इयत्ता – नववी
विषय – मराठी
गद्य विभाग
7.संत पुरंदरदास
परिचय : डॉ. प्र. न. जोशी
नरहर जोशी यांना 20व्या शतकातील नामवंत श्रेष्ठ साहित्यिक म्हणून ओळखले जातात.पुणे येथे काही काळ
अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे.
■विज्ञान विषयक लेखन – ‘अणुयुगाचे निर्माते‘, ‘असे शोध असे शोधक‘, ‘नव विज्ञान कथा‘,
■ कादंबरी लेखन – ‘भारतीय संत भाग एक, भाग दोन‘ हे संत
साहित्या पर लेखन, ‘असे धर्मवीर‘, ‘आंधळी गौळण‘, ‘काय भुललासी वरलिया रंगा‘
■ मराठी वाङ्मयाच्या विवेचक इतिहासाचे प्राचीन व अर्वाचीन असे
दोन खंड ‘आदर्श मराठी शब्दकोश‘, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.
■ डॉ. प्र. न. जोशी त्यांच्या साहित्य कार्यावद्दल महाराष्ट्र शासनाकडून आठ पुरस्कार मिळाले आहेत.
‘संत पुरंदरदास‘ हा पाठ ‘आपले संत‘ या पुस्तकातून करून घेतलेला आहे.संत पुरंदरदासांचे संक्षिप्त व्यक्तिमत्त्व व त्यांच्या विचारांचे
दर्शन या पाठातून व्यक्त होते.
(मूल्य – भक्ती, त्याग)
शब्दार्थ :
■ सराफी-सोन्याचांदीचा व्यापार करणारे
■ संतती – मुलेबाळे
■ सत्त्वशील- सर्व
सद्गुणांचा द्योतक
■ साध्वी- पवित्र, सद्वर्तनी स्त्री
■ सन्मती- चांगली
बुद्धी
■ वैरागी – संन्यासी, साधू
■ कंजूष -कृपण, चिक्कू
■ एकनिष्ठ – अढळ, श्रध्दावान
■ उत्कर्ष – भरभराट
■उन्मळणे – मुळासकट उपटून टाकणे
■ आतिथ्य-आदरातिथ्य,पाहुणचार,
■ दुवा देणे- आशीर्वाद देणे
■ वाचा-बोलणे
■ पारा चढणे – क्रोध अनावर होणे
■ बाका प्रसंग-कठीण प्रसंग
टीपा : संत पुरंदरदास यांना श्रीनिवास व शिवप्पा या दोन्ही नावानी ओळखले जाते.
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) पुरंदरदासांच्या घराण्यात कोणता व्यवसाय होता ?
(अ) वखारीचा
(ब) सराफीचा
(क) लोहाराचा
(ड) शेतीचा
(आ) कर्नाटकाचा तुकाराम म्हणून यांचा उल्लेख करतात.
(अ) संत बसवेश्वर
(ब) संत कनकदास
(क) संत पुरंदरदास
(ड) संत चन्नबसवेश्वर
(इ) श्रीनिवासाचा स्वभाव संसारात असताना कसा होता
(अ) संकुचित
(ब) उदार
(क) विनोदी
(ड) चतुर
ई) सरस्वतीने आपल्या नाकातील नथ कोणाला दिली?
(अ) ब्राह्मणाला
(ब) सराफाला
(क) विठ्ठलाला
(ड) पतीला
उ) शिवप्पाने रागारागाने नथ येथे सीलबंद करून ठेवली.
(अ) तिजोरीत
(ब) पेटीत
(क) बँकेत
(ड) पोष्टात
प्र.1 – एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.पुरंदरदासांचा जन्म केव्हा व कोठे झाला?
उत्तर – पुरंदर दासांचा जन्म 1482 च्या सुमारास झाला
2. शिवाप्पाने आपल्या सर्व संपत्तीचे काय
केले?
उत्तर – शिवाप्पाने हातात तुळशीपात्र घेऊन सर्व संपत्तीवर पाणी सोडले कृष्णा अर्पण केले. ब्राह्मणांना दान केले.गरिबांना,कंगालाना गरजूंना देऊन टाकले.
3.शिवप्पाचे नाव पुरंदर विठ्ठल असे कोणी ठेवले?
