4. जिंकू आम्ही लढाई
कवी
– मनोहर आंधळे
नवीन शब्दार्थ
भरारी – झेप
महती – मोठेपण
प्यारा – प्रिय
धुरा – जबाबदारी
हुतात्मा – देशासाठी बलिदान केलेला
स्वाध्याय
अ. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. बालकाला कोणत्या पंखांनी भरारी
घ्यावीशी वाटते ?
उत्तर: बालकाला
ज्ञानाच्या पंखांनी भरारी घ्यावीशी वाटते.
2. राष्ट्राची सर्वोच्च धुरा कोणाच्या हाती आहे ?
उत्तर : राष्ट्राची
सर्वोच्च धुरा विज्ञानाच्या हाती आहे.
3. आपला भारत देश कशाकशांनी नटलेला आहे ?
उत्तर : आपला भारत देश
विविध फुले आणि धर्मांनी नटलेला आहे.
4. आपल्या समोर कोणाचा आदर्श आहे ?
उत्तर: आपल्या समोर
हुतात्मा शिरीषचा आदर्श आहे.
5. आपल्याला कोणती लढाई जिंकली पाहिजे ?
उत्तर : आपल्याला
भारतभूच्या अखंडतेची लढाई जिंकली पाहिजे.
6. आपल्या सर्वांना मनापासून कोण प्रिय आहे?
उत्तर : आपल्या सर्वांना मनापासून
आपला तिरंगा प्रिय आहे.
अ. दोन ते तीन वाक्यात उत्तरे
लिही.
1. आपल्या देशात कोणकोणती विविधता आढळते ?
उत्तर : आपला देश
विविधतेने नटलेला आहे.आपल्या देशात विविध धर्माचे,जातीचे लोक राहतात.विविध भाषा
बोलणारे,विविध वेशभूषा करणारे लोक आनंदाने राहतात.hi विविधता आपल्या देशात आढळते.
2. आपण उंच भरारी का घेतली पाहिजे ?
उत्तर: देशाची व आपली
प्रगती करण्यासाठी,यश मिळविण्यासाठी ज्ञानाच्या पंखांनी आपण उंच भरारी घेतली पाहिजे.
इ. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
1. ज्ञान x अज्ञान
3. शूर x भित्रा
2. धर्म x अधर्म
4. जिंकणे x हरणे
ई. लयबद्ध शब्दांच्या जोड्या जुळव.
उत्तर – अ ब
1.
सारी – भरारी
2. हाती – महती
3. सारा – प्यारा
4. शिपाई – लढाई
उ. अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.
1. धुरा वाहणे – जबाबदारी
स्वीकारणे
प्रतिभाताई पाटील यांनी
राष्ट्रपती पदाची धूरा वाहिली होती.
2. महती गाणे – मोठेपणा सांगणे
शाहीर आपल्या पोवाड्यातून शिवाजी महाराजांची
महती गात होते.
3. भरारी घेणे – झेप घेणे
कष्टाच्या सहाय्याने राहुलने उद्योगामध्ये उंच भरारी घेतली.
ऊ. खालील शब्दसमूहास एक शब्द
लिही.
1. देशाची सेवा करणारा –
सैनिक
2. तीन रंगांनी नटलेला – तिरंगा
3. ज्याच्यात खंड पडत
नाही असा – अखंड
ए. समानार्थी शब्द लिही.
1. पंख – पर
2. भरारी – झेप
3. महती – मोठेपणा
4. शिपाई – सेवक, नोकर
5. लढाई – युद्ध