ATHAVI MARATHI 1. TO RAJHANS EK 1. तो राजहंस एक

 

      

gadima

(मूल्य –आत्मविश्वास )

कवी परिचय –

 पूर्ण नाव – गजानन दिगंबर माडगुळकर.

  टोपण नाव  – गदिमा

  जन्म – १ ऑक्टोबर १९१९,शेटफळे. (जिल्हा सांगली,महाराष्ट्र)

 मृत्यू
१४ डिसेंबर मृत्यू,पुणे मुक्कामी.

     प्रसिद्ध कवी , कथालेखक, कादंबरीकार, नाटककार, संपादक, वक्ता, कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता,निर्माता.

प्रसिद्ध साहित्य – गीतरामायण,जोगिया इ. (काव्यसंग्रह). आकाशाची फळे (कादंबरी) वाटेवरच्या सावल्या (आत्मचरित्र)

गीतरामायणच्या रचनेनंतर ‘आधुनिक वाल्मिकी’म्हणून ओळखले जाऊ लागले.  

तो राजहंस एक हे एक भावगीत असून ते “गदिमा साहित्यनवनीत” या काव्यसंग्रहातून निवडले आहे. 

नवीन शब्दार्थ  

 सुरेख – सुंदर  ,

संगे – सोबत

धाक – भीती,जरब

कुरूप – विद्रूप

तरंगे – पोहणे

प्र. १ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

    १)  बदकाची पिल्ले कशी होती?

उत्तर – बदकाची पिल्ले सुरेख होती.

     २)  ते पिल्लू वेगळे का तरंगत होते?

उत्तर – कारण ते सर्वाहून निराळे असल्याने त्याला कोणी खेळायला घेत नव्हते म्हणून ते वेगळे तरंगत(पोहत) होते.

    ३)  त्या पिल्लाला कोण विचारत नसे?

उत्तर – त्या पिल्लाला त्याची भावंडे विचारत नसत.

प्र. २ खालील प्रश्नांची दोन–तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१)  लोक हसून काय म्हणत असत?

उत्तर – ते राजहंसाचे पिल्लू दिसायला वेगळे आणि कुरूप होते.म्हणून लोक त्याच्यावर हसायचे आणि ते कुरूप पिल्लू
आहे असे म्हणायचे.

२)  पिल्लास कोणते दु:ख होते?

उत्तर – ते पिल्लू दिसायला कुरूप असल्याने त्याला कोणी विचारत नसे.त्याला कोणी खेळायला घेत नसत.हे दु:ख पिल्लास होते.

)  राजहंस असल्याचे पिल्लास केंव्हा कळाले?

उत्तर  एके दिवशी पाण्यात चोरून पाहताना आपले प्रतिबिंब हे राजहंसाचे असल्याचे त्याला कळाले.

प्र. ३ खालील प्रश्नांची चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा.

    १)  कुरूप पिल्लास इतर पिले कशी वागणूक देत असत?

उत्तर – एका तळ्यात सुंदर बदकाच्या पिलांसोबत एक राजहंसाचे पण वाढत होते.ते पिल्लू दिसायला कुरूप असल्याने इतर सर्व पिले त्याला वाईट वागणूक देत असत.त्याच्याशी कोणी खेळत नसत.त्याला कोणी विचारत नसत.त्यामुळे ते पिल्लू दु:खी असायचे व सर्वाहून वेगळे पोहायचे.

प्र. ४ खालील प्रश्नांची सात- आठ वाक्यात उत्तरे लिहा.

    १)  या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर – एका तळ्यात सुंदर बदकाची पिले होती.त्या पिलांसोबत एक राजहंसाचे पण वाढत होते. ते पिल्लू दिसायला कुरूप असल्याने इतर सर्व पिले त्याला वाईट वागणूक देत असत.त्याच्याशी कोणी खेळत नसत.त्याला कोणी विचारत नसत.त्यामुळे ते पिल्लू दु:खी असायचे व सर्वाहून वेगळे पोहायचे.एके दिवशी त्या पिलाच्या जीवनात वेगळा दिवस उजाडला.चोरून पाण्यात पाहताना आपले प्रतिबिंब हे राजहंसाचे असल्याचे त्याला कळाले आणि आनंदाच्या भरात त्याचे भय वाऱ्याबरोबर उडाले व आत्मविश्वास जागृत झाला.त्याच्या मनातील कमीपणाची भावना संपली.

प्र. ५ संदर्भासह स्पष्टीकरण करा.

    १.   आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक

संदर्भ – वरील काव्यपंक्ती ग.दि.माडगूळकर यांच्या द्वारा लिखित ‘तो राजहंस एक’ या कवितेतून घेतलेली आहेत.

स्पष्टीकरण – कवी वरील ओळीच्या माध्यमातून म्हणतात की, एका तळ्यात सुंदर बदकाची पिले होती.त्या पिलांसोबत एक कुरूप व  वेगळे पिल्लू होते.

२.
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक

संदर्भ – वरील काव्यपंक्ती ग.दि.माडगूळकर यांच्या द्वारा लिखित ‘तो राजहंस एक’ या कवितेतून घेतलेली आहेत.

स्पष्टीकरण – एके दिवशी चोरून पाण्यात पाहताना आपले प्रतिबिंब हे राजहंसाचे असल्याचे त्या कुरूप पिल्लाला  कळाले व त्याचा आत्मविश्वास जागृत झाला.असे कवी वरील ओळीच्या माध्यमातून सांगतात.

प्र. ६ भाषाभ्यास –

१.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

अ)   दु:ख × सुख                  

ब) कुरूप × सुंदर                

क) प्राचीन × अर्वाचिन

२.
समानार्थी शब्द लिहा.

अ)   संग – सोबत                 

ब) धाक – भीती,जरब        

क) सुरेख – सुंदर

३.
विग्रह करून संधी ओळखा.

अ)   क्षणैक – क्षण + एक (स्वर संधी)

प्र. खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

    १)  या कवितेत कोणत्या पक्षाचे वर्णन केले आहे?

अ.बदक            

 ब. पोपट            

क. कावळा            

  ड. राजहंस

उत्तर – ड. राजहंस

    २)  बदकाची पिल्ले कुठे राहत होती?

अ.
तळ्यात            

ब. पिंजऱ्यात           

क. समुद्रात             

ड. घरट्यात

उत्तर – अ. तळ्यात               

    ३)  गीतरामायणच्या रचनेनंतर ग.दि.माडगूळकराना कोणत्या नावाने ओळखले जाते?

अ.  गीतरामायणकार          

ब. आधुनिक वाल्मिकी         

क. ग.दि.मा.           

ड. श्रीराम

उत्तर – ब. आधुनिक वाल्मिकी

     ४)  या कवितेचा काव्यप्रकार हा आहे?

अ.   प्रेमगीत              

ब. देशगीत              

क. भावगीत             

ड. बालगीत

उत्तर – क. भावगीत

 

Share with your best friend :)