काळ व काळाचे प्रकार

 

मराठी व्याकरण 

काळ व काळाचे प्रकार 

वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसाच ती क्रिया कोणत्या वेळी झाली आहे याचा बोध होतो. त्यास
काळअसे म्हणतात.

मुख्य काळ तीन आहेत.

1) वर्तमान काळ

2) भूतकाळ

3) भविष्यकाळ

1) वर्तमान काळ – क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आताघडते आहे असे जेव्हा तेव्हा तो वर्तमान काळ असतो.

उदा.     मी आंबा खातो.

मी क्रिकेट खेळतो.

ती गाणे गाते.

आम्ही अभ्यास करतो.

2) भूतकाळवाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली आहे असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो.

उदा.  राम शाळेत गेला.

       मी अभ्यास केला.

3) भविष्यकाळक्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो.

उदा.      रोहित आंबा खाईल.

मी सिनेमाला जाईल.

मी शिक्षक बनेल.

वरील तीन प्रकाराचे प्रत्येकी चार उपप्रकार बनतात.

1) साधा


2) अपूर्ण                      

3) पूर्ण            

4) रिती

1) वर्तमानकाळाचे प्रकार

प्रकार

उदाहरणे

साधा वर्तमानकाळ

प्रिया चहा पिते.

चालू वर्तमानकाळ

प्रिया चहा पित आहे.

पूर्ण वर्तमानकाळ

प्रियाने चहा पिला आहे.

रिती वर्तमानकाळ

प्रिया चहा पित असते.

 2) भूतकाळाचे प्रकार

प्रकार

उदाहरणे

साधा भूतकाळ

प्रियाने चहा पिला.

चालू भूतकाळ

प्रिया चहा पित होती.

पूर्ण भूतकाळ

प्रियाने चहा पिला होता.

रिती भूतकाळ

प्रिया चहा पित असे.

 

3) भविष्यकाळाचे प्रकार

प्रकार

उदाहरणे

साधा भविष्यकाळ

प्रियाने चहा पि.

चालू भविष्यकाळ

प्रिया चहा पित असेल.

पूर्ण भविष्यकाळ

प्रियाने चहा पिला असेल.

रिती भविष्यकाळ

प्रिया चहा पित जाईल.

 

 

तिन्ही काळांच्या उप प्रकारांची माहिती सविस्तर पाहुया – 

1) वर्तमानकाळाचे 4 उप प्रकार घडतात.

1) साधा वर्तमान काळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो.

उदा. 

  • मी आंबा खातो.
  • विराट क्रिकेट खेळतो.
  • रोहित चेंडू फेकतो.

2) अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमानकाळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील क्रिया वर्तमानामध्ये चालू असल्याचे समजते. तेव्हा ते  वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचे असते.

उदा. 

  • गीता पत्र लिहीत आहे.
  • दीपक अभ्यास करीत आहे.

3) पूर्ण
वर्तमान काळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील क्रिया वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल असे समजते तेव्हा त्याला पूर्ण वर्तमानकाळ असे म्हणतात.

उदा.

  • मी आंबा खाल्ला आहे.
  • आम्ही पेपर सोडविला आहे.
  • विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.

4) रीती
वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील एखादी क्रिया जेंव्हा वर्तमानकाळात सतत घडत असते असे दाखवले जाते तेंव्हा त्याला रीती वर्तमानकाळ असे म्हणतात.

उदा.

  • ती रोज फिरायला जाते.
  • प्रशांत रोज व्यायाम करतो.
  • कार्तिक दररोज अभ्यास करतो.

 

 

2) भूतकाळाचे 4 उप प्रकार पडतात.

 

1) साधा भूतकाळ

जेंव्हा एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात.

उदा.

  • रामने  अभ्यास केला
  • सिताने नाटक पहिले.

2) अपूर्ण/चालू
भूतकाळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती असे समजते तेंव्हा त्याला अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ असे म्हणतात.

उदा. 

  • आम्ही आंबा खात होतो.
  • दिपाली गाणे गात होता.
  • सीता सायकल चालवत होती.

3) पूर्ण भूतकाळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते असे जेंव्हा समजते तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे
म्हणतात.

उदा.

  • शामने गाणे गाईले होते.
  • आम्ही अभ्यास केला होता.
  • तिने पेपर लिहिला होता.

4) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असते तेंव्हा त्याला ‘चालू-पूर्ण
भूतकाळ
 किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात.

उदा.

  • मी रोज व्यायाम करीत होतो/असे.
  • ती दररोज मंदिरात जात होती/असे.
  • प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.

 

2) भविष्यकाळाचे उप प्रकार पडतात.

1) साधा भविष्यकाळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील एखादी क्रिया जेंव्हा पुढे होणार असेल असे समजते  तेंव्हा तो साधा
भविष्यकाळ
 असतो.

उदा.

  • उद्या पाऊस पडेल.
  • उद्या परीक्षा संपेल.
  • मी सिनेमाला जाईल.

2) अपूर्ण / चालू भविष्यकाळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल असे समजते तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

उदा. 

·        मी आंबा खात असेल.

·        मी गावाला जात असेल.

·
पूर्वी अभ्यास करत असेल.

·
 दिप्ती गाणे गात असेल.

3) पूर्ण भविष्यकाळ

क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील जर एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.

उदा. 

  • मी आंबा खाल्ला असेल.
  • मी गावाला गेलो असेल.
  • पूर्वाने अभ्यास केला असेल.
  • दिप्तीने गाणे गायले असेल.

4) रीती भविष्यकाळ  

क्रियापदाच्या रूपावरून वाक्यातील जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल असा बोध होतो तेव्हा त्याला रीती भविष्यकाळ असे
म्हणतात.

उदा.

  • मी रोज व्यायाम करत जाईल.
  • पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.
  • सुनिल नियमित शाळेत जाईल

 

या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्टसोडवण्यासाठी येथे स्पर्श करा..

 

 

Share with your best friend :)