इयत्ता – पाचवी
विषय – मराठी
पाठ 3 – कडूनिंब
अ) नवीन शब्दांचे अर्थ
सदाहरित – सतत हिरवेगार
दुतर्फा – दोन्ही बाजूंनी
उबाळू – गळू, मोठा फोड
जोमाने – जोराने, वेगाने
पालवी – अंकुर, कोवळी पाने
आ) खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1.कडुनिंबाचे झाड कोठे आढळते?
उत्तर – कडुनिंबाचे झाड भारत,श्रीलंका,मलेशिया या देशात आढळते.
2.सदाहरित
वृक्ष म्हणजे काय ?
उत्तर – सतत हिरवीगार दिसणाऱ्या वृक्षांना सदाहरित वृक्ष असे म्हणतात.
3.कडुनिंबाची झाडे कोणता वायू घेतात?
उत्तर – कडुनिंबाची झाडे कार्बनडाय ऑक्साईड वायू घेतात.
4.कीटक कडुनिंबाच्याझाडाकडे का आकर्षिले जातात?
उत्तर – कडुनिंबाच्या निंबोण्यातील गोड रसामुळे कीटक कडुनिंबाच्या झाडाकडे आकर्षिले जातात.
5.कडुनिंबाची फुले कशी असतात ?
उत्तर – कडुनिंबाची फुले फिकट पिवळ्या रंगाची छोटी व चांदण्यांच्या आकाराची असतात.
इ) खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिही.
1. कडुनिंबाचे झाड बागेत का लावतात?
उत्तर – कारण ह्या झाडांची पाने इतर झाडापेक्षा जास्त प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइड वायू घेतात. त्यामुळे त्यापासून जास्त प्रमाणात प्राणवायू सोडला जातो.म्हणूनच हे झाड बागांमध्ये व घराच्या आसपास मोठ्या प्रमाणात लावतात.ह्यामुळे शुध्द हवेचा पुरवठा जास्त होतो.
2.कडुनिंबाच्या बियापासून काय तयार करतात?
उत्तर – कडुनिंबाच्या बिया खूप उपयोगी असतात. कडुनिंबाच्या बियापासून कडुनिंबाचे तेल तयार करतात.
3.त्याचा कशासाठी उपयोग होतो?
उत्तर – कडुनिंबाच्या बियापासून तयार झालेल्या तेलाचा उपयोग कातडीच्या रोगांमध्ये केला जातो.
4.कडुनिंबाच्या लाकडाचा उपयोग कशासाठी केला जातो?
उत्तर – कडुनिंबाच्या झाडाचे लाकूड जड असते. त्यापासून कीटक दूर राहतात त्यामुळे हे लाकूड पोखरले जात नाही. त्याचा उपयोग होड्या तयार करण्यासाठी केला जातो.
ई. जोड्या जुळवा.
उत्तर अ ब
1.
कडुनिंबाचा वृक्ष 4. साधारण 20 ते 25 फूट वाढतो.
2. कडुनिंबाची पाने 5. हिरवी व रसरशीत
3. कडुनिंबाची फुले 1. छोटी, चांदण्याच्या आकाराची असतात.
4. कडुनिंबाच्या काड्या 2. दात घासण्यासाठी उपयोग करतात
5. कडुनिंबाची साल 3. उदी रंगाची असते.
उ) रिकाम्या जागा भरा.
1. कडुनिंबाला काहीजण निंब किंवा लिमडा असे म्हणतात.
2. ह्या झाडाची पाने वर्षातून एकदा गळून पडतात.
3. पानांच्या कडा नागमोडी असतात.
4. कडुनिंबाचे झाड खूप औषधी असते.
ऊ) खालील शब्दांचा वाक्यात उपयोग कर.
1. सदाहरित – कडुनिंबाची झाडे सदाहरित असतात.
2. रसरशीत – मी रसरशीत आंबे खाल्ले.
3. चमकदार – मी पाहिलेल्या बाळाचे डोळे चमकदार होते.
4. नाग मोडी – आमच्या शेतातील रस्ता नागमोडी होती.
5. दुतर्फा – सुनीलच्या गावाच्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली होती.
6. औषधोपयोगी – तुळस ही एक औषधोपयोगी वनस्पती आहे.
ए. उलट अर्थाचे शब्द लिही.
1. शुध्द x अशुद्ध
2.फिकट x गडद
3. आकर्षण x अनाकर्षण
4. वाढणे x कमी होणे
Click here for pdf – Click Here