नववी मराठी पद्य ८.आचंद्रसूर्य नांदो ( 8.Aachandrasurya Nando)

 


 

८.आचंद्रसूर्य नांदो







कवी परिचय :

ग. दि. माडगूळकर –

पूर्ण नाव – गजानन दिगंबर माडगूळकर (1919 – 1977) प्रसिद्ध
कवी
, कथाकार, कादंबरीकार, पटकथालेखक.

लेखन साहित्य –

प्रसिद्ध कादंबरी आकाशाची
फळे


प्रसिद्ध काव्यसंग्रह जोगिया‘, ‘चैत्रबन‘, ‘गीतरामायणइत्यादी.

आत्मचरित्रवाटेवरल्या
सावल्या


जोगिया‘, ‘चैत्रबन‘, ‘मंतरलेले
दिवस
या
पुस्तकाना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली आहेत.भारत सरकारतर्फे पद्मश्री
किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आले.गीतारामायणाच्या रचनेनंतर त्यांना ‘आधुनिक
वाल्मिकी
म्हणून ओळखले जाऊ लागले.



प्रस्तुत कविता सुरेश गंगाधर तुप्तेवार यांनी संकलन केलेल्या देशभक्ती
गीतातून
घेतली
आहे. 


(मूल्य – देशप्रेम,देशभक्ती)




 


शब्दार्थ :

आचंद्रसूर्य – चंद्रसूर्य असेपर्यंत

प्रेषित- अनुयायी  

हिमवंत-हिमालय

पार्थ – अर्जुन  

माधव – श्रीकृष्ण

गीताख्य- भगवद्गीता

जनशासन – लोकसत्ता

सीतारघूत्तम- सीता व श्रीराम

सत्यार्थ- सत्यासाठी  

स्वाध्याय :
 

प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो
पर्याय निवडून लिहा.


(
अ) ग. दि. माडगूळकर यांचा जन्म या
वर्षी झाला.


(अ) 1977

(
ब) 1919

(
क) 1976

(
ड) 1980

उत्तर – (ब) 1919

(आ) आकाशाची
फळे
या
पुस्तकाचा साहित्य प्रकार हा आहे.


(अ) कादंबरी

(
ब) काव्यसंग्रह

(
क) आत्मचरित्र

(
ड) कथासंग्रह



उत्तर – (अ) कादंबरी



(ई) पार्थास बोध यांने केला.

(अ) श्रीरामान

(
ब) शिवबाने

(
क) माधवाने

(
ड) गौतमाने



उत्तर -(क) माधवाने



(उ) येथे याचा पायाच सत्य आहे.

(अ) जनशासनाचा

(
ब) भांडवलशाहीचा

(
क) हुकूमशाहीचा

(
ड) सावकारशाहीचा



उत्तर -(अ) जनशासनाचा




 

प्र. 2 रा खालील प्रश्नांची उत्तरे एका
वाक्यात लिहा.


1.
गदिमांना भारत सरकारने कोणते किताब
दिले
?

उत्तर -भारत सरकारने गदिमांना पद्मश्री हा किताब दिला.

2.आधुनिक वाल्मिकी असे कोणाला म्हटले
आहे
?

उत्तर -गीत रामायणाच्या रचनेनंतर गदिमांना आधुनिक वाल्मिकी असे
म्हणून ओळखले जाऊ लागले.


3.येथे मेळ कशाचा झाला आहे?

उत्तर – इथे भारत देशाचा स्वसामर्थ्य आणि संयम राखून कार्य करणे
या दोन गोष्टींचा मेळ झाला आहे.


4.नरसिंह योग्यतेचे कोण आहे?

उत्तर – शिवाजीराजांच्या सारखे नरसिंहासारखे की जे
व्याघ्रनख्यानी लढू शकतात अशी शूर माणसे आहेत.


5.हा देश कशाचे स्तन्य प्याला आहे

उत्तर – हा देश श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून सांगितलेल्या
तत्वज्ञानाचे स्तन्य दूध प्याला आहे.


प्र. 3 दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1.
हे क्षेत्र पुण्यदायी कशाने बनले आहे?

