पाठ 8. खो – खो
★ नवीन शब्दांचे अर्थ
बचाव – रक्षण
कौशल्य – चातुर्य
तंदुरुस्त – निरोगी
कोंडी होणे – संकटात सापडणे
जोपासणे – सांभाळणे
उकिडवे – टाचा पोटरीशी व गुडघे पोटाशी घेत टेकून बसलेला
चेजर्स (इंग्लिश शब्द) — पाठलाग करणारे
रनर्स (इंग्लिश शब्द) धावणारे
स्वाध्याय
अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.
१) खो, खो खेळामध्ये एकूण किती खेळाडू असतात ?
उत्तर – खो, खो खेळामध्ये एकूण बारा खेळाडू असतात.
२) खो खो चे क्रीडांगण कसे असते? ,
उत्तर – खो खो चे क्रीडांगण आयताकार असते.
३) आक्रमक संघाचा नववा खेळाडू कोठे उभा राहतो?
उत्तर – आक्रमक संघाचा नववा खेळाडू हा पाठलाग करणारा खेळाडू म्हणून एका पोलजवळ उभा राहतो.
४) एका वेळी बचाव संघाचे किती खेळाडू पळतात ?
आ) खालील प्रश्नांची उत्तरे ३-४ वाक्यात लिही.
१) खेळताना आक्रमक संघाच्या खेळाडूंची रचना कशी असते?
उत्तर – आक्रमक संघाचे (चेजर्स) आठ खेळाडू वरील आठ चौकटीवर उकिडवे बसतात. त्यांची तोंडे एकमेंकांच्या विरुद्ध दिशेला असतात. नववा खेळाडू पाठलाग करणारा खेळाडू म्हणून एका पोलजवळ उभा राहतो.
२) बचाव संघाच्या खेळाडूंच्या कृतीचे वर्णन करा.
उत्तर – बचाव संघाचे (रनर्स) तीन खेळाडू एका वेळी एकाच ठिकाणाहून मैदानात प्रवेश करतात. हे खेळाडू क्रीडांगणात कोठेही राहून आपला बचाव करू शकतात. त्यांना स्पर्श करून बाद करण्याचे काम पाठलाग करणाऱ्या (चेजर्स) खेळाडूला करायचे असते. पाठलाग करण्याचे काम एकच खेळाडू न करता बचाव खेळाडू (रनर) ज्याच्या जवळ किंवा समोर असतो, त्या चेजर्स पक्षाच्या बसलेल्या खेळाडूला पाठमोरे खो देऊन पार पाडले जाते.
३) पाठलाग करणाऱ्या खेळाडूंना कोणते नियम पाळावे लागतात?
उत्तर – पाठलाग करणाऱ्या खेळाडूंना पुढील नियम पाळावे लागतात.
१) एकच खेळाडू पाठलाग करतो. उरलेले आठ जण चौकटीत बसलेले असतात.
२) पकडणाऱ्या खेळाडूला खेळाडू (चेजर्स) बसलेली रांग ओलांडता येत नाही. पळणाऱ्याला उलट सुलट दिशेने चकवत धावता येते.
३) खो मिळाल्यानंतर उठणाऱ्या खेळाडूलाही पळण्याची जी दिशा धरलेली असते, ती बदलता येत नाही. I.
४) पोलकडे पोहोचल्यानंतर मात्र चेजर्स संघाचे खेळाडू आपली दिशा बदलू शकतात.
४) खो खो खेळामध्ये असलेल्या गुणदान पद्धती संबंधी माहिती लिहा?
उत्तर – खो – खो खेळामध्ये बाद झालेल्या प्रत्येक खेळाडूबद्दल चेजर्स संघास एक गुण (गुणदान) मिळतो. सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर पूर्वीच्या क्रमानेच खेळाडू धावण्यास येतात. ज्या संघास दोन्ही डावात मिळून जास्त गुण मिळतात, तो विजयी होतो.
५) खो खो खेळताना कोणकोणत्या कौशल्यांची जोपासना करता येते?
उत्तर – खो खो खेळताना ‘खो‘ देणे, दिशा बदलणे, सूर मारणे, खांबाच्या बाजूने सफाईने पळणे, हुलकावणी देणे, कोंडीतून निसटणे अशी अनेक कौशल्ये आपल्याला जोपासता येतात.
इ) रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भर.
(रनर्स, चेजर्स, कौशल्य,
पाठलाग )
१) आक्रमक संघाचे खेळाडू चेजर्स
२) बचाव संघाचे खेळाडू रनर्स
३) आक्रमक संघाचा एक खेळाडू पाठलाग करतो.
४) खांबाच्या बाजूने सफाईने पळणे हे एक कौशल्य आहे.
ऊ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ शिक्षकांच्या सहाय्याने समजून
१) हुलकावणी देणे – फसवणे / चकवणे
३) सूर मारणे – सुळकांडी मारणे
५) पाठलाग करणे – पकडण्यासाठी मागे धावणे
२) खो देणे – उठवून लावणे
४) कोंडीतून निसटणे – संकटातून बाहेर पडणे
ए) खालील वाक्यात ‘बसणे‘ क्रियापदाची वर्तमान काळातील
सामान्य रूपे रिकाम्या जागी भर.
१) मंजुळा बसते.
२) सागर बसतो.
३) विजय आणि अक्षता बसतात.
४) मांजर बसते.
५)बैल बसतो.