इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
विषय – स्वाध्याय
इतिहास
प्रकरण 11.
मान्यखेटचे राष्ट्रकूट
आणि कल्याणचे चालुक्य
स्वाध्याय
I. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक दंतीदुर्ग
होय.
2. राष्ट्रकूटांचा
पराभव केलेल्या कल्याणच्या चालुक्य घराण्यातील राजा दुसरा तैलप
3. कवीरहस्याचा
लेखक हलायुद्ध
4. पोन्नानी
रचलेली प्रसिद्ध कविता शांतीपुराण
5. कल्याणच्या
चालुक्य घराण्यातील प्रसिद्ध राजा सहावा विक्रमादित्य.
6. या
काळात सामाजिक सुधारणा करणारी व्यक्ती बसवेश्वर.
II. थोडक्यात उत्तरे लिहा.
7. राष्ट्रकूटांचा राज्यकारभार कसा होता ?
उत्तर
–
राष्ट्रकूट घराण्यात राजपद वारसा हक्काने मिळत असे.राजाला मदत करण्यासाठी
मंत्रिमंडळ अस्तित्वात होते.मंत्रिमंडळात महत्त्वाच्या व्यक्तींची नेमणूक केली जात
असे.त्याला महासंधी विग्रह (परराष्ट्र मंत्री) म्हटले जात असे.तो विदेशी व्यवहार
पाहत असे.राज्यकारभाराच्या सुविधेसाठी साम्राज्याचे राष्ट्र,मंडळ,विषय,नाडू आणि ग्राम असे भाग पाडले जात असत.खेड्याच्या प्रमुखाला
ग्रामपती किंवा प्रभू गौड म्हटले जात असे.तो खेड्यातील सेने प्रमुख असे.त्याला
ग्रामसेवकाची मदत असे येथे ग्रामसभा देखील असत.
8. राष्ट्रकूटांच्या काळातील शिक्षण पद्धती कशी होती?
उत्तर
–
त्या काळातील अग्रहार आणि मठ ही शिक्षण केंद्र होते.संस्कृत,वेद,खगोलशास्त्र,तर्कशास्त्र आणि पुराणांच्याबद्दल ज्ञान दिले जात होते.विजापूर
जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सालोटगी हे प्रगत शैक्षणिक केंद्र होते.
9. वेरुळ येथील मंदिराबद्दल माहिती लिहा.
उत्तर
–
वेरूळ येथील कैलास नाथ मंदिर पहिल्या कृष्णाने बांधले हे एका अखंड दगडात कोरलेले
आश्चर्य आहे हे मंदिर 100 फूट उंच,276 फूट लांब आणि 154
फूट रुंद
खडकात कोरलेले आहे.याच्या जवळच प्रसिद्ध दशावतार गुहामंदिर आहे.
10. कल्याणच्या चालुक्यांनी साहित्याला कसे
उत्तेजन दिले?
उत्तर
–
कल्याणच्या चालुक्यांनी साहित्याला उत्तेजन दिले. या काळात जैन विद्वानांच्या
सहाय्याने कन्नड साहित्याची भरभराट झाली.या काळातील संस्मरणीय कृती म्हणजे रन्नानी
लिहिलेले गदायुद्ध(साहसभीम विजय ),दुर्गसिंहाचे पंचतंत्र,बिल्लनाचे विक्रमांकचरित, नयनसेनाचे धर्मामृत, विघ्नेश्वराचे
मिताक्षरी,तिसऱ्या सोमेश्वराचे मनसोल्हास
ज्याला संस्कृत विश्वकोश मानले जाते.चालुक्य काळातील अजोड रचना म्हणजे वचनसाहित्य
अक्कमहादेवी,अल्लम प्रभू,मच्चया या हे प्रमुख वचन साहित्यकार होते.
चालुक्य काळातील नाणी
वरील प्रश्नोत्तरे pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा..