Vidya Pravesh Ka Va Kase? (विद्याप्रवेश का व कसे?)
 

Vidya Pravesh Ka Va Kase? (विद्याप्रवेश का व कसे?) 

विद्याप्रवेश – अर्थ आणि महत्व

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे शिक्षणाला नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे.
जागतिक बदलांना अनुसरून शैक्षणिक विचार, अध्यापन उपक्रम आणि वर्ग प्रक्रीयांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेनुसार आणि मुलाच्या शिकण्याच्या संधीनुसार योग्य कृतींची रचना करून शिकण्याची कमतरता दूर करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.

Vidya Pravesh Ka Va Kase? (विद्याप्रवेश का व कसे?)

सन् 2022-23 शैक्षणिक वर्षात ‘विद्याप्रवेश’ (1 ली ते 3 री वर्गांना) या अभिनव शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाद्वारे शिक्षण खाते आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे.
कोव्हीड – 19 मुळे प्रत्येक मुलाच्या अध्ययनात अडथळा निर्माण झाला आहे, हे आपण मान्य केले पाहिजे.
मुलाला शालेय वातावरणाशी जुळवून घेण्यासंदर्भात आम्हाला अनेक घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वर्गप्रक्रियेमध्ये केवळ भौतिकदृष्ट्या जुळवून घेणे मर्यादित नसून भावनिक आणि सामाजिकदृष्ट्याही जुळवीन घेणे अत्यावश्यक आहे.
• या पार्श्वभूमीवर 3 मुख्य ध्येयांसह विद्याप्रवेश कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. ते
म्हणजे….

निपुण भारत आधारित तीन मुख्य ध्येये

उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य व्यवस्थापनात मुलांना सक्षम करणे.(Children Maintain Good Health & Well Being-H.W)

मुलांना परिणामकारक संवादक बनविणे. (Children became an Effective Communicators – E.C.)

सक्रीय अध्ययनार्थी म्हणून परिचित वातावरणाशी मुलांनी संपर्क साधणे. (Children become involved learners and connect with their immediate environment (IL).

विद्याप्रवेश – काय? व कशासाठी?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आशयाप्रमाणे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्याच्या अथवा बारा आठवड्यांच्या ‘खेळता खेळता शिकूया तत्वांवर आधारित ‘विद्याप्रवेश’ शाळा सिद्धता कार्यक्रमाची शिफारस करण्यात आली आहे.

कोविड सांक्रमिक घटनेमुळे शालेय शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुलांचे शाळेमध्ये स्वागत करणे व अध्ययन प्रक्रियेशी त्यांची पुनर्जोडणी करण्याची संधी इथे आपल्याला मिळत आहे.

सर्व मुलांना घरी आणि शाळेमध्ये आनंदी, आपुलकीचे, सुरक्षित व अध्ययनपूरक वातावरण निर्माण करण्याच्या अगत्यतेमध्ये विद्याप्रवेश मार्गदर्शक ठरते..

मुलांना तणावमुक्त वातावरणात शिकण्याची संधी देण्याबरोबरच दिव्यांगाच्या गरजा ओळखण्याकडेही येथे लक्ष देण्यात आले आहे. मुलांची मातृभाषा आणि घराच्या भाषेचा स्वीकार करण्याबरोबरच अन्य भाषेच्या अध्ययनाला देखील संधी देण्यात आली आहे तसेच सांकेतिक भाषेलाही महत्व दिले आहे.
 

विद्याप्रवेशचे महत्व

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आशयानुसार विद्याप्रवेशची निर्मिती झाली असली तरी संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी ही शाळा सिद्धता योजना आहे.

● इयत्ता पहिलीच्या मुलांना बौद्धिक, मानसिक, शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या तयार करणारी चौकट आपल्याला याद्वारे मिळते.

● मुलाच्या मुक्त अध्ययनाला मानसिक विकासाच्या वलयातून शैक्षणिक मनोवैज्ञानिक वलयाकडे घेऊन जाणाऱ्या कृतींची रचना करण्याची संधी यामुळे मिळते.

