निपाणी व चिक्कोडी महसूल तालुक्यातील गावे संबंधित शैक्षणिक तालुक्यात विलीन करण्यासंबंधी आदेश…..
दिनांक: 08-02-2018 रोजी चिक्कोडी तालुक्याचे विभाजन करून निप्पाणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीमुळे निपाणी शैक्षणिक तालुक्यातील सदलगासह 9 गावे चिक्कोडी महसूल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येतात तर चिक्कोडी शैक्षणिक तालुक्यातील अमलझरीसह 12 गावे निपाणी महसूल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येतात.पण प्रशासकीय दृष्ट्या निपाणी महसूल तालुक्यातील गावे निपाणी शैक्षणिक तालुक्यामध्ये व चिक्कोडी महसूल तालुक्यातील गावे चिक्कोडी शैक्षणिक तालुक्यामध्ये समाविष्ट करावे अशी गेल्या दोन तीन वर्षांपासून शिक्षक संघांची मागणी होती.पण कांही अडचणीमुळे ही मागणी प्रलंबित होती.पण अखेर दि. ०७/०३ /२०२२ रोजी शासनाने प्रशासकीय हितासाठी निपाणी व चिक्कोडी महसूल तालुक्यातील गावे संबंधित शैक्षणिक तालुक्यात विलीन करण्यास परवानगी दिली आहे.शासनाच्या सदर निर्णयाने संबंधित गावातील शाळा व शिक्षकांना सोयीचे होणार आहे.या आदेशानुसार लवकरच चिक्कोडी महसूल तालुका कार्य क्षेत्रात येणाऱ्या शाळा चिक्कोडी शैक्षणिक तालुक्यात व संबंधित गावातील शाळा आणि निपाणी महसूल तालुका कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाळा निपाणी शैक्षणिक तालुक्यात येणार आहेत.. सदर कार्यास प्रयत्न करणाऱ्या संघ प्रतिनिधींचे हार्दिक आभार…
संबंधित आदेश खालीप्रमाणे