आठवी इतिहास
पाठ 2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1 द्वीपकल्प म्हणजे काय?
उत्तर – तिन्ही बाजूला पाणी व एक बाजूला भूभाग असणार्या प्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात.
2 भारताच्या शेजारील देश कोणते?
उत्तर – नेपाळ,चीन,भूतान,श्रीलंका,अफगाणिस्तान,पाकिस्तान बांगलादेश इत्यादी.
3 भारताचे चार स्वाभाविक विभाग कोणते?
उत्तर – 1.उत्तरेकडील हिमालय पर्वत
2.उत्तरेकडील मैदानी प्रदेश
3.दख्खनचे पठार
4.किनारपट्टीचा प्रदेश
हे भारताचे चार स्वाभाविक विभाग होत.
4 प्राचीन मानव कुठे राहत होता?
उत्तर – प्राचीन मानव हा दरी डोंगर कपारी झाडांच्या ढोली टेकड्या यांच्यामध्ये राहत होता.
5 प्राचीन मानवाचा आहार कोणता होता?
उत्तर – प्राचीन मानव हा झाडपाला कंदमुळे फळे कच्चे मास असा आहार होता.
6 प्राचीन पाषाण विभागाचे तीन भाग कोणते?
उत्तर – 1. आरंभीचे प्राचीन पाषाण युग
2. मध्य पाषाण युग
3. नवे अश्मयुग
हे प्राचीन पाषाण युगाचे तीन भाग.
7 मध्य पाषाण युग कशाला म्हणतात?
उत्तर – 10000 ते 12000 वर्षापर्यंतच्या काळाला मध्य पाषाण युग मानतात.
रिकाम्या जागा भरा.
1 भारत एक द्वीपकल्प आहे.
2 भारताला 6100 कि.मी. ची किनारपट्टी लाभलेली आहे.
3 लेखन कलेच्या शोधा पुर्वीचा जो काळ आहे त्यास इतिहास पूर्व काळ म्हणतात.
4 इतिहासपूर्व काळातील मानव दगडी हत्यारांचा वापर करत होता.
5 राखेचे अंश कर्नूल च्या गुहेमध्ये सापडले आहेत.