विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले 05 दिवस याप्रमाणे नियोजित केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
वर्गात विद्यार्थ्यांकडून कोणत्या कृती करून घ्यायच्या याची सविस्तर माहिती व कृतीपुस्तिका या पुस्तिकेत देण्यात आल्या आहेत.. विद्यार्थी कृतीपुस्तिका PDF