उत्तर – या भारतात भारतीयांच्या सामर्थ्यांचा आणि संयमाचा मनावर
ताबा ठेवण्याचा एकत्र मेळ बसलेला आहे.तसेच सिद्धार्थ गौतम बुद्ध जणू त्यांचे
प्रतीक असून त्यांचा जन्मही भारतातच झाला आहे. असा हा तथागत म्हणजेच भगवान गौतम
बुद्धांसारख्यामुळे भारत हे पुण्यदायी क्षेत्र बनले आहे.


2.परस्परांचा सन्मान नित्य आहे असे
कवीने का म्हटले आहे
?

उत्तर – या भारत देशाने लोकसत्ता आणि त्याकरिता असणाऱ्या खऱ्या
गोष्टीचा न्याय निवाडा करताना लागणाऱ्या गोष्टी या दोघांचाही मान राखला आहे. कारण
उच्च स्वराने गाताना या देशाच्या विजय
गीतांचे
आवाज उठतात.कारण हे एक जागृत राष्ट्र आहे.


3.या देशातील जागती प्रथा कोणती?

उत्तर -या देशातील सत्य सदैव जयगीत गाणे,सर्वांचा
सन्मान करणे
,परस्परांचा सन्मान राखणे ही या
देशाची खरी जागती प्रथा आहे.




 

प्र. 4- संदर्भासहित स्पष्टीकरण करा

1.’
शीर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे

संदर्भ – वरील काव्यपंक्ती ग.दि.माडगूळकर यांच्या आचंद्रसूर्य
नांदो
या
कवितेतील असुन ही कविता सु. ग. तुप्तेवार यांनी संकलित केली आहे.


स्पष्टीकरण – या गीतांमधून भारताने मोठ्या अभिमानाने आपली मान
उंचावून राहावे असे म्हटले आहे आणि उंच असलेल्या या हिमालयाची उंची अधिक उंच
व्हावी.असे वरील ओळीत कवी म्हणत आहेत.


2. ‘येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

संदर्भ – वरील काव्यपंक्ती ग.दि.माडगूळकर यांच्या आचंद्रसूर्य
नांदो
या
कवितेतील असुन ही कविता सु. ग. तुप्तेवार यांनी संकलित केली आहे.


स्पष्टीकरण – या ओळीतून कवीने असे म्हटले आहे की,या
भारत देशात गायली जाणारी गाणी ही विजयश्री ची विजय गाथा असलेली गाणीच गायली
जावीत.त्याचे निनाद
,आवाज सर्वत्र उमटोत व या भारत देशात
नेहमी जागृत स्थिती नांदो.


प्रश्न 5.खालील प्रश्नांची आठ दहा ओळीत उत्तरे
लिहा.


1.
कवितेचा सारांश थोडक्यात लिहा

सारांश – आचंद्रसूर्य नांदोया
ग.दि.माडगूळकरांच्या कवितेतून स्वतंत्र भारताचा पौराणिक ऐतिहासिक व राजकीय
दृष्टांत देशभक्ती कशी असावी ही भूमी कर्तव्यदक्ष असून मर्यादापुरुषोत्तम
सीतारामाची
, पराक्रमाने उंच हिमालयाच्या ताठ
मानाने राहणारी आहे.इथे निराशा पराभव नको.सामर्थ्य आणि संयमाचा मेळ घालून वर्तन
करणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म येथे झाला.भारत देश हा पुण्य देणारा आहे.कारण
विक्रमराजासारखे हे राष्ट्र आहे आणि हे स्वातंत्र्य चंद्रसूर्य असे तोवर नांदू देत
असे कवीने म्हटले आहे.




भाषा अभ्यास

अ. समानार्थी शब्द लिहा

1. बोध – अक्कल

2.
झुंज – लढाई

3.
अमृत – अमरत्व प्राप्त करून देणारे
प्रय


4.
पर्वत – डोंगर

5.
चंद्र – शशी

6.
सूर्य – भास्कर

आ.समास ओळखा

1.आचंद्रसूर्य – 

2.
कर्तव्यदक्ष -कर्तव्याचे पालन करणारा
(कर्मधारय समास)


3.
पुण्यदायी -पुण्य देणारा असा
तो.(कर्मधारय समास)


4.
नरसिंह – नर म्हणजे पुरुष सिंह
म्हणजे एक पराक्रमी जनावर


इ. अलंकार ओळखा

हे राष्ट्र विक्रमाचे हे राष्ट्र शांततेचे

उत्तर – दृष्टांत अलंकार




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *