भारतातील विविध क्षेत्रात आपले प्राविण्य दाखवणाऱ्याभारतीयाना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करण्यासाठी पुरस्कारांची परंपरा जपली आहे.त्यानुसार भारतातील कला,क्रीडा,साहित्य,राजकीय,सामाजिक इत्यादी क्षेत्रात कार्य करून भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तीना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या पुरस्कारातील कांही महत्वाचे पुरस्कार म्हणजे भारतरत्न,पद्मविभूषण,पद्मभूषण,पद्मश्री, परमवीर चक्र, महावीर चक्र,वीर चक्र, कीर्ती चक्र,इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार,ज्ञानपीठ पुरस्कार,राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार,द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादी या पुरस्कारांची थोडक्यात माहिती,त्यांची सुरुवात कधी झाली,पुरस्काराचे पहिले मानकरी इत्यादी माहिती खालीलप्रमाणे –
भारतरत्न–
या सर्वोच्च नागरी सन्मान देशासाठी सर्वोच्च काम करणाऱ्या भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मुळता कला साहित्य विज्ञान आणि सार्वजनिक सेवांमधील कामगिरीबद्दल देण्यात आला होता परंतु नंतर इतर क्षेत्रांचा समावेश करण्यात आला या पुरस्कारासाठी पंतप्रधान शिफारशी करतात आणि दरवर्षी जास्तीत जास्त तीन जणांना हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप – राष्ट्रपतींची स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदक व देऊन गौरविले जाते.
सुरुवात –1954
पुरस्काराचे पहिले मानकरी –1954
1.सी. राजगोपालचारी
2.सर्वपल्ली राधाकृष्णन
3. सी.व्ही.रामन
भारत रत्न पुरस्काराने सम्मानित व्यक्तीची यादी –
प्रणव मुखर्जी (2019)
भूपेन हजारिका (2019)
नानाजी देशमुख (2019)
मदन मोहन मालवीय (2015)
अटल बिहारी वाजपेयी (2015)
सचिन तेंडूलकर (2014)
सी.एन.आर. राव (2014)
पंडित भीमसेन जोशी (2008)
लता दिनानाथ मंगेशकर (2001)
उस्ताद बिस्मिल्लाह खान (2001)
प्रो.अमर्त्य सेन (1999)
लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई (1999)
लोकनायक जयप्रकाश नारायण (1999)
पंडित रविशंकर (1999)
चिदंबरम सुब्रमण्यम (1998)
मदुरै शनमुखावदिवु सुब्बुलक्ष्मी (1998)
डॉ. अबुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम (1997)
अरुणा आसफ अली (1997)
गुलजारी लाल नंदा (1997)
जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (1992)
मौलाना अबुल कलाम आज़ाद (1992)
सत्यजीत रे (1992)
मोरारजी रणछोड़जी देसाई (1991)
राजीव गांधी (1991)
सरदार वल्लभभाई पटेल (1991)
डॉ. भीमराव रामजी अम्बेडकर (1990)
डॉ. नेल्सन रोलिहलाहला मंडेला (1990)
मरुदुर गोपालन रामचंद्रन (1988)
खान अब्दुल गफ्फार खान (1987)
आचार्य विनोबा भावे (1983)
मदर टेरेसा (1980)
कुमारस्वामी कामराज (1976)
वराहगिरी वेंकट गिरी (1975)
इंदिरा गांधी (1971)
लाल बहादुर शास्त्री (1966)
डॉ. पांडुरंग वामन केन (1963)
डॉ. जाकिर हुसैन (1963)
डॉ. राजेंद्र प्रसाद (1962)
डॉ. बिधान चंद्र रॉय (1961)
पुरुषोत्तम दास टंडन (1961)
डॉ. धोंडे केशव कर्वे (1958)
पं गोविंद बल्लभ पंत (1957)
डॉ. भगवान दास (1955)
जवाहरलाल नेहरू (1955)
डॉ. मोक्षगुंडम विवेस्वराय (1955)
चक्रवर्ती राजगोपालाचारी (1954)
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमन (1954)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1954)
हा सन्मान मिळवणारे इतर व्यक्तींची यादी
पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… CLICK HERE
पद्मविभूषण–
भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्याही क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
पहिली व्यक्ती –सत्येंद्रनाथ बोस (1954)
पद्मभूषण–
भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्याही क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
पहिली व्यक्ती –होमी भाभा (1954)
पद्मश्री –
भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान कला क्रीडा शिक्षण साहित्य विज्ञान इत्यादी क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
पहिली व्यक्ती –आशादेवी (1954)
͢͢͢͢
परमवीर चक्र-
सर्वोच्च लष्करी पदक.
