5. दगडी कोळसा आणि पेट्रोलियम
SHORT NOTES
नैसर्गिक साधन संपत्ती –
जे पदार्थ निसर्गापासून प्राप्त होतात व मानव त्यांचा उपयोग करतो त्यांना नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतात.
उदा. हवा,पाणी,सूर्यप्रकाश,पेट्रोल,जंगल इत्यादी
दोन प्रकार –
न संपणारी नैसर्गिक साधन संपत्ती (पुनर्भव)
उदा. हवा,पाणी,माती,सूर्यप्रकाश
2.संपणारी
नैसर्गिक साधनसंपत्ती (अपुनर्भव)
उदा. जंगल दगडी कोळसा पेट्रोल इत्यादी
जीवाश्म इंधने –
सजीव प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून जे इंधन तयार होते त्यात जीवाश्म इंधन असे म्हणतात.
उदा.पेट्रोलियम पदार्थ कोळसा इत्यादी
कोळसा
★काळ्या रंगाचा असतो.
★कठीण असतो.
★मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण
होते.
उपयोग – घरगुती इंधन,रेल्वे इंधन,औष्णिक विद्युत् भट्टी कारखान्यामध्ये कोळशावर प्रक्रिया करून तयार होतो.
★कठीण सच्छिद्र काळ्या रंगाचा पदार्थ
★कार्बनचे शुद्ध स्वरूप
★धातूंच्या शुद्धीकरणासाठी उपयोग
होतो.
डांबर –
★काळ्या रंगाचा जाड असलेला पदार्थ.
★नकोसा वाटणारा वास असतो.
★डोंगरामध्ये विविध पदार्थाचे मिश्रण असते.
★कारखान्यात रंग,प्लास्टिक,औषधे,स्फोटके इ. तयार करण्यासाठी वापर होतो.
★कीटक दूर करण्यासाठी नेप्थॅलीन (डांबर)गोळ्यांचा वापर होतो.
कोल गॅस-
★दगडी कोळशावर प्रक्रिया करून खोल गॅस मिळविला जातो.
उपयोग –
★दिवे प्रकाशित करण्यासाठी
★उद्योगधंद्यात इंधन म्हणून.
पेट्रोलियम –
★पेट्रोल डिझेल केरोसिन हे सर्व नैसर्गिक स्त्रोतापासून प्राप्त होतात.त्यांना पेट्रोलियम म्हणतात.
★दशलक्ष वर्षांनंतर हवामान असताना उच्च तापमान उच्च दाब यामुळे मृत सजीवांचे पेट्रोलियम मध्ये रूपांतर होते.
नैसर्गिक वायू
★मिथेन हा वायू कमीत कमी प्रदूषण करतो.
★उपयोग – घरगुती इंधन विद्युत निर्मितीसाठी कृत्रिम खते रसायने तयार करण्यासाठी.
स्वाध्याय
1. CNG आणि LPG इंधन म्हणून उपयोग करण्याचे फायदे कोणते?
उत्तर – कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस(CNG) आणि लिक्विड पेट्रोलियम गॅस(LPG) यांच्यातील फायदे खालीलप्रमाणे-
★कमी प्रदूषण होते.
★पर्यावरणाला पूरक आहे.
★कमी किमतीत मिळते.
★स्वच्छ इंधन आहे.
★लगेच उपलब्ध होते इत्यादी.
2.रस्ते बनविताना पेट्रोलियमच्या कोणत्या उत्पादिताचा उपयोग केला जातो.त्यांची नावे लिहा.
उत्तर – रस्ते बनवताना पेट्रोलियमच्या डांबर आणि बिटूमेन यांचा उपयोग केला जातो.
3.मृत वनस्पती पासून कोळशाची कशी निर्मिती होते?त्याचे वर्णन करा.त्या प्रक्रियेला काय म्हणतात?
