वर्ग व विषयानुसार शिक्षकांचे MAPPING कसे होणार?
प्रत्येक शिक्षकाला किती विषयांचे प्रशिक्षण मिळणार?
10.05.2022 पूर्वी 2 दिवसीय प्रशिक्षण पूर्ण होणार…
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे –
विषय – 2022-23 या शैक्षणिक वर्षात अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमांतर्गत (Learning Recovery Programme) सरकारी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेच्या शिक्षकांसाठी जिल्हा व ब्लॉक स्तरावर प्रशिक्षण आयोजित करणेबाबत…
सरकारी आदेश दि. १३/04/२०२२
आदेशातील कांही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे-
Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती हा उपक्रम आयोजित केला आहे.
दिनांक 18.03.2020 रोजी प्राथमिक व माध्यमिक तसेच सकाल सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कधी अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत उपनिर्देशक(अभिवृद्धी) व उपनिर्देशक(प्रशासकीय),Dy.P.C., सर्व डाएट चे नोडल अधिकारी तसेच क्षेत्र शिक्षणाधिकारी यांच्याशी अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाचे उद्देश रूपरेषा तयार झालेली अध्ययन साहित्य शिक्षक हस्तपुस्तिका परिचय जिल्हास्तरीय संपन्न अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व शिक्षक प्रशिक्षण यांचे नियोजन करणे विषयी चर्चा करण्यात आली आहे.
दिनांक 06/04/2022 रोजी माननीय प्राथमिक व माध्यमिक तसेच सकाळ सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमासंबंधी राज्यस्तरीय कार्यशाळेत शिक्षक संघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी तसेच जिल्हा स्तरीय पदाधिकारी यांना अध्ययन ताप्ती उपक्रमाचे उद्देश रूपरेषा संबंधित अध्ययन साहित्य शिक्षक हस्तपुस्तिका परिचय जिल्हास्तरीय संपन्न व्यक्तींचे प्रशिक्षण आणि शिक्षकांची प्रशिक्षण आयोजित करणे संबंधी योग्य ती पावले उचलावीत अशा सूचना देण्यात आले आहेत.
2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा पुनारंभ होईपर्यंत सरकारी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच भाषा व इतर विषयांचे सहशिक्षकांना अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.यासाठी अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रमाचे डायट नोडल अधिकारी,उपनिर्देशक कार्यालयातील या उपक्रमाचे अधिकारी यांच्या समन्वयाने प्रशिक्षण आयोजित करणे.
सरकारी प्राथमिक शाळा शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा स्तर व ब्लॉक स्तरावरील प्रशिक्षण आयोजित करणे संबंधी महत्त्वाचे मुद्दे –
सरकारी प्राथमिक शाळा शिक्षकांचे प्रशिक्षण स्तर –
1) 1ली ते 3री वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक
2) 4 ते 5 वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक
3) 6 ते 7 वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक
1.सरकारी प्राथमिक शाळा शिक्षकांचे प्रशिक्षणासाठी शिक्षकांचे मॅपिंग खालील प्रमाणे-
अ. जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक आणि मुख्याध्यापकांची प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.प्रत्येक ब्लॉकमधील 1 ते 3,4 ते 5 आणि 6 ते 7 वर्गांसाठी अनुबंध-1 नुसार शिक्षक मॅपिंग करणे.
आ. पहिली ते तिसरी वर्गांना शिकवणाऱ्या ब्लॉक मधील सर्व सरकारी शाळेतील प्रत्येक शिक्षकाला पहिली ते तिसरी विभागातील प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.
इ. चौथी ते पाचवी इयत्ताना एकच शिक्षक अध्यापन करत असेल तर त्या शिक्षकाला भाषा विषय किंवा कोर विषयाच्या प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.
जर 2 शिक्षक चौथी ते पाचवी इयत्ताना अध्यापन करत असतील तर एक शिक्षक भाषा विषयासाठी व दुसरा शिक्षक गणित विषयासाठी मॅपिंग करणे.
जर 3 शिक्षक चौथी ते पाचवी इयत्ताना अध्यापन करत असतील तर एक शिक्षक कन्नड भाषा विषयासाठी,दुसरा शिक्षक इंग्लिश भाषा विषयासाठी आणि तिसरा शिक्षक गणित विषयाच्या प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.
जर 4 शिक्षक चौथी ते पाचवी इयत्ताना अध्यापन करत असतील तर प्रत्येक शिक्षकांना क्रमवार कन्नड, इंग्लिश,गणित व परिसर अध्ययन विषयाच्या प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.
ई. सहावी – सातवी वर्गांना 2 शिक्षक अध्यापन करत असतील तर एक शिक्षक भाषा विषयासाठी व दुसरे शिक्षक कोर विषयासाठी मॅपिंग करणे.
सहावी – सातवी वर्गांना 3 शिक्षक अध्यापन करत असतील तर एक शिक्षक कन्नड भाषा विषयासाठी दुसरी शिक्षक गणित विषयासाठी व श्री शिक्षक विज्ञान किंवा समाज विज्ञान विषयासाठी मेकिंग करणे.
सहावी – सातवी वर्गांना 4 शिक्षक अध्यापन करत असतील तर कन्नड/इंग्लिश/हिंदी भाषा विषयासाठी एक शिक्षक, दुसरे शिक्षक गणित विषयासाठी आणि इतर शिक्षक विज्ञान किंवा समाज विज्ञान विषयाच्या प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.
सहावी – सातवी वर्गांना 5 शिक्षक अध्यापन करत असतील तर एक शिक्षक कन्नड भाषा विषयासाठी दुसरे शिक्षक इंग्रजी भाषा विषयासाठी,बाकीचे तीन शिक्षक क्रमाने गणित,विज्ञान,समाज विज्ञान विषयासाठी मॅपिंग करणे.
सहावी – सातवी वर्गांना 6 शिक्षक अध्यापन करत असतील तर प्रत्येक शिक्षकांचे क्रमाने कन्नड इंग्रजी,हिंदी भाषा विषयासाठी तसेच गणित,विज्ञान,समाज विज्ञान विषयांच्या प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.
उ. पहिली ते आठवी शाळेतील आठवी वर्गांना अध्यापन करणारे GPT/TGT/AGT शिक्षकांचे माध्यमिक (High School) शिक्षकांच्या विषयानुसार प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.तसेच अशा शाळेत फक्त तीन ते पाच शिक्षक असतील तर पहिली ते तिसरी साठी एक,चौथी ते पाचवीसाठी भाषा विषयासाठी एक आणि सहावी ते सातवी विज्ञान विषयासाठी मॅपिंग करणे.
ऊ. एक शिक्षक एकाच विषयाच्या प्रशिक्षणासाठी मॅपिंग करणे.
2.सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षणासाठी गट रचना पध्दत खालीलप्रमाणे.
अ. पहिली ते तिसरी विभाग- पहिली ते तिसरी अध्यापन करणाऱ्या ब्लॉक मधील प्रत्येक सरकारी शाळेतील प्रत्येक शिक्षकांचा समावेश करून प्रशिक्षणासाठी शिक्षकांची गट रचना करणे.
आ. चौथी ते पाचवी विभाग – मॅपिंग केलेल्या चौथी ते पाचवी वर्गाच्या शिक्षकांची विषयानुसार गट रचना करणे.
इ. सहावी ते सातवी विभाग – मॅपिंग केलेल्या 6वी ते 7वी वर्गाच्या शिक्षकांची विषयानुसार गट रचना करणे.
ई. प्रत्येक विषयानुसार प्रशिक्षणासाठी एक गट किमान 40 शिक्षकांचा असावा.तसेच 50 पेक्षा जास्त शिक्षक नसावेत.
जिल्हा स्तरावरील सरकारी प्राथमिक शाळा शिक्षकांची संपन्मुल व्यक्तींचे (M.R.P.) प्रशिक्षण संबंधी सूचना.
