SCHOOL REOPENING GUIDELINES BELGAVI
 
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय जिल्हा पंचायत बेळगावी 
तसेच उपनिर्देशक सार्वजनिक शिक्षण विभाग बेळगावी यांच्याकडून 2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा प्रारंभ व शैक्षणिक उपक्रम नियोजन विषयी सूचनांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे…  

 

SCHOOL REOPENING GUIDELINES BELGAVI
विषय – जिल्ह्यातील सर्व सरकारी अनुदानित अनुदानरहित,प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव आणि शैक्षणिक उपक्रम नियोजन करणेविषयी…

आदेश दि.  ०५/०५/२०२२ 

वरील विषयानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी अनुदानित अनुदानरहित,प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षांत एकरुप शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणी करावयाचा असल्याने शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम अंमलबजावणीसाठी करावी.प्रस्तुत वर्षातील सर्व शैक्षणिक वार्षिक क्रिया/उपक्रमांची सर्वसमावेशक अंमलबजावणी करण्यासाठी वार्षिक क्रिया योजना तयार करण्यात आली आहे.

मुख्याध्यापकांची जबाबदारी –
दि.15.05.2022 रोजी SDMC ची पूर्वतयारी सभा घेणे.
दि. 14.05.2022 रोजी 2022-23 हे शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने शाळा स्वच्छता कार्य हाती घेणे.तसेच शाळेतील ड वर्ग कर्मचारी नसतील तर पंचायत विकास अधिकाऱ्यानी पंचायतीच्या वतीने आपल्या व्याप्तीतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने स्वच्छता करून देण्याची सूचना देण्यात आली आहे. तरी यासाठी मुख्याध्यापकांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून स्वच्छता कार्य पूर्ण करावे.
शाळा प्रारंभ दिनादिवशी शिक्षण विभागाकडून पुरवलेले पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना देऊन ते सुरक्षितपणे ठेवण्यास सांगणे व सोबतच त्या पाठ्यपुस्तकांना कव्हर घालण्यास सांगणे.शिक्षण विभागाकडून पाठ्यपुस्तक पुरवठा झाले नसल्यास शाळेतील बुक बँक मधील पुस्तकांनी वापर विद्यार्थ्यांसाठी करावा.

येत्या शैक्षणिक वर्षापासून मॉडेल स्कूल प्रारंभ करण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या विषयी कार्य करणे.
माजी विद्यार्थी संघटनांकडून शाळेच्या विकासाची कामे करून घेणे.
Covid-19 चौथी लाट येण्याचा संभव असल्याने विद्यार्थ्यांना मास्क चा वापर करण्यास या सूचना देणे.तसेच विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देणे.
शाळा प्रारंभापासून पावसाळ्याची सुरुवात होत असून,शाळेच्या इमारतीच्या छतावर झाडे आणि इतर कचरा साचून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होऊ शकतो.त्यामुळे शाळेतील गळतीमुळे इमारतींचे नुकसान होऊ शकते,यासाठी मुख्याध्यापकांनी वेळोवेळी शाळा इमारतींचा छत स्वच्छ करणे आवश्यक आहे.
MDM ॲपमध्ये मध्यान्ह आहार योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या दुपारच्या जेवणाची हजेरी दररोज न चुकता अद्यावत करणे. सदर हजेरी MDM ॲपमध्ये अद्यावत करण्यास विसरल्यास किंवा चुकल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल व त्या दिवसाचा खर्च मुख्याध्यापकांनी भरावा लागेल.
एसडीएमसी / ग्राम पंचायत/ स्थानिकांची जबाबदारी:
SDMC/ग्रामपंचायत/स्थानिक लोकांनी शाळा प्रारंभ उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास सहकार्य करणे.
शाळेची स्वच्छता / किरकोळ दुरुस्ती आणि पूर्व-तयारी बैठकांना उपस्थित राहून सहकार्य करणे व मार्गदर्शन करणे.
सर्व वयोगटातील मुलांची तसेच गरजू मुलांनी शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी सहकार्य करणे.
प्रत्येक पंचायत स्तरावर ग्राम शिक्षण दलाची निर्मिती करणे आणि या ग्राम शिक्षण दलालांमार्फत पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी सभा घेऊन चर्चा करणे व योजना तयार करणे.
दाखलाती आंदोलन
 पात्र वयोगटातील मुलांची 100% नाव नोंदणी आणि उपस्थिती व्हावी यासाठी उपाययोजना करणे.दाखलाती आंदोलन 16.05.2022 ते 31.07.2022 पर्यंत पूर्ण करावी. 

 शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पात्र वयोगटातील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शाळेच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी शाळांमधील मुलांची माहिती एकत्रित करणे. 

कांही पालक स्थलांतर करण्याची शक्यता असू शकते हे लक्षात घेऊन त्यांच्या शाळा सोडणाऱ्या मुली असतील तर त्या मुलींचे वय पाहून त्यानुसार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात योग्य इयत्तेत
त्यांचे दाखलीकरण करणेविषयी कार्य करणे.
पंचायत विकास अधिकाऱ्यांची जबाबदारी:

ग्रामपंचायत विकास अधिकारी शाळा प्रारंभापासून एका आठवड्याच्या आत ग्राम शिक्षण दलाची बैठक घेऊन सर्व सदस्यांना शाळेच्या मूलभूत बाबींचा विचार करण्यासाठी आमंत्रित करणे.ज्यामध्ये शाळेची इमारत,दुरुस्ती,पिण्याचे पाणी,शौचालय,वीज,फर्निचर,शाळेचे कंपाऊंड, शाळेचे मैदान, किचन गार्डन इत्यादी विषयी चर्चा करून कमतरताची यादी करणे व नरेगा आणि इतर अनुदानातून सुविधा पुरविण्यासाठी पंचायत विकास अधिकार्‍ यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाची क्रिया योजना तयार करून दिली त्यांची पूर्तता करणे विषयी सूचना देण्यात आली आहे. 

आवश्यकतेनुसार शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी देणे.लसीकरण:

मुख्याध्यापकांनी आणि सहशिक्षकांन पात्र मुलांचे लसीकरण झाले आहे याची खात्री करावी आणि लसीकरण झाले नसल्यास त्या मुलांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे.प्रत्येक शाळेतील पात्र मुलांचे 100% लसीकरण होणे आवश्यक आहे.मिंचिन संचार-

16/05/2022 ते 30/05/2022 पर्यंत मिंचिन संचार उपनिर्देशक प्रशासन आणि उपनिर्देशक (अभिवृद्धी)डाएट,व्याख्याते,शिक्षणाधिकारी क्षेत्र शिक्षणाधिकारी,क्षेत्र समन्वय अधिकारी,सहाय्यक निर्देशक अक्षर दासोह,शिक्षण संयोजक, बी.आय.ई.आर.टी.,सीआरपी यांनी मिंचिन संचारची अंमलबजावणी करून समग्र शैक्षणिक उपक्रमांचे निरीक्षण करणे आणि ते समजून घेणे आवश्यक आहे. शैक्षणिक क्रियाकलापांचे क्रियाकलाप आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन प्रदान करणे आणि संबंधित कार्यालयास अहवाल देणे. (मिंचिन संचारचा नमुना डायट कडून देण्यात येईल.)


प्रशिक्षण:
डाएट बेळगावी यांचेकडून या वर्षाच्या अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रमाचे प्रशिक्षण तसेच अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाच्या अंमलबजावणीविषयी वेळोवेळी निरीक्षण करून मुलांसाठी गुणात्मक शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे आणि त्याचे दाखलीकरण करणे.
अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मासिक अहवाल देण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी डायट कनिष्ठ / वरिष्ठ व्याख्यात्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करणे.
 
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत आदेश पहा…
*2022-23 वर्षाचे मुल्यमापन वेळापत्रक*
*इयत्ता 4थी ते 10वी*
 
 
*2022-23 मध्ये 1ली ते 10 वी शाळेची वेळ असेल 10.00 ते 4.20*
 
असे असेल नियोजन
 
*16 मे 2022 पासून शाळा सुरू*
 
*येत्या शैक्षणिक वर्षात क्रियाकलाप व No Bag Day साठी उपक्रम यादी*
 
*शाळेतील राष्ट्रीय दिन व इतर कार्यक्रमाचे नियोजन*
 
 
*2022-23 या शैक्षणिक वर्षातील परीक्षा,मूल्यमापन,प्रतिभा कारंजी,क्रीडा स्पर्धा व इतर उपक्रम नियोजन*
 
 
 
*सन 2022-23 शैक्षणिक वर्ष नियोजन*
*महिनावार शाळा चालू दिवस व सुट्टीचे दिवस*
 
 
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *