श्री संत कनकदास (1509 – 1609)
आपला भारत देश साधू संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.कारण इथे अनेक संतांनी आपापल्या काळात विचारांचा जागर करून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले आहे व देशाच्या सांस्कृतिक जडण घडणीत हातभार लावण्याचे कार्य केल आहे आहे.
कर्नाटकातील असेच एक महान संत कनकदास यांचा संक्षिप्त परिचय व माहिती…
श्री संत कनकदास (1509 – 1609)
कनकदास यांचे मूळ नाव थिम्मप्पा नायक असे होते.त्यांचा जन्म 1509 साली झाला. कनकदास हे 15व्या व 16व्या शतकात कर्नाटकातील भक्ती पंथाचे प्रमुख हरिदासांपैकी एक होते. पुरंदरदास यांच्यासोबत ते कन्नड भाषेचे प्रसिद्ध संगीतकार आणि कर्नाटक संगीताचे संस्थापक होते. कनकदास आणि पुरंदरदासांना कर्नाटकी कीर्तन साहित्यातील अश्विनी देवता म्हणून वर्णन केले जाते.
कनकदास यांचा जन्म हावेरी जिल्ह्यातील शिग्गावी तालुक्यातील बाड गावात 1509 मध्ये एका कुरूब कुटुंबात झाला.त्यांच्या आईंचे नाव बच्छम्मा आणि वडिलांचे नाव बीरप्पानायक होते.कनकदास जरी कुरूब (धनगर) जातीतील असले तरी त्यांनी समाजातील सर्व जातीच्या लोकांसाठी कार्य केले.15 व्या आणि 16 व्या शतकात कनकदसानी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा दिला होता.
पाचशे वर्षांपूर्वी बाड हे विजयनगर साम्राज्यातील बंकापुर प्रांतातील शहर होते.ते शहर
म्हणजे विजयनगर ते गोवा जाण्याचा महामार्ग होते. चांगले धोरणात्मक स्थान.या बंकापूर
प्रदेशाच्या सैन्याचा सेनापती बिरप्पानायक होते. बच्छम्मा या बिरप्पानायकांची पत्नी.
बीरप्पानायकाची तिरुपती तिम्मप्पावर खूप श्रद्धा होती. श्रीरामानुजाचार्यांचे महान गुरु दक्षिणेत सुमारे नऊशे वर्षांपूर्वी प्रसिद्ध होते.त्यांनी स्थापन केलेल्या पंथाला श्रीवैष्णव पंथ असे म्हणत.बीरप्पानायक आणि त्यांची पत्नी बच्छम्मा हे श्री वैष्णव पंथाचे अनुयायी होते.
बीरप्पानायक आणि बच्छम्मा यांची आपल्याला वंशवृद्धीसाठी मुलगा हवा अशी अनेक दिवसांपासून इच्छा होती.म्हणून या जोडप्याने तिरुपती तिम्मप्पाला “आम्हाला आमच्या वंशवृद्धीसाठी एक पुत्र द्या’ अशी प्रार्थना केली.त्यांची ही प्रार्थना तिरुपती तिम्मप्पानी पूर्ण केली व बिरप्पानायक आणि बच्छम्मा यांना एक मुलगा झाला.हा मुलगा म्हणजे तिरुपती तिम्मप्पाचा आशीर्वाद असे समजून त्यांनी आपल्या मुलाचे नाव “थिम्मप्पा” असे ठेवले.
थिम्मप्पाचा जन्म कोणत्या काळात झाला हे माहीत नाही;पण पंधराव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत त्यांचा जन्म झाला असावा असे म्हटले जाते.
थिम्मप्पाचे शिक्षण बंकापूर येथील श्रीनिवासाचार्य यांच्याकडे झाले.तेथे त्यांनी व्याकरण, तर्कशास्त्र आणि साहित्यात प्रवीण झाले. तेथे त्यांनी घोडेस्वारीही शिकली.
कनकदासाचा उडुपीशी विशेष संबंध आहे.कारण कनकदास हे उडुपी मठाचे मठाधीश व्यासराय स्वामीजींचे शिष्य होते. व्यासराजा मठाच्या व्यासराय स्वामीजींच्या विनंतीवरून ते उडुपीला आले होते. पण तो काळ जातीच्या आधारावर भेदभाव मानणारा होता.त्यामुळे जेंव्हा व्यासराय स्वामीजींनी कनकदासाना मंदिरात प्रवेश देण्यास सांगितले तेंव्हा कनकदास “खालच्या” जातीतील असल्याने पुजाऱ्यानी त्याना मंदिरात प्रवेश देण्यास नकार दिला.पण कनकदास मंदिराच्या बाहेर श्री कृष्णाचे ध्यान करत बसले.त्यानी कित्येक आठवडे मंदिराबाहेर तळ ठोकून,स्वतःचे जेवण स्वतः शिजवले.मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले गेल्याने अस्वस्थ असतानाही, त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या स्तुतीसाठी कविता रचल्या आणि कीर्तने (कविता) रचल्या ज्या आजही प्रसिद्ध आहेत. पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक मानव शारीरिकदृष्ट्या सारखाच जन्माला येतो,प्रत्येक जण समान पाणी पितो आणि समान सूर्य पृथ्वीवर जीवनास मदत करताना पाहतो.असे ते आपल्या कीर्तनातून सांगू लागले.
हिंदू मंदिरे आणि मंदिरातील देवता नेहमी पूर्वेकडे तोंड करतात.उडुपीमध्ये भगवान कृष्ण देवाच्या रूपात पश्चिमेकडे तोंड करतात.असे म्हटले जाते की कनकदास मंदिरात जाण्याची परवानगी मिळण्याची वाट पाहत अनेक दिवस मंदिराबाहेर होते.त्या दिवसांत,जेव्हा
कनकदासाला भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची परवानगी नव्हती,तेव्हा त्यांनी अगदी आपल्या हृदयापासून श्रीकुष्णाची कीर्तने गायिली होती.यावेळी एक चमत्कार घडला व भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपोआप पश्चिमेकडे वळली.तसेच कनकदासाना मूर्तीचे दर्शन घेता यावे म्हणून मंदिराच्या बाहेरील भिंतींना भेगाही पडल्या व भक्त कनकदासाना श्रीकृष्णाचे दर्शन मिळाले.यामुळे सनातनी समाजाला असे काही का घडले याचे
आश्चर्य वाटले.तेव्हापासून, उडुपी येथील श्रीकृष्णाची मूर्ती पश्चिमाभिमुख असली तरी मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे.हा चमत्कार अजूनही आपल्याला उडुपी येथे पहायला मिळतो. कनकदासांच्या स्मरणार्थ उडुपी एक लहान मंदिर बांधण्यात आले आहे आणि ते “कनकण मंदिर” म्हणून ओळखले जाते..
कनकदासानी कीर्तन साहित्यात विशेष लेखन करून त्या काळात जनजागृती करण्याचे कार्य केले होते.मोहनतरंगिनी,हरिभक्तीसार,नळचरित्र इत्यादी त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह होते.सदैव जनकल्याणाचा विचार करणाऱ्या संत कनकदासांनी तिरुपती
येथे जीवनातील शेवटचे दिवस घालवले.१६०९ मध्ये ह्या महान संताचा, मृत्यू झाला. त्यांचा शारीरिक मृत्यू झाला असला तरीही संत कनकदास त्यांच्या कीर्तनानी,काव्यांनी अजूनही जिवंत आहेत. जनमाणसांत जिवंतच आहे.
कन्नड चित्रपट सृष्टीलाही संत कनकदासांच्या कार्याची दखल घ्यावी लागली.१९६०
साली ‘भक्त कनकदास’ हा दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या अभिनयाने नटलेला चित्रपट त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरला.
कनकदासांच्या या कार्याचा गौरव म्हणून कर्नाटक सरकारने सन 2008 पासून कनकदास जयंती साजरी करण्यात येते.यादिवशी शासकीय सुट्टी दिली जाते.तसेच त्या दिवशी संपूर्ण राज्यभर सर्व छोटया-मोठया गावात-शहरांत विविध कार्यक्रमांचे तसेच मिरवणूकींचे आयोजन केले जाते व संत कनकदासांच्या विचारांचा जागर मांडला जातो.
अशा या थोर संताचे विचार फक्त कांही प्रदेशापुरते मर्यादित न राहता भाषा व सीमा यांचे बंधन न घालता सर्व मानवजातीसाठी वापरले जावे हीच एक अपेक्षा…
(Source – Wikipedia.org)