इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
अध्ययन अंश 23
अध्ययन निष्पत्तीः राज्याच्या मार्गदर्शक तत्वाविषयी समजून घेणे.
आम्ही जीवनामध्ये कोणताही निर्णय घेत असताना जीवनातील अनुभव, मोठ्यांचा सल्ला आणि मार्गदर्शनाची आम्हाला मदत होते. त्याचप्रमाणे कोणताही देश आपल्या लोकांच्या कल्याणासाठी योजना आखत असताना ही योजना देशाची काही मार्गदर्शक तत्वाने राबवल्या जातात. त्यांनाच मार्गदर्शक तत्त्वे असे म्हणतात. आमच्या भारत देशाच्या घटनेच्या चौथ्या भागामध्ये आम्ही याचा स्वीकार केला आहे ते म्हणजे गांधीवाद, समाजवाद आणि उदारमतवाद या तत्त्वांचा स्वीकार केला आहे. कल्याणकारी राज्याच्या स्थापनेसाठी सार्वजनिक धोरणे आणि योजनाची अंमलबजावणी करताना ही तत्त्वे विचारात घेतली पाहिजेत. सरकारने येथे नमूद केलेल्या कोणत्याही घटकाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असा कोणताही नियम नाही अंमलबजावणी न केल्यास आम्हाला न्यायालयात प्रश्न विचारण्याची किंवा दावा करण्याची परवानगी नाही. भारतीय राज्यघटनेने नमूद केलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे स्त्री-पुरुष समान वेतन, स्त्रियांसाठी बाळंतपण, बाल शोषण रोखणे, मुलांना निरोगी वाढू देणे, त्यांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, दुर्बलांसाठी मोफत व फायदेशीर मदत देणे इत्यादी.
1. कृती: तुमच्या आजूबाजूच्या समाजातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या व सुरक्षित लोकांकडे पहा आणि त्या कमकुवत का आहेत ? याबद्दल तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करा.
3. कृती: मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत का ? किंवा नको या विषयावर तुमच्या शाळेत त्यांच्या स्पर्धा आयोजित करून त्यानंतर चर्चा झालेल्या विषयांचे चिंतन करा..
1.दुर्बलांना सामाजिक न्याय
2.महिला आणि बालकल्याण
3.नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय.
4.ऐतिहासिक स्मारकांचे रक्षण
5.सर्वांसाठी समान कायदा
कृती 1: देशाला लष्कराची गरज का आहे ? वर्गात शिक्षकाच्या उपस्थितीत चर्चा करा.
देशामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी,आंतरिक आणि बाह्य युद्धापासून देशाचे व देशाच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी देशाला लष्कराची गरज आहे.
कृती 2. खालील यादीमधील सहाय्यक संरक्षण दल व पूरक संरक्षण दल यांचे वर्गीकरण करा.
होमगार्ड, नागरी पोलीस दल, एनसीसी, भारतीय रेड क्रॉस संघटना, सीमा सुरक्षा दल, सीमा रस्त्यांची संघटना,तटरक्षक
सहाय्यक संरक्षण दल | पूरक संरक्षण दल |
होमगार्ड | सीमा सुरक्षा दल |
नागरी पोलीस दल | सीमा रस्त्यांची |
एनसीसी | तटरक्षक |
भारतीय रेड क्रॉस |
|
अध्ययन निष्पत्ती: भारताच्या संरक्षण दलाच्या भूदल, नौदल, वायुदल याविषयी जाणून घ्या.
आमचे शेत, घर, काही सार्वजनिक स्थळे, बाग, देवस्थान इत्यादी अनेक स्थळांना आम्ही कुंपण किंवा कंपाउंड बांधून संरक्षण करतो. आम्ही असे का करतो सांग.(वर्गामध्ये मित्राबरोबर व शिक्षकांचे सहाय्याने चर्चा करा )
होय, आमच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी शेताला कुंपण घालून पिकाचे संरक्षण करण्यासाठी अशी अनेक कारणे आम्ही सांगू शकतो. आम्ही राहात असलेल्या ठिकाणांचे संरक्षण असे करतो जर कोणी आपल्या देशावर आक्रमण करायला आले तर आपण काय करू शकतो? त्यासाठी अंतर्गत आणि बाह्य हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक देशाचे स्वतःचे सैन्य असते. त्यांना आपण सुरक्षा दल म्हणतो.
भारताकडे तीन प्रकारचे सैन्य आहे. भूदल, नौदल, वायुदल या तीन सैन्याचे मुख्य राष्ट्रपती असतात. या दलाचे केंद्र ऑफिस दिल्लीमध्ये आहे. सर्व देशाची सुरक्षा, रक्षण व स्थिरता सुनिश्चित होण्यासाठी या तिन्ही दलाची गरज असते. याशिवाय सैन्यदल आपत्तकालीन काळात गरजेचे आहे. याबरोबर राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी एनसीसी, होमगार्ड, सीमा सुरक्षा दल इत्यादी भूदलामध्ये भारत देशाच्या संरक्षणासाठी 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या स्त्री-पुरुषांना लष्करात,हवाईदल आणि नौदलात सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
कृती 1: देशाला लष्कराची गरज का आहे ? वर्गात शिक्षकाच्या उपस्थितीत चर्चा करा.
होमगार्ड, नागरी पोलीस दल, एनसीसी, भारतीय रेड क्रॉस संघटना, सीमा सुरक्षा दल, सीमा रस्त्यांची संघटना,तटरक्षक
सहाय्यक संरक्षण दल | पूरक संरक्षण दल |
होमगार्ड | सीमा सुरक्षा दल |
नागरी पोलीस दल | सीमा रस्त्यांची संघटना |
एनसीसी | तटरक्षक |
भारतीय रेड क्रॉस संघटना |
|
कृती 4: तुला भारतीय संरक्षण दलामध्ये सामील होणे आवडेल का ? तुझा अभिप्राय लिही.