ब्लॉग स्तरावर विभागानुसार किंवा विषयानुसार शिक्षकांची मॅपिंग वरती आधारित आवश्यक संपन्मूल व्यक्तींची संख्या ठरवणे. उदाहरणार्थ ब्लॉक ए मध्ये पहिली ते तिसरी विभागात 120 शिक्षक असतील तर प्रति 40 शिक्षकांच्या एक गटाला 3 एमआरपी प्रमाणे तीन गटांना नऊ एमआरपी ची आवश्यकता असेल.एका जिल्ह्यातील याप्रमाणे पाच ब्लॉक असतील तर पहिली ते तिसरी विभागात जिल्हा स्तरावरील एकूण 45 MRPचे प्रशिक्षण आयोजित केले पाहिजे.
जिल्हा स्तरावरील सरकारी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक तसेच सह शिक्षकांचे प्रशिक्षण संबंधित महत्त्वाच्या बाबी-
1. डायट प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली अध्ययन पुनर्प्राप्ती नोडल अधिकारी यांनी ब्लॉक स्तरावरील सरकारी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण दिनांक 10.05.2022 पूर्वी पूर्ण करणे.
B. सरकारी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण संबंधी महत्वाच्या बाबी-
2022-23 या शैक्षणिक वर्षात शाळा पुनारंभ होईपर्यंत सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच भाषा व इतर विषयांचे सहशिक्षकांना अध्ययन पुनर्प्राप्ती उपक्रम प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.त्यासाठी पहिल्या स्तरावरील जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या सर्व सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच भाषा व कोर विषयांचे सहशिक्षक यांना 2 दिवसांचे जिल्हास्तरावरील प्रशिक्षण SSLC मूल्यमापन नंतर आयोजित करून दिनांक 10.05.2022 पूर्वी पूर्ण करणे.
01. आठवी आणि नववी वर्गाच्या कन्नड माध्यमातील गणित,विज्ञान,समाज विज्ञान तसेच कन्नड,इंग्रजी आणि हिंदी भाषेशी संबंधित शिक्षकांची पुस्तिका तसेच अध्ययन पत्रक तयार केलेल्या डायटकडून 34 जिल्ह्यातील प्रति विषयाला नियुक्त 2 शिक्षकांना राज्यस्तरीय 3 दिवसांचे एम.आर.पी.प्रशिक्षण दिले आहे.
2. जिल्ह्यातील विषयानुसार शिक्षक संख्येवर आधारित गट रचना करणे.
3. प्रत्येक गटामध्ये किमान 40 आणि कमाल 50 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणे.
4. पहिली ते आठवी वर्गाच्या Upgraded सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील आठवी वर्गाच्या शिक्षकांना त्या विषयातील गटामध्ये मॅपिंग करणे.
5. एकापेक्षा जास्त विषय अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही एकाच विषयाचे प्रशिक्षण देणे.
6. एका शिक्षकाला फक्त एकाच विषयाचे प्रशिक्षण देणे
7. इयत्ता 10वी साठी 2021-22 या वर्षाच्या साहित्याची उजळणी करून,8वी आणि 9वी इयत्तेच्या अध्ययन फलानुसार कृतींची अंमबजावणी करण्यासाठी शिक्षकांचे साहित्य तयार केले गेले आहे.2022-23 शैक्षणिक वर्षापासून सुरू होणारे पहिले 30 दिवस शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी एक योग्य परिपत्रक जारी केले जाईल. शिक्षकांना प्रशिक्षणाची माहिती देणे.
धन्यवाद…..!!! सरकारी आदेशातील कांही महत्वाचे मुद्दे भाषांतरीत करण्याचा प्रयत्न केला आहे..उपयुक्त वाटल्यास इतरांना पाठवा.व सविस्तर माहितीसाठी खाली आदेश पहा.
Tap on CLICK HERE to download –