शत्रूशी प्रत्यक्ष लढताना दाखविलेले असामान्य शौर्य,धाडस,त्याग यासाठी हा पुरस्कार
दिला जातो.
पहिली व्यक्ती –सोमनाथ शर्मा (1947)
हा सन्मान मिळवणारे इतर व्यक्तींची यादी
पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… CLICK HERE
महावीर चक्र –
दुसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक तिन्ही दलातील जवानांना साधारण शौर्याबद्दल हे पदक दिले जाते हे पदक चांदीचे असते.
पहिली व्यक्ती- ब्रिगेडियर राजेंद्रसिंग (1948)
वीर चक्र –
तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक.तिन्ही दलातील जवानास उच्च प्रतीच्या शौर्याबद्दल हा सन्मान दिला जातो.हे पदक चांदीचे असते.
पहिली व्यक्ती- लेफ्टनंट कर्नल हिरानंद (1948)
अशोक चक्र-
रणांगणात शिवाय इतरवेळी दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल विषारी बद्दल दिले जाणारे सर्वोच्च लष्करी पदक
पहिले मानकरी –बचित्तर सिंग (1952)
शौर्य चक्र-
रणांगणाशिवाय इतरवेळी दाखवलेल्या उच्च प्रतीच्या शौर्याबद्दल त्या कामाबद्दल दिले जाणारी तिसरी सर्वोच्च लष्करी पदक.
पहिले मानकरी – मेजर पी.एस.गहून (1952)
कीर्ती चक्र–
रणांगणात शिवाय इतरवेळी दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल धाडसाबद्दल दिले जाणारे दुसरे सर्वोच्च लष्करी पदक.
पहिली व्यक्ती- कॅप्टन जोगिंदर सिंग (1952)
इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार –
राष्ट्रीय एकात्मतेसाठी असाधारण कार्य करणाऱ्या व्यक्तीस व संस्थेस हा पुरस्कार दिला जातो.
स्वरूप-10 लाख रुपये रोख,मानपत्र,मानचिन्ह.
पहिली व्यक्ती – स्वामी रंगनाथानंद (1987)
हा सन्मान मिळवणारे इतर व्यक्तींची यादी पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… CLICK
HERE
ज्ञानपीठ पुरस्कार–
भारतीय साहित्य क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वाबद्दल दिला जाणारा सर्वोच्च सन्मान
स्वरूप –11 लाख रुपये रोख,शाल,मानपत्र,मानचिन्ह (वाग्देवीची मूर्ती)
पुरस्कार मिळविणारे पहिले साहित्यिक – जी. शंकर कुरूप (1965)
हा सन्मान मिळवणारे इतर साहित्यिकांची यादी पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… CLICK
HERE
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार –
भारतीय खेळाडूंना दिला जाणार हा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे.मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीद्वारे प्राप्तकर्त्यांची निवड केली जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित केले जाते.
स्वरूप – पदक,प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपये रोख
हा सन्मान मिळविणारा पहिला खेळाडू – विश्वनाथन आनंद (1991-92) (बुद्धिबळ)
हा सन्मान मिळवणारे इतर खेळाडूंची यादी पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… CLICK HERE
द्रोणाचार्य पुरस्कार
क्रीडा आणि खेळातील उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप – विजेत्यांना द्रोणाचार्यांचा कांस्य पुतळा, प्रमाणपत्र,औपचारिक पोशाख आणि ₹ 15 लाखांचे रोख बक्षीस दिले जाते.
पुरस्कार मिळविणारे पहिले प्रशिक्षक – भालचंद्र भास्कर भागवत
या पुरस्काराबद्दल अधिक माहितीसाठी येथे स्पर्श करा… CLICK HERE