उत्तर –शिवप्पाचे नाव पुरंदर विठ्ठल असे श्री व्यासराय यांनी ठेवली.
४.पुरंदरदासांनी कोणाची भक्ती केली?
उत्तर –पुरंदरदासांनी पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केली.
प्र.2 – दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
१.गरीब ब्राह्मण सांधवी सरस्वतीकडे जाऊन कोणती विनंती करतो?
उत्तर –गरीब ब्राह्मण सरस्वतीला हाक मारतो व म्हणतो बाई,मी एक दारिद्र्य ब्राह्मण आहे.मुलीचे लग्न करावे म्हणतो.पण जवळ काही नाही.थोडी कृपा करा आणि मदत करा अशी विनंती करतो.
2. संत पुरंदर दासांच्या साहित्य लेखनाची माहिती लिहा.
उत्तर –गुरुकृपेने पुरंदरदासांनी लोकांसाठी उपदेशपर,भक्तीपर व तत्वज्ञानपर उत्तोमतम पदे लिहिली.कर्नाटक संगीताचे उद्घारक म्हणून पुरंदरदासांची किर्ती वाढली.द्रोपदी वस्त्रहरण, सुदामा चरित्र,परतत्वसार इत्यादी ग्रंथ ही त्यांच्या नावावर आहेत.दासांच्या पदांची प्रसिद्धी मात्र सर्वत्र आहे.आपल्या पदाच्या शेवटी ते पुरंदर विठ्ठल असा उल्लेख नेहमी करत.
3.शिवप्पाचे जीवन कोणत्या प्रसंगाने पालटून गेले?
उत्तर –सरस्वतीने पुरंदर दासांना पेल्यातील पडलेली नथ आणून दिली.ती पाहताच शिवप्पा चमकले त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नाही.नथ हातात घेऊन दुकानात येऊन त्यांनी तिजोरी उघडून पाहिली,सीलबंद पिशवीत नथ नव्हती. इतक्या बंदोबस्त ठेवलेली नथ कशी घरी गेली.श्रीनिवासाच्या बुद्धीस जोराचा धक्का बसला.घरी येऊन पत्नीला विचारले तेव्हा एक ईश्वरी कृपा असे सरस्वतीने म्हटले.इथेच या प्रसंगाला शिवप्पाचे जीवन पलटून गेले.
४.कोणत्या अपराधाचे प्रायश्चित सरस्वती घेणार होती?
उत्तर – या गरीब ब्राह्मणाची दया सरस्वतीला आली.नवऱ्याचा कंजूस स्वभाव तिला माहित असल्याने आपल्या वडिलांनी दिलेली नजर क्षणाचा ही विलंबन न करता गरीब ब्राम्हणाचे संकट दूर करण्यासाठी ब्राह्मणाला दिली.पण श्रीनिवास घरी येऊन त्यांनी नथ विचारून खरे सांगण्यास बजावली संकटात सापडलेल्या सरस्वतीने पेल्यात पाणी घेऊन त्यात विष टाकून घ्यायचे ठरविले.नवऱ्याची परवानगी न घेता तिने ती नथ दिली होती.त्याकरिता ती मृत्यू पत्करण्यास तयार होती.म्हणून केला अपराधाचे प्रायश्चित मृत्यूला कवटाळून ती घेणार होती.
प्र.3 – संदर्भासहित स्पष्टीकरण करा
(अ) अ) “नाथ, आपल्या हातून मरण्यापेक्षा अधिक चांगले काय आहे?”
संदर्भ– वरील विधान ‘संत पुरंदरदास’ या पाठातील असून हा पाठ ‘आपले संत’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
स्पष्टीकरण–श्री निवासाच्या पत्नीच्या सरस्वतीच्या तोंडचे हे उद्गार आहेत.पत्नी खोटे बोलत आहे असे शिवप्पाना वाटून ते संतापले.घरात आहे तर ती आण आधी आताच्या आता नाही तर याद राख माझ्याशी गाठ आहे.जिवंत ठेवणार नाही.हे ऐकल्यानंतर नाथांना उद्देशून सरस्वतीने वरील वाक्य म्हटले आहे.
(आ)”प्रभू,किती दयावंत तू!तुला सर्व लेकरांची काळजी!”
संदर्भ– वरील विधान ‘संत पुरंदरदास’ या पाठातील असून हा पाठ ‘आपले संत’ या पुस्तकातून घेण्यात आला आहे.
स्पष्टीकरण–वरील विधान संत पुरंदरदासांच्या पत्नीने म्हटले आहे.पेल्यात पडलेली नथ पाहून तिचा हर्ष उमाळून आला व डोळ्यात आनंदाश्रू चमकले.त्यावेळी पुरंदरदासांच्या पत्नीने वरील वाक्य म्हणून नथ श्रीनिवासाच्या हाती दिली.
प्र.४ – पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा.
अ) शिवप्पाच्या पत्नीस ‘थोर स्त्री’ असे का म्हटले आहे?
उत्तर – गरीब ब्राह्मणाने बाई,मी एक दारिद्र्य ब्राह्मण आहे.घरी फार गरिबी आहे.मुलीचे लग्न करावे म्हणतो.पण जवळ काही नाही.फार उपकार होतील.बाई कन्यादानाचे पुण्य घ्यावे असे म्हटले.हे ऐकून सरस्वतीला त्या गरीब ब्राह्मणाची दया आली.तिने त्याला आपल्या दुकानात जाऊन मदत मागण्यास सुचविले.नवऱ्याचा स्वभाव तिला माहीत होता.आपण या ब्राह्मणाला मदत केली नाही तर त्यावर भयंकर प्रसंग ओढवणार याचे संकट कसे दूर करावे याचा विचार केल्यावर आपल्या वडिलांनी दिलेली नथ त्याला मदत म्हणून देण्याचे ठरवून एक क्षणाचा ही विलंब न करता ब्राह्मणाला दिली व म्हणाली ही घे बाबा,दुसरे माझ्याजवळ काही नाही.ब्राह्मणाने बाईस दुवा दिली.तिच्या या श्रेष्ठ मदतीस व होणाऱ्या परिणामांना तोंड देण्याच्या धैर्यामुळेच शिवप्पाच्या पत्नीस थोर स्त्री असे म्हटले आहे.
आ) शिवप्पाने आपल्या संपत्तीचे वाटप का केले?
उत्तर – नथ पाहून श्रीनिवास शेटजीच्या बुद्धीस धक्काच बसला.त्यांनी सर्व हकीकत पत्नीला विचारली.एक ईश्वर कृपा एवढेच ती म्हणाली.धनसंपत्तीचा सारा दिमाख उतरला.हा ब्राह्मण कोण?आपण कोणाला सहा महिने सतावले तो आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेल्या विठ्ठल तर नव्हे.आपण काय केले संपत्तीचा केवढा मोठा नशा अमानुशता हा विचार शिवप्पाच्या मनात येऊन त्याचे जीवनच पालटून गेले.पत्नीसह परमेश्वराची त्यांनी मनोभावे पूजा केली. हातात तुळशी पत्र घेऊन सर्व संपत्तीचे दान करून टाकले.पत्नीच्या कुंकवाची सोन्याची डबी सुद्धा दिली.धनसंपत्तीचा सारा नूर उतरल्याने संपत्तीचे वाटप केले.
इ) पुरंदरदासांचे सोवळ्या ओवळ्या बद्दलचे विचार स्पष्ट करा.
उत्तर – पुरंदरदासाला समाजातील वेडगळ रीती भाती मान्य नव्हत्या.सोवळे ओवळे याची फुशारकी का मारता?दुसऱ्यांचा स्पर्श झाला म्हणजे मूर्खा तू ओवळा कसा होतोस?ते आणलेस कुठून? सोवळाही तूच आणि ओवळाही तूच! अस्थिचर्म,मलमुत्र यात वास करणारा तू सोवळा कसा?जन्मल्यावर सुतक व मेल्यावर सुतक मग मध्येच सोवळे कसे आले? पाप विनाशी गंगेत चर्म धुतले की कर्म नष्ट होते की काय?आतले मर्म समजावून घे आणि निर्मळ अंतकरणाने विश्वचालकाच्या पदकमलाचे ध्यान कर.ते खरे सोवळे आहेत.केवळ वस्त्र धुवून वाळवून नेसले म्हणजे सोवळे होत नाही.पोटातील काम,क्रोध,मद,मत्सर नष्ट करणे म्हणजे सोवळेपणा येणे.पापाला न भिता दुजा माणसाला प्रखर शब्दाने दुखविणे सोवळे नाही.पुरंदर विठ्ठलाचे स्मरण हेच खरे सोवळे असे विचार पुरंदरदासांनी व्यक्त केले आहे.
प्र.5 – आठ दहा वाक्यात लिहा
अ) पुरंदर दासांच्या भक्ती मार्गातील कार्याबद्दल माहिती लिहा.
उत्तर – पुरंदरदासांच्या क्रांतिकारक विचारातूनच सामाजिक क्षमतेकडे त्याचे मन वळले. प्रसिद्ध संत कनकदासानाही श्री व्यासजींचा उपदेश होता.पुरंदरदासांनी भक्तीचा अखंड प्रसार केला.लोकांना सन्मार्गास लावली.चाळीस वर्षापर्यंत त्यांचा हा उद्योग वैरागीवृत्तीने चालू होता.प्रवास नेहमीच असे तिरुपती,घटीकाचल,कालहस्ती,कंची,मायावरम,श्रीरंग,रामेश्वर, कन्याकुमारी इथे त्यांचा संचार असे.कावेरी,तुगभंद्रा नद्यावर त्यांची स्तुती स्तोत्रे आहेत. दासानी आयुष्यभर भगवत भक्तीचा प्रसार आपल्या संगीतमय मधुर वाणीने केला.
2)पुरंदरदासानी विठ्ठलाची स्तुती कशी केली?
उत्तर – विठ्ठलावर पुरंदरदासांचे मन जडले.त्याला पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू झरू लागले. तल्लीन होऊन शिवप्पा कीर्तन करू लागले.नृत्य करू लागले.रोज भिक्षेचे अन्न आणून त्यातच संतुष्टता मानावी व अखंड विठ्ठल भजन स्मरण करावे हाच उद्योग झाला.विठ्ठलाचे भजन कीर्तन पुरंदरदासांनीच करावे असे सर्वत्र ख्याती पसरली.पुरंदर दासांनी उत्तोमत्तम पदे रचली.उपदेश वैराग्य,भक्ति,तत्त्वज्ञान त्यांच्या पदातून प्रकट झाले.देव आला,माझा स्वामी आला.देवाधि देव….. शिखामणी आला,शेषावर शयन करणारा आला.गरुडावर बसणारा हसत मुख हा पुरंदर विठ्ठल भेटीसाठी आला आहे.हे पुरंदर विठ्ठला,माझी दुष्कर्मे मी नाहीशी कर. भक्त वत्सला या पुरंदरदासाला जवळ कर अशी विठ्ठलाची स्तुती केली आहे.
भाषाभ्यास
अ) वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
दुवा देणे – आशीर्वाद देणे
पुरंदरदासांची भक्ती पाहून देवाने त्यांना दुवा दिली आहे
पारा चढणे – क्रोध आनावर होणे
खेळताना घाण झालेली कपडे पाहून आईचा पारा चढला.
वाचा जाणे – बोलणे बंद होणे
सरस्वतीची वाचा गेली.
बाका प्रसंग – कठीण प्रसंग
माझ्यावर बाका प्रसंग आला.
आतिथ्य करणे – पाहुणचार करणे
मी पाहुण्यांचे आतिथ्य केले.
आ) समास ओळखा
कन्यादान – कन्येचे दान
षष्ठी तत्पुरुष समाज
पती-पत्नी – पती आणि पत्नी
इत्तरेत्तर द्वंद्व समास
दयावान – दया करणारा असा
कर्मधारेय तत्पुरुष समास
यथासांग – च्या प्रमाणे
षष्ठी तत्पुरुष समास
मंत्रोपदेश – मंत्राचा उपदेश
षष्ठी तत्पुरुष समास
इ) संधी सोडवा.
मंत्रोपदेश – मंत्र + उपदेश
सन्मती – सत् + मती
उत्तमोत्तम – उत्तम + उत्तम
प्रायश्चित – प्राय: + चित