विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ
बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
विद्याप्रवेश – दैनंदिन कृती
आठवडा – 3
दिवस – 16
तासिका | कृतींचे विवरण | |
अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)
| कृती 1 : प्रत्येक मुलाला त्याच्या नावाने बोलवून “Good morning, welcome ” “Have a thrilling Thursday” असं म्हणून स्वागत करा. त्यांनी “Good morning, Thank you. Same to you” असं उत्तर द्यायला हवं. कृती 2 : दिवस 14 मध्ये उल्लेख केलेल्या शुभेच्छांची देवाणघेवाण कृती पुनरावर्तीत करा. | |
गुजगोष्टी | कृती : मजा करूया आवश्यक साहित्य : खडू / काठी पद्धत : 1. मुलांना मैदानात घेवून जा आणि वर्तुळाकारात उभे करा. 2. प्रत्येक मुलाकडे खडू / काठी द्या आणि खाली बसून त्यांच्या हात / पायाचा आकार खडू / काठीने जमिनीवर रेखाटायला मदत करा. 3. त्यांचे पाय / पायाची बोटे आणि हात इतरांच्या पाय आणि हातांशी तुलना करण्यास सांगा. तसेच चित्राचा आकार, आकारमान आणि ते कसे दिसते याबद्दल बोलायला सांगा. कृती : इंग्रजी गाणे ( Rhyme) · Head, shoulders, knees and toes इंग्रजी गाणे (Rhyme) खालील पद्धतीने गा.
Teacher: Head, shoulders, Students: knees and toes Teacher: Knees and toes, Students: Knees and toes, Teacher: Head, shoulders, Students: knees and toes Teacher: It’s my body. Students: It’s my body. Teacher: Eyes and ears and Students: mouth and nose Teacher: Mouth and nose, Students: Mouth and nose, Teacher: Eyes and ears and Students: mouth and nose Teacher: Eyes and ears and Students: mouth and nose Teacher: It’s my body. Students: It’s my body. | |
माझा वेळ (Free Indore play) | दिवस- 16 वा मुले त्यांना निर्दिष्ट केलेल्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करतात. शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे. | |
पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती) | सामर्थ्य : रंग आणि आकाराच्या आधारे वर्गीकरण आणि परिसराबद्दल जागरूकता कृती 31 : वर्गीकरण करणे ( ध्येय 3 ) उद्देश : गुणधर्मानुसार वर्गीकरण करणे. आवश्यक साहित्य: मातीच्या गोळ्यासारख्या वस्तू, खडे, बटणे, नट, अंगठ्या पद्धत : वेगवेगळ्या आकार आणि रंगांच्या वस्तू जमिनीवर पसरवून एकाच रंगाच्या किंवा आकाराच्या वस्तूंचा गट करणे. दिलेल्या वस्तूंची तुलना करून त्यांच्यातील साम्य आणि फरक ओळखण्यास सुचविणे. तसेच साम्य आणि फरक कोणत्या आधारावर ओळखता येते याबद्दल चर्चा करणे. इयत्ता – 2 1. वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या वस्तूंचे गट करण्यास सांगणे. इयत्ता – 3 सूचनेप्रमाणे फक्त एकाच रंगाच्या किंवा आकाराच्या वस्तू वेगळ्या करून गट करणे. | |
सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये. ( मुलांच्या कृती | सामर्थ्य : सूक्ष्म चालना कौशल्यांची अभिवृद्धि आणि सृजनशीलतेचा विकास, डोळे आणि हातांची सुसंगतता कृती 34 : आकृत्या चिकटवणे. ( ध्येय : 1 ) उद्देश : · वेगवेगळ्या आकृत्या ओळखणे. · कात्रीने कागद कापून चिकटायची पद्धत शिकणे. · हात आणि बोटांचे कौशल्य वृद्धिंगत करण्याबरोबरच एकाग्रता विकसित करणे. आवश्यक साहित्य : रंगीत पेपर, कात्री, डिंक पद्धत : पांढऱ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या आकृत्यांची ( वर्तुळ, त्रिकोण, चौरस आणि आयत ) चित्रे कापून दुसऱ्या एका रंगीत पेपरवर चिकटायला सांगणे. | |
भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता |
श्रवण करणे व बोलणे | सामर्थ्य : शब्द रचना कृती 10 : शब्दरचना ( गट -2 ) ECL-10 उद्देश : v शब्दरचना कौशल्य वृद्धिंगत करणे. v शब्दभांडार वाढविणे. आवश्यक साहित्य : नाही पद्धत : मुलांना वर्तुळाकार उभे करून स्पष्ट सूचना देवून कृतीला सुरुवात करणे. v मी सांगितलेलं अक्षरे ऐका. v अक्षरे जोडून शब्द रचना करून सांगा. उदा: शिक्षकांनी जोराने ‘स’(थोडा वेळ शांत राहून ) ‘र’ असे उच्चारल्यास मुले अक्षरे ऐकून ‘सर’ अशी शब्द रचना करतील. ही कृती शिक्षक टप्याटप्याने तीन अक्षर आणि चार अक्षरी शब्द तयार करण्यासाठी वापरतील. टीप: 2 री ची मुले एका अक्षराला संबंधित 2-3 शब्द सांगतील. 3 रीची मुले 2 री च्या मुलांनी सांगितलेले शब्द वापरून स्वतः वाक्य रचना करतील. सराव पत्रक : EC – 4 ( वर्ग : 1,2,3 ) |
| आकलानासहित वाचन | सामर्थ्य : शब्दभांडाराची अभिवृद्धि, स्वयं अभिव्यक्ती, घटना वाचतात. कृती : 1 ए : अंदाजित वाचन करणे ( ध्येय : 2 ) उद्देश : अंदाज बांधून पुस्तकातील चित्रांचा संबंध जोडून वाचन करतील. आवश्यक साहित्य : सचित्र निर्देशिका / सचित्र गोष्टीचे पुस्तक पद्धत: मुले पुस्तकातील चित्रे पाहून स्वतः अंदाज बांधून वाचन करतील. 2 री आणि 3 री च्या मुले त्यांच्या आवडत्या गोष्टी सांगणे आणि चित्र काढून वाचन करण्यास वाव देणे. |
| उद्देशीत लेखन | सामर्थ्य : इतर मुलांसह लेखन, उद्देशीत लेखन, निरीक्षण आणि श्रवण, सृजनशील विचार, शब्दभांडार अभिवृद्धि. कृती 32 : सामुहिक लेखन ( ध्येय – 2 ) ECW-8 उद्देश : · सामुहिक लेखनाची ओळख करून देणे. · उद्देशीत लेखनाच्या पायऱ्यांचा सराव करणे. · लक्षपूर्वक उद्देशीत लेखन आकर्षक बनविणे. · सृजनात्मक विचार करून लेखनातून व्यक्त होणे. · शब्दभांडाराची अभिवृद्धि करणे. आवश्यक साहित्य : फळा, ड्रॉईंग पेपर पद्धत : सामुहिक लेखन कृती महिन्यातून दोन अथवा तीनदा आयोजित करणे. एक विषय घेवून त्या विषयाला संबंधित त्यांचे अनुभव गोष्टीच्या स्वरूपात किंवा लेखनाच्या स्वरूपात मांडणे. उदा: विषय – माझी शाळा लक्षात घ्यावयाचे अंश- · प्रत्येक विषयाला संबंधित वाक्ये तयार करण्यासाठी आवश्यक संकेत देणे. शिक्षकांनी मुलांसह स्वतः सहभाग घेवून लेखनाचे प्रात्यक्षिक दाखविणे. · शिक्षक पहिले वाक्य लिहून वाचणे. नंतर मुलांना त्यांचं स्वतःचं वाक्य सांगून लिहायला सांगणे. · मुलांना त्यांच्या स्थानिक भाषेतून प्रतिसाद देण्याची संधी उपलब्ध करून देणे. नंतर शिक्षक सर्वांना प्रमाण भाषेत भाषांतर करून सांगणे. टीप: 1 ली च्या मुलांनी सांगितलेले मुद्दे 2 री आणि 3 री च्या मुलांनी लिहून व्यक्त होण्यास सांगणे. |
| आदर्श लेखन : शिक्षक मुलांसमोर फलक लेखन करणे. लेखनाचा योग्य क्रम पाहण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देणे. मुलांची नावे व मुलांनी काढलेल्या चित्रांची नावे वगैरे मुलांसमोर लिहिणे. शिक्षक वर्गात जे काही फलक लेखन करतील ते मुलांना व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने करावे. | |
मैदानी खेळ | कृती पुतळ्यासारखे उभे राहा. सामर्थ्य : एकाग्रता वाढविणे, सूचना पालन, पायांची हालचाल आवश्यक साहित्य : नाही पद्धत: शिक्षक Fire in the mountain Run Run Run… असे म्हटल्यानंतर मुले पळायला लागतील. मग मध्येच शिक्षक statue असं म्हणताच मुले पळायचे थांबवून आहे त्या स्थितीत पुतळ्यासारखे एकाच जागी थांबले पाहिजेत. हालचाल करणारी मुले खेळातून बाहेर जातील. 2 री आणि 3 री च्या मुलांना वेगवेगळ्या योगाच्या आसनात थांबायची सूचना देणे. | |
रंजक कथा | Ø शीर्षक : सोनी आणि टोमॅटो Ø आवश्यक साहित्य : मुखवटे Ø उद्देश : Ø ऐकण्याचे कौशल्य वृद्धिंगत करणे. Ø शब्दभांडार वृद्धिंगत करणे. Ø कुतुहूल निर्माण करण्याचे कौशल्य विकसित करणे. पद्धत: Ø गोष्ट मराठी, इंग्लीश आणि कन्नड भाषेत सांगणे. Ø पात्रांनी लगेच तयार होण्यासाठी मुखवटा घालून बोलणे. Ø मोठ्या वर्गातील मुलांना घेवून पात्रे ठरवून अभिनय करायला सहकार्य करणे. Ø गोष्टीचे कथानक मनोरंजनात्मक बनविणे. v गोष्ट सांगून झाल्यानंतर प्रश्न विचारा. ( गोष्टीचा आनंद घेण्याबरोबरच लक्षपूर्वक ऐकत आहेत याची खात्री करून घेणे. ) | |
पुन्हा भेटू | · दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे. · दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे. · दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे. · ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे. |