इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
विषय – स्वाध्याय
समाजशास्त्र
18.मानव आणि संस्कृती
I. रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. संस्कृती
म्हणजे सुशिल व सुसंस्कृतपणा.
2. रूढी
म्हणजे प्रचलित नियम आणि पद्धतींनुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा पुन्हा गुंतण्याची क्रिया होय.
3. भारतात
विविधतेत एकता आढळते.
II. एका वाक्यात उत्तरे द्या
4. संस्कृती म्हणजे काय ?
उत्तर – मानव समाजाचा सदस्य असून ज्ञान कला, नैतिक नियम, कायदा, क्षमता, नैपुण्यता हे गुण घेतो यालाच संस्कृती म्हणतात.
5. तुमच्या भागातील सांस्कृतिक विविधतेचे एक उदाहरण
द्या.
उत्तर –माझ्या भागातील सांस्कृतिक विविधतेच्या उदाहरणांमध्ये विशिष्ट पाककृती, बोलल्या जाणार्या भाषा,कपडे शैली आणि धार्मिक प्रथा यांचा समावेश होतो. उदा. मकर संक्रांतीला सर्वांना तिळगुळ देणे..
6. आचार आणि विचार म्हणजे काय ?
उत्तर – श्रद्धा,मूल्ये,नियम,सामाजिक रूढी आणि नैतिक पैलू या
संस्कृतीच्या घटकांना आचार आणि विचार असे म्हणतात.
7. आचार आणि विचाराचे उदाहरण द्या.
उत्तर – धार्मिक समारंभ, सण, विवाह विधी इ. यांचा आचार आणि विचारात समावेश होतो.
III. चार ते पाच वाक्यात उत्तरे द्या.
8. सामाजिक रूढी म्हणजे काय ? उदा. द्या.
उत्तर – समाज जीवनामध्ये लोकांनी पाळावयाचे नियम किंवा समाजात
लोकांच्या वागणुकीचे नियमन म्हणजे सामाजिक रूढी होय. उदा. जेवणे,खाणे, नमस्कार करणे, रात्री मीठ विकत घेऊ नये, रात्री फूल तोडू नये इत्यादी.
9. सांस्कृतिक विविधतेचे वर्णन करा.
उत्तर – वेगवेगळे जाती,धर्म,भाषा,संस्कृती असणारे लोक एकत्र
एकतेने व आनंदाने राहतात यालाच सांस्कृतिक विविधता म्हणतात.भारतात शेकडो जमाती हजारो
जाती अनेक वंश, शेकडो भाषा तसेच विविध
संस्कृती दिसून येते. त्यामुळे भारतात विविधतेत एकता आहे.
10. संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करा.
उत्तर – प्राचीन काळापासून चालत आलेले सण,परंपरा, रूढी,राहणीमान इत्यादी म्हणजेच
संस्कृती होय.या संस्कृतीची भाषा,राहणीमान,श्रद्धा,मूल्ये,नैतिकता, वेशभूषा, केशरचना,कायदे,कला,रुढी अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
CLICK HERE TO DOWNLOAD PDF
आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा..