ATHAVI 6. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण

 



AVvXsEiWwuEpOjwX eaU5bDyc9nhneqtv b5GkwyvUwY2N4QdgpT7wZkBUQdHq p d FSwUxp 6e2F4veLzVlu3HDew3GerVOM92KoPQXiQYwwyoJeeIPJ2eX8JrmUXCJL498AM5vzqHLWh9 t7tTQWZChIgWODCBjKTkHzgd37Mt2GaAUlpBUGKrVopfI3cQ=w200 h163

इयत्ता – आठवी 

विषय – विज्ञान 

पाठ – 6

वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण




महत्वाची माहिती – 

जंगलाचे महत्व

1.    शुद्ध हवा मिळते.

 

2.    पोषणासाठी आहार मिळतो.

 

3.    पावसाचे चक्र सुरळीत चालते.

4.    उद्योगधंद्यांना कच्चामाल मिळतो.

 

5.    फर्निचरसाठी व इंधनासाठी लाकूड मिळते.

 

6.    औषधी सुगंधी द्रव्ये मिळतात.

 

7.    मातीची सुपीकता टिकते.

 

8.    वातावरणात गारवा राहतो.

 

9.    प्राणी पक्ष्यांना आश्रय स्थान मिळते.

10.   प्रदूषण कमी होते. 

जंगलतोडीचे परिणाम

1.    प्राण्यांना आश्रयस्थान मिळणार नाही.

 

2.    पृथ्वीवर प्रदूषण वाढेल.

 

3.    जमिनीची सुपीकता कमी होईल.

 

4.    निसर्गाचा समतोल बिघडेल.

 

5.    पावसाचे प्रमाण कमी होईल.

 

6.    जागतिक तापमान वाढेल.

7.    वाळवंटीकरण होईल.

 


जागतिक तापमानातील वाढ-

 पृथ्वीने परावर्तित केलेले उष्णतेचे किरण कार्बन-डाय-ऑक्‍साईड मुळे अडविले जातात व त्यामुळे तापमानात वाढ होते.या परिणामाला जागतिक तापमानातील वाढ किंवा ग्लोबल वार्मिंग असे म्हणतात.

 वाळवंटीकरण -जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण आणि सुपीकता कमी होते.तेव्हा जमिनीचे हळूहळू वाळवंटामध्ये रूपांतर होते.यालाच वाळवंटीकरण म्हणतात.

 जीवावरण -पृथ्वीचा असा भाग ज्यामध्ये सजीवांचे अस्तित्व असते तो भाग सजीवांना मदत करतो.

 

अभयारण्य – ज्या ठिकाणी प्राण्यांच्या मूल स्थानाचे रक्षण होते.प्राण्यांना कोणताही त्रास होत नाही. प्राण्यांची काळजी घेतली जाते.अशा
ठिकाणाला अभयारण्य म्हणतात.

उदा. बंडीपुर अभयारण्य, दांडेली अभयारण्य,चिकमंगळूर..

 

राष्ट्रीय उद्यान जी जागा वन्य जीवांसाठी राखून ठेवली जाते व जेथे वन्यजीव देखील नैसर्गिक स्त्रोतांचा मुक्तपणे वापर करू शकतात.त्यास राष्ट्रीय उद्यान
म्हणतात.

उदा. पंचमढी,सातपुडा राष्ट्रीय उद्यान,नागरहोळे,बंडीपुर,कुद्रेमुख इत्यादी..

 


राखीव जीवावरण – ही एक मोठे क्षेत्रफळ असणारी संरक्षित जमीन असते.जिथे
वन्यजीव वनस्पती
,प्राण्यांचे स्त्रोत,आदिवासी जमातीचे,पारंपारिक पद्धतीचे जीवन या सर्वांचे रक्षण केले जाते.

 

विशिष्ट जागी आढळणारे प्राणी व वनस्पती यांना या त्या  क्षेत्रातील प्राणी व वनस्पती म्हणतात.

 

विशिष्ट प्रजाती म्हणजे अशा प्रजाती की ते प्राणी आणि वनस्पती केवळ ठराविक ठिकाणी आढळतात.

 

रेड डाटा बुक – धोक्यात आलेल्या प्राणी आणि वनस्पतींची नोंद,वेगवेगळ्या प्रजातींची नोंद ज्या पुस्तकात असते त्यास रेड
डाटा बुक असे म्हणतात.

 

स्थलांतर

काही पक्षी हवामानातील बदलामुळे दरवर्षी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जातात त्यास स्थलांतर म्हणतात आणि त्या पक्षांना स्थलांतरित पक्षी
म्हणतात उदा. फ्लेमिंगो कुकू

पूनर्वनीकरण –

नष्ट झालेल्या जंगलांची नवीन झाडे लावून पुनर्वसन करणे म्हणजे पूनर्वनीकरण होय.

स्वाध्याय

1) रिकाम्या जागा भरा

(a) अभयारण्य या जागी प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक मूलस्थानामध्ये सूरक्षीत ठेवले जाते..

 

(b) विशिष्ट जागी आढळणाऱ्या प्रजातींना विशिष्ट प्रजाती म्हणतात.

(c) हवामानामध्ये बदल झाल्यामुळे स्थलांतर करणारे पक्षी दूरवरचा प्रवास करतात.

2. फरक लिहा.

(a) वन्यजीव अभयारण्य आणि राखीव जीवावरण.

 

वन्यजीव अभयारण्य

राखीव जीवावरण

1.      या ठिकाणी प्राण्यांच्या मुलस्थानांचे रक्षण केले जाते.

2.        प्राण्यांना कोणताही त्रास होत नाही.

      3.अभयारण्यात प्राणी मुक्तपणे फिरतात.आनंदी राहतात.

4.    पंचमढी अभयारण्य

 

1.    हे एक मोठे क्षेत्रफळ असून सुरक्षित जमीन असते.

2. वन्यजीव,वनस्पती,प्राणी,आदिवासी
जमाती यांचे पारंपरिक पद्धतीचे रक्षण केले जाते.

3.    राखीव जीवावरणामुळे लुप्त होत चाललेल्या प्राणी वनस्पती
पक्षी यांचे संरक्षण होते.

4.    उदा. पंचमढी राखीव जिवावरण.

             


(b) प्राणी
संग्रहालय आणि वन्य जीव अभयारण्य.

 

प्राणी
संग्रहालय

वन्यजीव
अभयारण्य

1.    कृत्रिम पद्धतीने मूळ स्थान मिळते.

2.    प्राण्यांना आहार ताजा मिळत नाही.

3.    प्राणी मुक्तपणे फिरू शकत नाहीत.

  1.नैसर्गिक पद्धतीने मूळ स्थान मिळते.

  2.प्राण्यांना आहार उत्तम व ताजा मिळतो.

  3.प्राणी मुक्तपणे फिरू शकतात.

 

(c) धोक्यात आलेल्या प्रजाती आणि लुप्त झालेल्या प्रजाती..

धोक्यात आलेल्या प्रजाती

लुप्त झालेल्या प्रजाती –

1.मानवी
हस्तक्षेपामुळे काही सजीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.त्यांना धोक्यात
आलेल्या प्रजाती म्हणतात.

 

2.उदा.वाघ,जंगली म्हैस,निळा देवमासा इत्यादी.

1. उत्क्रांतीच्या
टप्प्यात काही सजीव पुन्हा नाहीसे झालेत.त्यांना लुप्त झालेल्या प्रजाती
म्हणतात.

 

2.उदा.केसाळ हत्ती,डायनासोर

 

 

 (d) विशिष्ट वनस्पती (Flora) आणि विशिष्ट प्राणी (Fauna).

विशिष्ट वनस्पती

विशिष्ट प्राणी

१.एका ठराविक विशिष्ट
जागेच्या वनस्पती आढळतात त्यांना त्या क्षेत्रातील विशिष्ट वनस्पती म्हणतात.

२.उदा.साल,सागवान,आंबा,नेचे,चंदन
जांभूळ..

१.एका ठराविक विशिष्ट
जागी जे प्राणी आढळतात त्यांना त्या क्षेत्रातील विशिष्ट प्राणी म्हणतात.

२.उदा.सांबर,चित्ता,हरिण,जंगली कुत्रा,वाघ इ.




3.जंगल तोडीचे खालील घटकांवर होणारे परिणाम सांगा. वन्यजीव –

आहार मिळणार नाही.

राहण्यासाठी जागा मिळणार नाही.

परिसर –

परिसर प्रदूषित होईल.

परिसर प्रदूषित झाल्यामुळे सजीवांना हानी होऊ शकते.

 

खेडे –

इंधनासाठी लाकूड मिळणार नाही.

आहार मिळणार नाही.

 

शहर –

प्रदूषण होईल.

आहार मिळणार नाही.

 

पृथ्वी –

ऑक्सिजन कमी होईल.

ओझोनचा थर कमी होईल.

 

पुढची पिढी –

प्राणी दिसणार नाहीत.

वेगवेगळ्या वनस्पती दिसणार नाहीत.

 


4.काय होईल जर

a)      आपण वृक्षतोड करत राहिलो –

आपण जर वृक्षतोड करत राहिलो तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही.हवा प्रदुषित होईल, ओझोनचा थर कमी होईल,आहार मिळणार नाही.

 

b)     प्राण्यांच्या मुले स्थानामध्ये ढवळाढवळ केली-

प्राण्यांच्या मुल स्थानामध्ये ढवळाढवळ केली तर प्राणी गावाकडे यायला लागतील व ते मानवांना हानी पोचवू शकतात.

 

c)      जमिनीच्या पृष्ठभागावरील स्थळ उघडा पडल्यास-

जमिनीची सुपीकता नाहीशी होईल.जमिनीचे वाळवंटीकरण होईल.जमीन नापीक बनेल.

5. थोडक्यात
उत्तरे लिहा.

(a) जैव वैविध्यतेचे आपण का रक्षण करावे?

पर्यावरणाचा समतोल बिघडेल.

अन्नसाखळी विस्कळीत होइल.

काही सजीवांना आहार मिळणार नाही.

 

(b) संरक्षित जंगले देखील वन्य जीवांसाठी पूर्णपणे का सुरक्षित नसतात ?

सुरक्षित जंगले देखील पूर्णपणे वन्यजीवांसाठी सुरक्षित
नसतात.कारण तेथील वस्तीत असणारे लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलामध्ये जाऊन
शिकार करतात.जंगलतोड करतात. जंगलातील मौल्यवान वस्तू विकतात.

 

(c) काही वन्य जमाती जंगलावर अवलंबून असतात कशा?

उत्तर – अन्नाची गरज भागवण्यासाठी,आश्रयस्थान मिळवण्यासाठी आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी.

 

(d) जंगलतोडीची कारणे व परिणाम कोणते आहेत?

 जंगल तोडीमुळे निसर्गातील समतोल बिघडतो.वृक्ष तोडल्यामुळे पर्जन्यमान आणि जमिनीची सुपीकता कमी होते.जंगल तोडीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी होते. जंगल तोडीमुळे जमिनीची पोषकता कमी होते.

 


(e) रेड डाटा बुक म्हणजे काय?

उत्तर – धोक्यात आलेल्या प्राणी आणि वनस्पतींची नोंद,वेगवेगळ्या प्रजातींची नोंद ज्या पुस्तकात असते त्यास रेड डाटा बुक असे म्हणतात.

 

(f) स्थलांतर
या शब्दावरुन तुम्हाला कोणता बोध होतो
?

उत्तर -काही पक्षी हवामानातील बदलामुळे दरवर्षी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जातात त्यास स्थलांतर म्हणतात.

 

6. कारखान्यांच्या व निवासाच्या वाढत्या गरजा पुरविण्यासाठी सतत वृक्षतोड चाललेली आहे. अशा प्रकल्पासाठी ही चाललेली वृक्षतोड कितपत योग्य आहे ? चर्चा करुन थोडक्यात अहवाल तयार करा.

उत्तर -कारखाने उभे करण्यासाठी जंगलतोड होत आहे.जंगलतोडीमुळे प्राण्यांना आश्रयस्थान मिळेना. प्राण्यांना आहाराची कमतरता भासत
आहे. वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे.झाडे तोडून कारखाने बांधल्यामुळे कारखान्याच्या दूषित धुराने हवा प्रदूषित होत आहे.हवा दूषित झाल्याने अनेक रोग पसरत आहेत.ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.ओझोनचा थर कमी होत आहे. कारखान्यांच्या दूषित हवेमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे व माझ्यामध्ये जंगल तोडून घरे बांधणे चुकीचे आहे.कारण वाढत्या लोकसंख्येमुळे व प्रदूषणामुळे ओझोनचा थर कमी होत आहे.ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे.म्हणून झाडे तोडू नये व त्या जागी घरे बांधू नयेत.आपल्याला सध्या वृक्षांची गरज आहे.

 

7. तुमच्या विभागातील हिरवी संपदा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कसे योगदान कराल? तुम्ही
करणाऱ्या कार्याची यादी बनवा.

उत्तर – आमच्या विभागातील हिरवी संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी आम्ही लोकांना झाडांचे महत्त्व पटवून देऊ.वर्षातून किमान एक तरी झाड लावून त्याची व्यवस्थित निगा करू.झाडामुळे होणारे फायदे त्यांना पटवून देऊ व त्यांना आम्ही सांगू की झाडावरच सर्वजण अवलंबून आहोत.लोकांमध्ये जनजागृती करू.

 


8. जंगल तोडी मुळे कमी पर्जन्यमान कसे होते त्याचे स्पष्टीकरण करा.

उत्तर –  जंगल तोड केल्याने उद्योगधंद्यांना कच्चा मूल निवासस्थान यांना जागा मिळते.पण झाडांच्या कमतरतेमुळे वातावरणातील CO2 वायू तसाच राहतो.CO2चे प्रमाण वाढते.त्यामुळे जागतिक तापमानातील वाढ दिसून येते.या वाढीमुळे पाण्याचे चक्र बिघडते आणि पावसाचे प्रमाण कमी होते. वरील सर्व कारणामुळे दुष्काळ पडतो.

 

9. तुमच्या भागामधील राष्ट्रीय उद्यानांचा शोध घ्या व भारताच्या नकाशामध्ये त्यांचे स्थान दाखवा.

 

 

 

10. कागदांची बचत का करावी? कागद वाचविण्याच्या वेगवेगळ्या मार्गांची यादी करा.

उत्तर – प्रत्येक व्यक्तीसाठी कागद खूप महत्त्वाचा असतो.कागदाचे संरक्षण करणे.बचत करणे महत्त्वाचे आहे.कारण एक टन कागदाच्या निर्मितीसाठी 17 पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांचे आवश्यकता असते.म्हणून झाडाच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी कागदाचा कमीत कमी वापर केला पाहिजे.

1)      कागदाचे पाच ते सात वेळा पुनर्चक्रीकरण करेन.

2)      दिवसाला कमीत कमी कागदांचा वापर करेन.

3)      शक्य होत असेल तर वापरलेला कागद पुन्हा वापरेन.

 

11. खालील विधानांची उत्तरे कोड्यात आडवी, उभी, तिरकस इत्यादी स्वरुपात लपलेलो आहेत ती शोधून त्याच्याभोवती लंबगोलाकार खुणा करा.

 

(1) धोक्यात आलेल्या प्रजाती – लुप्त प्रजाती

 

(2) लुप्त पावणाऱ्या प्रजाती विषयी माहिती देणारे पुस्तक – रेड डाटा बुक

 

(3) जंगल तोडीचा परिणाम – तापमान वाढ

 

(4) नामशेष झालेली प्रजाती – डायनासोर

 

(5) एका विशिष्ट मुलस्थानात आढळणाऱ्या प्रजाती – फाऊनाफ्लोरा

 

(6) विविध वनस्पती, प्राणी व सुक्ष्मजीव आढळणारे क्षेत्र – जंगल

 

AVvXsEikYk9Udu7tXEB7VkyImsoapIp wcFd98Cwb1 qx3caT9a5wr9qWG5ZFVf0Z4zUFyqfTfToA zdAlEaibT0jF1JUapmMT7Z12hwSAD9fRHZcsRwISdvd6CbuDSHdvPo7o WuJkaewBWYV56Ww2HRTVGYswv5 LRwT2PWOZ FjWOLbS WwXSj1QAv10KQ=s320
आठवी विज्ञान प्रश्नोत्तरे
 
 
ध्वनी
 
 
घटक 7.बल आणि दाब (Force And Pressure)
 
घटक 5.दगडी कोळसा आणि पेट्रोलियम
 
घटक 4.द्रव्य : धातू आणि अधातू
 
घटक 3. कृत्रिम तंतू व प्लॅस्टिक
 
घटक 2.  सूक्ष्मजीव मित्र आणि शत्रू
 
️घटक 1.पिकांचे उत्पादन व व्यवस्थाप

 






 

Share with your best friend :)