लांबी –
रुंदीचे प्रमाण
2:3 इतके आहे.पांढऱ्या रंगाच्या पट्टीच्या मध्यभागी गडद
गडद निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.हे अशोक चक्र सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ
येथील सिंहमुद्रेवरून स्वीकारण्यात आले आहे.अशोक चक्रात
24 आरे
आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या
24 दिवस आधी म्हणजेच 22 जुलै 1947 रोजी
भारतीय राज्यघटना समितीने स्वतंत्र भारताच्या तिरंगी ध्वजाला मजुरी
दिली.
 
 
मूल्यमापन
कृती क्रमांक –
2
चित्रातील वस्तू देशी विदेशी शब्दात लिहा.
 
1.

8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11)

 

देशी – संगणक 
 
विदेशी – कॉम्प्यूटर 
 
2.

 

8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11)
देशी – दूरदर्शन 
 
विदेशी – टेलिव्हिजन 
3.
8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11)
देशी – भ्रमणध्वनी 
 
विदेशी – मोबाईल 

4.

8वी मराठी अध्ययन निष्पत्ती 8.11 कलिका चेतरिके (8th MARATHI KALIKA CHETARIKE 8.11)
देशी – घड्याळ 
 
विदेशी – वाॅच


 

मूल्यमापन कृती क्रमांक- 3
खालील वाक्यातील नाम ओळखा.1.
विभावरी खेळावयास गेली आहे. – विभावरी

2.
काश्मीर पाहण्यासारखे आहे. काश्मीर

3. कधीही लबाडी करू नये. – लबाडी

4. हवामान सुंदर आहे. – हवामान
 

आठवी मराठी

कलिका चेतरीके 2022

अध्ययन निष्पत्ती 10

https://youtu.be/dFh9xGT2hZE

 

अध्ययन निष्पत्ती 8.9

https://youtu.be/8PfHuE69Ds0

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

 

अध्ययन निष्पत्ती 8.8

http://bit.ly/3H5a6Ml

 

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

Subscribtion link

 

http://youtube.com/@smartguruji2022

 
 
 
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *