परिपत्रक दिनांक – 24.08.2022
विषय – प्रस्तुत 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार स्तर – 1 व स्तर- 2 अशी मुल्यांकन साधने वापरून मूल्यमापन करणेविषयी…
संदर्भ – 1. ಮಾನ್ಯ ಆಯುಕ್ತರು, ಸಾ.ಶಿ.ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯ ಯೋಜನಾ ನಿರ್ದೇಶಕರು, ಸ.ಶಿ.ಕರವರ ಜ್ಞಾಪನಾ ಸಂ:ಡಿ.ಎಸ್.ಇ.ಆರ್.ಟಿ/ಇವಿಜಿ/ಕೆ.ಚೇ/ ಮೌಲ್ಯಾಂಕನ/2021-22 ದಿನಾಂಕ:28.04.2022. CLICK HERE FOR CIRCULAR
2. 2. ಮಾನ್ಯ ರಾಜ್ಯ ಯೋಜನಾ ನಿರ್ದೇಶಕರು, ಸಶಿಕರವರ ಸುತ್ತೋಲೆ ಸಂ: ಎಸ್.ಎಸ್.ಕೆ./ಗು.ಖಾ./ನಲಿ-ಕಲಿ/ಪಿ.ಎಂ. ಯು.2022-23 ದಿ:30-07-2022. CLICK HERE FOR CIRCULAR
3. ದಿನಾಂಕ:12-08-2022ರಂದು ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು, ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಾಕ್ಷರತೆ ಇಲಾಖೆರವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಕೋರ್ ಸಮಿತಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚಿಸಿದಂತೆ. CLICK HERE FOR TELECONFERENCE
Covid-19 मुळे 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित केला आहे.आणि 2022-23 हे शैक्षणिक वर्ष अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष म्हणून घोषित केले आहे.अध्ययन पुनर्प्राप्ती संबंधी मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून विद्यार्थी कृतीपुस्तिका व शिक्षक हस्तपुस्तिका यासारखे साहित्यही पुरविण्यात आले आहे.या कालावधीत करावयाच्या शैक्षणिक मूल्यमापन,मूल्यमापन कार्याची सविस्तर माहिती संदर्भ-१ मध्ये देण्यात आली आहे.
संदर्भ-2 च्या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आणि संदर्भ-3 च्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा केल्यानुसार, प्रस्तुत वर्षात SA-1 (संकलनात्मक मूल्यमापन – 1) आणि SA-2 (संकलनात्मक मूल्यमापन – 2) मूल्यमापन करताना संबंधित वर्ग आणि विषयाच्या 50% अध्ययन निष्पत्तींवर (LO – Learning Outcomes) वर आधारित परीक्षा घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार स्तर – 1 व स्तर- 2 अशी मुल्यांकन साधने वापरण्यात यावीत. ज्या विद्यार्थ्यांनी निर्धारित अध्ययन निष्पत्ती पेक्षा कमी अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत त्यांच्यासाठी स्तर-1 आणि सर्व अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्तर-2 अशा स्वतंत्र मुल्यांकन साधनांचा वापर करावा. उदाहरणार्थ जर SA-1 साठी 8 अध्ययन निष्पत्ती निर्धारित केल्या असतील तर स्तर-1 मधील विद्यार्थ्यांसाठी 8 पैकी 4 अध्ययन निष्पत्तींवर आधारित मुल्यांकन साधन तयार करणे आणि स्तर-2 मधील विद्यार्थ्यांसाठी 8 पैकी 8 सर्वच अध्ययन निष्पत्तींवर आधारित मुल्यांकन साधन तयार करणे.
कोणत्या विद्यार्थ्यासाठी कोणते मूल्यमापन साधन म्हणजे स्तर-1 किंवा स्तर-2 हे संबंधित विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या अध्ययन निष्पत्तींवर ठरवावे.तसेच त्यानुसार ग्रेड देण्यात याव्यात.सदर ग्रेडचे विवरण व मूल्यमापनाची माहिती विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये नोंद ठेवावी आणि पालक सभा व समुदाय कार्यक्रमांमध्ये याविषयी माहिती सांगणे.
अधिक माहितीस्तव अधिकृत आदेश खालील प्रमाणे -: