विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ
बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
विद्याप्रवेश – दैनंदिन कृती
आठवडा – 3
दिवस – 15
तासिका | कृतींचे विवरण | |
अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज) | कृती : 1 प्रत्येक मुलाला तिच्या/त्याच्या नावाने बोलावून “Good morning, welcome ” “Have a wonderful wednesday” असे म्हणून मुलांचे स्वागत करणे.मुले “Good morning Thank you. Same to you” असे प्रत्युत्तरादाखल म्हणतील व हस्तांदोलन करतील. कृती: 2 – 13 व्या दिवशी परिचित केलेली ‘अभिवादन’ या तासिकेतील कृती पुनरावर्तीत करणे. | |
गुजगोष्टी | कृती: स्वतः समजून घे. आवश्यक साहित्य: मानवी शरीराच्या अवयवाचे दृकपट्ट्या(Flascards), चेंडू, मोबईल/ध्वनिक्षेपक पद्धत: 1. मुलांना वर्तुळाकार बसवून दृकपट्ट्या(Flascards) मध्यभागी ठेवणे. 2. पासिंग बॉल( passing ball)हा खेळ संगीताच्या सहाय्याने खेळविणे. 3. संगीत( Music)थांबले असता ज्या मुलाच्या हातात चेंडू असेल त्याने दृकपट्ट्या(Flascards) पैकी एक निवडणे व त्याचे नाव ओळखणे.व तो अवयव शरीरावर दाखविणे.उदा:तो/ती हात उंचावते, व जोरात हात असे उच्चारणे.तसेच शरीराचे अवयव इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा उचारावेत.संगीत(Music) सुरु ठेवून खेळ पुन्हा सुरु करणे.सर्व मुलांना संधी मिळेल याची खात्री करणे. शरीराच्या अवयवाचे कार्य विचारणे – मी तोंडाने बोलतो,पायाच्या सहाय्याने चालतो/नृत्य करतो/पळतो/उड्या मारतो, हात-मी लिहितो/काम करतो/खेळतो. अशी उत्तरे मुले देण्यासाठी प्रेरित करणे. सूचना: शिक्षक आपल्या स्वताचे काही प्रश्न विचारू शकतात.आणि मुलांना आपल्या स्थानिक भाषेत बोलण्यास प्रेरित करणे.) कृती: ऱ्हाईम (Rhyme) Head, shoulders, knees and toes पद्धत: § तालबद्ध व योग्य अभिनयासहित ऱ्हाईम (Rhyme) मुलांना सादर करून दाखविणे. § शरीराचे अवयव इंग्रजी भाषेमध्ये परिचित करून देणे. § काही सोपे प्रश्न विचारणे.
| |
माझा वेळ (Free Indore play) | अध्ययन सिद्धतेचा भाग असलेल्या 8 अध्ययन कोपऱ्या मध्ये पहिल्या टप्प्यात निश्चित केलेल्या अध्ययन कोपरेनुसार कृती विषयी तसेच त्या अध्ययन कोपऱ्यात ठेवायच्या सामग्री वापरावयाची पद्धत मुलांना समजावून सांगणे.मुलांना प्रश्न विचारून त्यांना ते समजले आहे याची खात्री करून घेणे. (अध्ययन कोपरेनुसार कृती दिलेल्या आहेत त्याशिवाय शिक्षकांनी सामर्थ्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने अतिरिक्त कृतीची योजना आखावी.) ************************************************************************* अध्ययन कोपरा – बिल्डींग ब्लॉक्स कोपरा : सामर्थ्य – हात व डोळे यांचा समन्वय साधतो. कृती: आकाराच्या आधारे वस्तू जोडणे. उद्देश : 4 ते 5 ब्लॉक्स/ वस्तू जोडणे. आवश्यक साहित्य : अध्ययन किट मधील ब्लॉक्स( उपलब्द नसल्यास -रिकाम्या काडीपेट्यां,विविध आकाराची पुस्तके, कोलगेट बॉक्सेस.) पद्धत: आकारमानाच्या आधारे साहित्य एकमेकावर जोडणे/रचणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना- 2 भिन्न प्रकारच्या वस्तू एकमेकावर रचून त्या वस्तू मोजणे आणि उंचीची तुलना करणे. ****************************************************** गणित अध्ययन कोपरा – सामर्थ्य : वस्तूंचे आकारमान, उंच-ठेंगणा, जड-हलका या आधारे वस्तूंचे वर्गीकरण करतात. आणि सांकेतिकरित्या संख्यांची तुलना करतात. कृती:चला …..