लोककल्याणकारी, रयतेचा जाणता राजा शिवछत्रपती !! –
छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले.शिवाजी हे नाव घेताच डोळ्यासमोर येते ते दणकट शरीर, बुद्धिमान, शौर्य व धैर्याची मूर्ती एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक शिवाजी महाराज हे स्वतः धर्मनिष्ठ हिंदू राजे होते.अशाच महान राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला.मराठवाडय़ातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे “शिवाजी” असे नामकरण करण्यात आले. महाराजांना राज्यशासनाचे आणि युध्द कौशल्याचे धडे राजमाता जिजाऊंकडुन मिळाले.