 

विद्याप्रवेश व्याप्ती

● इयत्ता पहिलीचे आरंभिक तीन महिने किंवा बारा आठवड्याचा कालावधी.

● शालेय शिक्षणाच्या पहिल्या पाच वर्षाच्या टप्प्यामध्ये विद्याप्रवेशची व्याप्ती जाणून घेता येईल.

● दररोज आठ अवधीप्रमाणे आठवड्यातील पाच दिवस यासाठी ठरविण्यात आले आहेत.

● अध्ययन वेळ हा आठ अवधींसाठी सिमित करण्यात आला असून नियोजित कृतीनुसार वेळेची तडजोड करण्याची मुभा शिक्षकांना देण्यात आली आहे.

● प्रत्येक शनिवार हा आठवड्याभराच्या कृतींची उजळणी..
 

विद्याप्रवेश कार्यक्रमाचे उद्देश :

● विभिन्न पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतात, त्यांची शाळा सिद्धता करवून घेणे.

● सुलभ व मृदू धोरणाद्वारे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक,बौद्धिक,शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या शाळा सिद्ध बनविणें. .

● आनंददायक,खेलकेंद्रित वातावरणामध्ये मुलांच्या वायोमानाला अनुसरून मुक्त अध्ययन अनुभव देणे व सर्वागीण विकास साधने.

● खेळाद्वारे पायाभूत अक्षरज्ञान व अंकज्ञानाचे कौशल्य साध्य करणे.

विद्याप्रवेशचे अध्यापन तत्व

विद्याप्रवेशचे अध्यापन तत्व हे प्रामुख्याने खेळकेंद्रित असून बौद्धिक, भावनिक, आणि स्थूल स्नायूच्या चलन कौशल्याबरोबरच मूलभूत अक्षरज्ञान व अंकज्ञान यांच्या अभिवृद्धीसाठी प्रेरित करते.

मूलांच्या आवडीनिवडीना प्राधान्य देत संशोधन, समस्या परिहार, तार्किक विचार, ग्रहणशक्ती, कल्पनाशक्ती व सामंजस्य वाढविण्याची संधी यामधून मिळते.

या अध्यापन तत्वामध्ये शिक्षकांनी लक्षात घ्यावयाचे अंश म्हणजे 

1. खेळ         2. संवहन         3. परिसर
  

1. खेळ – 
खेळ केवळ विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासालाच मदत करीत नाही तर त्याच्या प्रगतीला प्रतिबिंबित करतो. जर अध्ययन अंश खेळ केंद्रित व परिसराशी निगडीत असेल तर मुलांच्या विकासाला अधिक मदत मिळते. खेळांमध्ये मुक्त खेळ आणि निर्देशित खेळ असे दोन प्रकार असून त्यांच्या महत्त्वाविषयी जाणून घेऊ.

मुक्त खेळ :- मुक्त खेळामध्ये मुलांची निवड, निर्णय घेणे तसेच इतरांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी मदत करतात. मुक्त खेळांमुळे मुले आवडीच्या खेळात इतर मुलांसोबत समरस होणे शिकतात. आसक्तीदायक वर्गखोलीची शिफारस करण्याबरोबरच संशोधक प्रवृत्ती,संगीतातील रुची आणि बाहुल्यांचा कोपरा तयार करण्यावरही येथे प्रकाश टाकण्यात आला आहे.

निर्देशित खेळ :- हे खेळ शिक्षकांच्या निर्देशनावर आधारित असून योग्य मार्गदर्शन देण्याद्वारे • खेळविले गेले पाहिजेत. मैदानी तसेच बैठ्या खेळांसाठी योग्य वातावरण निर्मिती करून या खेळांद्वारे अपेक्षित अध्ययन फल प्राप्त करता येते.

2. संवहन
1. मित्रांमधील संवहन किंवा संवाद
2. सामुग्रीसोबतचे संवहन किंवा संवाद
3. वडिलधारे किंवा शिक्षकांसोबतचे संवहन किंवा संवाद

3. परिसर :
मुले स्वाभाविकपणे कुतूहलपूर्ण असतात. प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये उत्सुकता असते.त्यांच्या उत्सुकतेचा स्वीकार करून त्याला प्रेरित करणाऱ्या कृतींची रचना आपण केली पाहिजे.