थोडे चालूया…… उद्देश : सूचनांचे पालन करून स्वतंत्ररीत्या कार्यमुखी बनणे. आवश्यक साहित्य: खडू. पद्धत : वर्गामध्ये जमिनीवर वक्र/सरळ रेषा ओढून मुलांना त्यावरून चालण्यास सांगणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना चाललेले अंतर पायाच्या एककात मोजण्यास सांगणे. ******************************************************************************** संशोधन/विज्ञान अध्ययन कोपरा – सामर्थ्य : वैज्ञानिक, संशोधन वृत्ती आणि तार्किक मनोभाव विकसित होतो. कृती: रंगांची गम्मत…..( ध्येय-3) विविध रंग मिसळून नवीन रंग तयार करण्याविषयी जाणून घेणे. आवश्यक साहित्य: पारदर्शक प्लास्टिक पेला, पाणी , रंग. पद्धत : वविध रंग पाण्यात मिसळून नवीन तयार होणाऱ्या रंगाचे निरीक्षण करण्यास सांगणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना दोन मुलभूत रंग मिसळून नवीन तयार होणाऱ्या रंगाचे निरीक्षण करण्यास सांगणे. ****************************************************** बाहुल्यांचा अध्ययन कोपरा – सामर्थ्य: सौंदर्योपासना, अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करणे. कृती: बाहुल्या जोडणे. उद्देश: विविध आधारावर बाहुल्यांचे वर्गीकरण करणे. आवश्यक साहित्य: विविध प्रकारच्या बाहुल्या ( विविध आकाराचे प्राणी,पक्षी,मानव,वाहने इत्यादी) पद्धत : 1.दोन बाहुल्यांचे गट करण्यास सांगणे. 2. तीन बाहुल्यांचे गट करण्यास सांगणे. मुले आपल्या स्वतःच्या कल्पनेने बाहुल्यांची रचना/मांडणी करतील.( आकारमानाच्या आधारे,क्रमवार,प्राणी,पक्षी,मनुष्य,यांचे गट,मनुष्यासोबत कुत्रा/पक्षी व झाडे अशाप्रकारे रचना/मांडणी करणे.) टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना गट करण्याचे कारण विचारणे. ****************************************************** वाचन कोपरा – सामर्थ्य : चित्र वाचनाबरोबरच अर्थ ग्रहण, कल्पना शक्ती, अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे. कृती – चित्रवाचन ( Picture Reading) उद्देश: चित्र ओळखण्याबरोबर स्पष्ट वाचन करणे. आवश्यक साहित्य:क्रियापदयुक्त चित्रे/तक्ते. पद्धत: चित्र पाहून क्रियापद ओळखण्यास सांगणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना क्रियापद ओळखण्याबरोबर योग्य हावभाव/अभिनय करण्यास सांगणे. *********************************************************************************** कलेचा कोपरा सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू ची वाढ, सौंदर्योपासना, सृजनशीलतेचा विकास. कृती : कापसाचे बोळे चिकटविणे. उद्देश: दिलेल्या सूचनांचे आकलन करून घेवून कार्यमुखी होणे. आवश्यक साहित्य: कापूस, ड्राइंग पेपर, डिंक पद्धत: शिक्षक मुलांना अक्षरे/आकृत्या/रेखाकृती काढलेले ड्राइंग पेपर देतात.आणि त्यावर कापसाचे बोळे चिकटविन्यास सांगणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना चित्रात दाखविल्याप्रमाणे चेहऱ्याचा भाग रेखाटण्यास सांगणे. ****************************************************** लेखन कोपरा : सामर्थ्य: लेखन सरावामध्ये व्यस्त होवून अक्षरांचा आकृतिबंध( Patterns) रचतात. कृती: चला लेखन करू……( ध्येय-3) उद्देश: अक्षरांचा आकृतिबंध रचनेसाठी आवश्यक पूर्वतयारी करणे. आवश्यक साहित्य: वाळूयुक्त ट्रे ( Sand Tray) पद्धत: वाळूच्या ट्रे ( Sand Tray) मध्ये हाताच्या बोटाच्या सहाय्याने अक्षरांचा आकृतिबंध( Pattern) रेखाटण्याचा सराव करण्यास सांगणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना वाळूच्या ट्रे ( Sand Tray) मध्ये हाताच्या बोटाच्या सहाय्याने विविध अक्षरे (मराठी तसेच इंग्रजी ) रेखाटण्याचा सराव करण्यास सांगणे. ****************************************************** : अध्ययन कोपरा –करून पहा…. सामर्थ्य : तर्कशक्ती, सृजनशीलता,स्वतंत्ररीत्या कार्य करण्यास कार्यक्षम बनतात….. कृती: जोडून पाहू…. उद्देश: सुसंगत आणि क्रमबद्ध वस्तूं जुळवणे…. आवश्यक साहित्य: चिंचोके, मणी,बटणे,खडे पद्धत: शिक्षकांनी सरळरेषा, वक्ररेषा, आकृत्या रेखाटून देणे,मुलांना वरील साहित्यांचा वापर करून रेषावरून जोडण्यास सांगणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना त्यांनी स्वतः काढलेल्या चित्राच्या सहाय्याने वरील कृती करण्यास सांगणे. ********************************************** |
पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती) | सामर्थ्य : ओळख, स्मृती, परिसर जागरूकता कृती 16 : गटाशी संबंधित नसलेली वस्तू ओळखणे. ( ध्येय – 3 ) उद्देश : गटाशी संबंधित नसलेली वस्तू ओळखणे. आवश्यक साहित्य : फळे आणि भाज्यांचे नमुने , पेन्सिल आणि पेनचा सट, त्रिकोणाकार पुठ्ठे/ वस्तू आणि एक गोल, प्राणी आणि पक्ष्यांच्या चित्रांचा सट ( प्रत्येक साहित्याचे 3 सट पद्धत : प्रत्येक सटात तीन एकाच प्रकारच्या वस्तू आणि एक वेगळ्या प्रकारची वस्तू घेवून अशाप्रकारचे अनेक सट तयार करणे. मुलांच्या प्रत्येक गटाला एक-एक सट देणे. मुलांना त्या वस्तूंचे सूक्ष्म निरीक्षण करण्यास सांगणे. वेगळी किंवा गटात न जुळणारी वस्तू ओळखून त्याचे कारण विचारणे.प्रत्येक गटातील मुलांनी या कृतीमध्ये भाग घेवून त्यांना दिलेल्या वस्तूंमधील वेगळी वस्तू कशी निवडली याचे वर्णन करायला सांगणे इयत्ता 2 री : 1. साहित्य घेवून गटात न जुळणारी वस्तू ओळखायला सांगणे. इयत्ता 3 री : 1. गटात न जुळणारी वस्तू ओळखणे, सांगणे आणि त्याचे विवरण करणे. * वापरायची सराव पत्रके : I.L-13 (1 ली, 2 री, 3 री ) | |||
सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्य ( मुलांची कृती ) | सामर्थ्य : सूक्ष्म चालना कौशल्य विकास आणि सृजनशीलतेचा विकास. कृती 47 : ब्रश वापरून चित्र रंगवणे ( ध्येय – 1 ) उद्देश : · ब्रश पकडण्याची आणि वापरायची पद्धत समजून घेणे. · हात आणि डोळे यांच्यामध्ये सुसंगतता वाढवणे. आवश्यक साहित्य : ब्रश, रंग पद्धत : पांढऱ्या पेपरवर रंग आणि ब्रश कसा वापरावा हे मुलांना दाखवा. मुलांना त्यांच्या आवडीची चित्रे काढण्याची संधी देणे. नंतर त्या चित्राला ब्रशने रंग भरायला सांगून चित्राचे वर्णन त्यांच्या भाषेत करण्यास प्रोत्साहन देणे. टीप : 2 री आणि 3 रीच्या मुलांना निसर्गाशी संबंधित चित्र काढून रंग भरण्यास सांगणे. | |||
भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता
| श्रवण करणे व बोलणे | सामर्थ्य : चित्र वाचन कृती 17 : तोंड काय काय बोलते? ( ध्येय – 2 ) ECL-9 उद्देश : * सांगितलेल्या शब्दासाठी चेहऱ्यावर योग्य हावभाव व्यक्त करणे. * हावभावासाहित वेगवेगळ्या भावना मुखाने व्यक्त करणे. आवश्यक साहित्य : गोष्टीची पुस्तके / चित्रफीत पद्धत : वेगवेगळ्या भावना व्यक्त करत असलेली चित्रे असलेली गोष्टीचे पुस्तक निवडा. मुलांना चित्र दाखवून चित्रामधील व्यक्ती कोणत्या भावना व्यक्त करत आहे हे ओळखायला सांगणे. उदा : चित्रातील मुलगी आनंद व्यक्त करत आहे. चित्रातील मुलगा दुखी आहे इत्यादी. जोपर्यंत चित्ररूपातील भावना प्रत्येक मुलगा ओळखत / दर्शवत नाही तोपर्यंत ही कृती चालू ठेवा. नंतर गोष्ट वाचून सांगा. त्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या भावनांना संबंधित शब्द ओळखायला सांगा. शेवटी गोष्टीला संबंधित प्रश्न विचारून उत्तरे मिळवा. उदा: *…………. ही घटना घडताना ……….. ला कसे वाटले ? * नवीन कपडे घातल्यानंतर ……… ने कशी प्रतिक्रिया दिली. पुढील टप्प्यात मुलांना त्यांचे डोळे बंद करून या प्रश्नांना भावाभिनय करून उत्तर द्यायला सांगा. नंतर मुलांना मुद्रणाची संकल्पना विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या भावनांचा तक्ता तयार करण्यास मार्गदर्शन करा. मुलांना वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे चेहरे रेखाटण्याची संधी देणे. टीप : 2 री च्या मुलांनी एक झाल्यानंतर 2-3 हावभाव व्यक्त करणे. 3 रीच्या मुलांनी जास्तीत जास्त चेहऱ्यावरील हावभाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे. सराव पत्रके : EC ( इयत्ता 1 ली, 2 री, 3 री ) | ||
आकलानासहित वाचन | सामर्थ्य : शब्द ओळखणे, छापील मजकुराची जाणीव, अर्थग्रहण, शब्द भांडार वाढविणे. कृती 11 : नावांच्या जगात उद्देश : परिचित संदर्भातील वस्तूंचा लिपी संकेतांशी संबंध जुळविणे. साहित्य आणि वस्तू एकच आहेत या निष्कर्षावर येणे आणि वाचनाची आवड निर्माण करणे. आवश्यक साहित्य : वही, कार्डशीट पेपर, पेन्सिल, क्रेयोन्स, सभोवताली आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू. पद्धत : – मुलांच्या मदतीने वर्गामध्ये असणाऱ्या सामान्य / परिचित वस्तूंच्या नावाची पट्टी तयार करणे. उदा: टेबल, खुर्ची, दरवाजा.. इत्यादी. – तयार केलेली नावांची पट्टी (नामफलक) त्या त्या वस्तूला चिकटविणे. – त्याच नामफलकांचा अजून एक सट फ्लॅशकार्ड तयार करून ठेवणे. – शब्दांचे फ्लॅशकार्ड वर्गात दाखवून, मुलांकडून मोठ्याने वाचून घेणे. – शब्द उच्चारल्यानंतर मुलांनी ती वस्तू हाताने दाखवावी. _ प्रत्येक मुलाने कमीतकमी 4 – 5 वस्तूंची नावे सांगण्यास संधी देणे. _ ते शब्द गोष्टीमध्ये आल्यानंतर ओळखण्यास प्रेरित करणे. – चित्रासहीत नामफलक / फ्लॅशकार्ड तयार करून, कृतीच्या ठिकाणी / वेळेला मुलांना ओळखून वाचण्यास ( चित्रांच्या सहाय्याने ) संधी देणे. 2 री आणि 3 रीच्या मुलांनी गोष्ट / मजकुरात आलेल्या मुख्य शब्दांचे फ्लॅशकार्ड तयार करणे. मुलांना शिक्षकांनी गोष्ट / मजकूर देवून वाचण्यास प्रोत्साहन देणे. नंतर फ्लॅशकार्डमधील शब्द गोष्टीमध्ये शोधण्याची सूचना करणे. टीप : याआधी या कृतीमध्ये घेतलेले शब्द सोडून वेगवेगळी ठिकाणे, संदर्भात येणारे शब्द घेवून कृती पुढे चालू ठेवणे. | |||
उद्देशीत लेखन | सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू कौशल्य अभिवृद्धि, उद्देशीत लेखन कृती 37 : चित्र काढणे आणि नाव देणे ( ध्येय – 2 ) ECW-3 उद्देश : · सूक्ष्म स्नायू कौशल्यांचा विकास करणे. · उद्देशीत लेखनाशी जुळवून घेणे. · आवडीचे चित्र काढणे. · आवश्यक साहित्य : पेपर, क्रेयोन्स, पेन्सिल · पद्धत : मुलांना त्यांच्या आवडीच्या फुलाचे, फळाचे चित्र काढण्यास सांगणे. काढलेल्या चित्रात रंग भरून त्या चित्राला नाव देण्यास सांगणे. · टीप : 2 री आणि 3 रीच्या मुलांना त्यांच्या आवडीच्या फुलाचे, फळाचे चित्र काढण्यास सांगणे. काढलेल्या चित्रात रंग भरून त्या चित्राला नाव देण्यास सांगणे. | |||
| आदर्श लेखन : शिक्षक मुलांसमोर फलक लेखन करणे. लेखनाचा योग्य क्रम पाहण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देणे. मुलांची नावे व मुलांनी काढलेल्या चित्रांची नावे वगैरे मुलांसमोर लिहिणे. शिक्षक वर्गात जे काही फलक लेखन करतील ते मुलांना व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने करावे. | |||
मैदानी खेळ | कृती : लंगडी सामर्थ्य : शरीराचे संतुलन वाढवणे आवश्यक साहित्य : जिबली, रंगीत खडू जमिनीवर रंगीत खडूच्या सहाय्याने चौरस काढणे. मुलांना चौरसाच्या रेषेवर जिबली ( लहान सपाट दगड ) ठेवून एक पाय उचलून दुसऱ्या पायाने ( लंगडी घालत ) ती एका चौकातून दुसऱ्या चौकात ढकलत खेळ खेळणे. 2 री आणि 3 री च्या मुलांनी हा खेळ पुढे खेळत राहणे.
| |||
रंजक कथा | शीर्षक : सोनी, टोमॅटो आवश्यक साहित्य : चित्रे उद्देश : Ø श्रवण कौशल्य विकसित करणे. Ø शब्दभांडार वाढविणे. Ø पद्धत : Ø मुलांना साहित्यातील चित्रे दाखवून गोष्टीतील पात्रे / वस्तूंची नावे सांगण्यासाठी सोपे प्रश्न विचारून गोष्ट पुन्हा सांगणे. Ø गोष्टीतील वाक्ये वाचताना गोष्टीमध्ये येणारी सोनी, टोमॅटो इत्यादी चित्रांची मुलांनी नावे सांगण्यासाठी प्रश्न विचारत गोष्टीचा समारोप करणे. ( गोष्टीचा आनंद घेण्याबरोबरच लक्षपूर्वक ऐकत आहेत याची खात्री करून घेणे. ) | |||
पुन्हा भेटू | · दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे. · दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे. · दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे. ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे. |
Paper
SSLC MODEL QUESTION PAPERS
MODEL QUESTION PAPERS
SA2 Question Papers
MODEL PAPERS
question papers
SA1 Question Papers
- CLASS- 4
- CLASS - 5
- CLASS - 6