उत्तर – जवळ जवळ 300 मिलियन वर्षांपूर्वी पृथ्वीवर पाणथळ क्षेत्रांमध्ये घनदाट जंगले होती.महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही वनसंपदा जमिनीखाली गाडली गेली.त्याच्यावर
अधिक माती जमा होऊन साठा झाल्यामुळे ते संपीडन झाले होते.जस जसे ते खोलवर जात राहिले तस तसे त्यांचे तापमान वाढत गेले.उच्च दाब आणि उच्च तापमाना खाली मृत्त
वनस्पतींचे कोळशामध्ये रूपांतर झाले.यामध्ये मुख्यतः कार्बन चे अस्तित्व असते.मृत वनस्पतीच्या मंद प्रक्रियेने दगडी कोळशामध्ये रूपांतर होते.याला कार्बनीकरण असे
म्हणतात.कारण याची वनस्पतीच्या अवशेषांपासून निर्मिती झाली आहे.म्हणून दगडी कोळशाला जीवाश्म इंधन असे म्हणतात.
4) रिकाम्या जागा भरा.
a) दगडी कोळसा,पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू ही जीवाश्म इंधने आहेत.
(b) पेट्रोलियमच्या विविध घटकांना वेगळे करण्याच्या प्रक्रियेला पेट्रोलियम शुद्धीकरण म्हणतात.
(c) वाहनांसाठी कमी प्रदूषण करणारे इंधन सीएनजी(CNG).
5. खालील विधानांना चूक की बरोबर हा खूण करा.
उत्तर –
(a) जीवाश्म इंधनाची निर्मिती प्रयोगशाळेमध्ये करता येऊ शकते. (F)
(b) पेट्रोलपेक्षा CNG जास्त प्रदूषणकारी इंधन आहे. (F)
(c) कोक हे कार्बनचे अत्यंत शुद्ध स्वरुप आहे. (T)
(d) विविध पदार्थांचे मिश्रण म्हणजे डांबर होय. (T)
(e) केरोसीन हे जीवाश्म इंधन नाही. (F)
6.जीवाश्म इंधनांना संपणारी नैसर्गिक साधनसंपत्ती असे का म्हणतात? स्पष्टीकरण
करा.
उत्तर – जीवाश्म इंधनाना संपणारी नैसर्गिक साधन संपत्ती असे म्हणतात.जीवाश्म इंधनाचा साठा मर्यादित असतो.त्यांचा पुन्हा पुन्हा वापर केल्याने ती संपुष्टात
येते.जीवाश्म इंधनांच्या निर्मितीसाठी दशलक्ष वर्षे लागतात.त्यामुळे या साधनसंपत्ती संपणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्ती आहेत.
7.कोकचे गुणधर्म आणि उपयोगाचे वर्णन करा.
उत्तर कोक हा काळ्या रंगाचा पदार्थ आहे.
कार्बनचे अत्यंत शुद्ध स्वरूप आहे.
उपयोग – ★धातूच्या शुद्धीकरणासाठी.
★स्टील निर्मितीसाठी.
★रासायनिक क्रियेत उपयोग होतो.
8.पेट्रोलियम निर्मितीच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण करा.
उत्तर – समुद्रात राहणाऱ्या सजीवन पासून पेट्रोलियमची निर्मिती होते.जेव्हा हे सर्व सजीव मृत पावतात.तेव्हा त्यांचे शरीर समुद्राच्या तळाशी जाऊन जमा होते आणि
त्यानंतर वाळू आणि मातीच्या थरांनी गाढले जाते.अनेक दशलक्ष वर्षानंतर हवेच्या अनुपस्थितीत उच्च तापमान आणि उच्च दाब यामुळे मृत सजीवांचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मध्ये रुपांतर होते.
9. खालील तक्त्यामध्ये 1991 पासून 1997 पर्यंत भारतातील एकूण विजेचा तुटवडा दर्शाविलेला आहे. आकडयांना आलेखाच्या या स्वरुपात दर्शवा. वीज तुटवड्याची टक्केवारी Y अक्षावर दाखवा आणि वर्षे X अक्षावर दाखवा.
उत्तर –
y अक्ष |
|
|