कौशल्याधारित वस्तू, करा व शिका कृतीसामुग्री, अंदाज बांधण्याचे कौशल्य वाढविण्यासाठी चित्रसरणी, मुक्त प्रश्नोत्तरमाला यांची नितांत आवश्यकता असते.
 

 

नियोजन आणि व्यवस्थापन

सुरुवातीच्या 3 महिन्यांच्या किंवा 12 आठवड्यांच्या शालेय तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या सूचना या हस्तपुस्तीकेमध्ये दिल्या आहेत. तथापि, शिक्षकांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार व स्थानिक संदर्भानुसार योजना आखल्या पाहिजेत.

मुलभूत सामर्थ्ये आणि अध्ययन निष्पत्ती यांना विकासात्मक ध्येयांतर्गत निर्धारित केले गेले असून या संबधित विवरण अध्याय – 2 मध्ये दिले असून शिक्षकांनी त्याचे अवलोकन करावे.

माझा वेळ ( Free Indoor Play ) या शीर्षकांतर्गत 8 प्रकारच्या अध्ययन कोपऱ्यांचा परिचय करण्यात आला असून शिक्षकांनी आवश्यक साहित्यांच्या संग्रहासहीत योजना तयार करणे.

दैनंदिन कृती निर्वहनाविषयी सर्व सूचना आणि मार्गदशन दिले असून भाग – 2 मध्ये त्यांचे सविस्तर वर्णन दिले आहे.

योजना तयार करण्याआधी शिक्षकांनी कृती/अभ्यासक्रम साठी लागणाऱ्या साहित्यांचा विचार करून, स्था निक संसाधने आणि खर्च न करावा लागणाऱ्या किंवा कमी खर्चिक वस्तू संग्रहित करून ठेवणे.

मुलांकडून पुनरावर्तीत कृती करून घ्यावयाच्या संदर्भात आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त अध्ययन कार्डाचा वापर करून मलांना अध्ययनामध्ये समाविष्ट करणे.
 

कृती कोपरे

Vidya Pravesh Ka Va Kase? (विद्याप्रवेश का व कसे?)
महत्वाचे अंश

सर्वप्रथम मुलांची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे . विविध पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांची मानसिकता व पूर्वीच्या अध्ययन स्थितीबद्दल जाणून घेणे खूप आवश्यक आहे..

आवश्यकता असल्यास प्रत्येक मुलाच्या घरी भेट देणे.

मुलाच्या कुटुंबासोबत सकारात्मक संबंध ठेवणे..

प्रत्येक मूल स्वतःच्या सामर्थ्यानुसार शिकत असते.

शिक्षकांचे मह्त्वपूर्ण कार्य म्हणजे मुलांना प्रेरित करणे. त्यांच्या कोमल मनाला प्रतीस्पंदन देणे, तसेच शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला प्रेमाने आणि आपुलकीने जोपासणे होय.

आपण योजना तयार केलेली असली तरी वर्गखोलीतील परिस्थिती आणि मुलांच्या आवडीला अनुसरून त्यामध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत.


योजना कार्यरुपात आणताना शिक्षक निर्देशित, विद्यार्थी निर्देशित आणि आंतरिक कृती तसेच बाह्य आणि लहान गटांमध्ये अनुष्ठान करावयाच्या कृती विसरता कामा नये.

• उपलब्ध स्थळीय सामुग्री, साहित्य किंवा बाहुल्यांचा वापर मुलांकडून सुलभ व सुरक्षितरीत्या केला जाईल याकडे अधिक लक्ष देणे.

 

विद्याप्रवेश शिक्षक मार्गदर्शिका
 
विद्याप्रवेशसाठी आवश्यक कृती कोपरे PDF स्वरूपात उपलब्ध आहेत
विद्याप्रवेश वेळापत्रक  

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *