SSLC VIDNYAN 3. DHATU ANI ADHATU




इयत्ता – दहावी 

विषय – विज्ञान 

घटक 3 – धातू आणि अधातू 

ऑनलाईन सराव टेस्ट क्र. 1 

 आपण काय शिकलो ते पाहूया व खाली दिलेली टेस्ट सोडवूया….

■ मुलद्रव्यांचे वर्गीकरण धातु आणि अधातुमध्ये करतात.

■ धातुचा चकाकी, वर्धनीयता, तन्यता आणि ते उष्णतेचे व वीजेचे सुवाहक असतात. ते कक्षीय तपमानाला घनरुप असतात.अपवाद – पारा तो द्रवरुप असतो.

■ धातू अधातूना इलेक्ट्रॉन देऊन धन प्रभारीत आयन्स तयार करतात.

■धातु ऑक्सिजन बरोबर संयोग करुन अल्कली ऑक्साईडस् बनवितात.अॅल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड अल्कली तसेच आम्लीय ऑक्साईड दोन्हीचे गुणधर्म दर्शवितात. अशा ऑक्साईडसना उभयधर्मी ऑक्साईडस् म्हणतात.

■वेगवेगळ्या धातुंची क्रियाशीलता पाणी आणि सौम्य आम्लाबरोबर वेगवेगळी असते. सर्व सामान्य धातुंची त्यांच्या क्रियाशीलतेच्या उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला क्रियाशील श्रेणी म्हणतात.

■जास्त क्रियाशील धातु कमी क्रियाशील धातुंच्या क्षारांच्या द्रावणातून धातुचे विस्थापन करतात.

■ धातु निसर्गामध्ये मुक्तस्थितीत किंवा त्यांच्या संयुगावस्थेत आढळतात.

■ धातुचे धातुकापासून निष्कर्षण आणि त्यांचे उपयोगाकरिता शुध्दीकरणाला धातुशास्त्र असे म्हणतात.

■ दोन किंवा जास्त धातुंच्या किंवा धातु व अधातु यांच्या एकजिन्नसी मिश्रणाला मिश्रधातु असे म्हणतात.

■ काही धातुंचा पुष्ठभाग जसे लोखंड हवेतील आर्द्रतेमध्ये खुप दिवस उघडे ठेवल्यास त्यांचा पृष्ठभाग गंजतो. या क्रियेला गंज असे म्हणतात.

■धातूचे गुणधर्म हे धातुच्या गुणधर्मापेक्षा विरुध्द असतात. ते वर्धनीय किंवा तन्यात नसतात. ते उष्णतेचे आणि वीजेचे दुर्वाहक असतात अपवाद ग्राफाईट हा बीजेचा सुवाहक आहे.

■ अधातु धातुबरोबर क्रिया करून करतात. मिळवितात आणि परित आयन्स तयार

■अधातू आम्लीय किंवा उदासीन ऑक्साईडस् तयार करतात.

■ सौम्य आम्लातून अधातू हायड्रोजन विस्थापित नाहीत ते हायड्रोजन बरोबर क्रिया करून हायड्राईड तयार करतात.







Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *