सातवी मराठी पाठ 3 माझी आई


पाठ 3 माझी आई

या पाठाच्या व्हिडिओसाठी येथे स्पर्श  करा.. CLICK HERE

अ. एका वाक्यात उत्तरे लिहा.

 

1. डॉ. रघुनाथ माशेलकरांना कोणाकडून प्रेरणा मिळाली ?

उत्तर : डॉ रघुनाथ माशेलकरांना त्यांच्या आईकडून (अंजलीबाई)
प्रेरणा मिळाली.

2.इ.स. 2000 सालचे विज्ञान अधिवेशन कोठे भरले ?

उत्तर : इ. स. 2000 सालचे विज्ञान अधिवेशन पुण्यात भरले होते.

3.डॉ.माशेलकरांच्या आईचे नाव काय होते ?

उत्तर : डॉ. माशेलकरांच्या आईचे नाव अंजलीबाई असे होते.

4.डॉ.माशेलकरांचे मूळ गाव कोणते ?

उत्तर : डॉ. माशेलकरांचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल हे होय.

5.डॉ. माशेलकरांची कोणती इच्छा होती ?

उत्तर : आयुष्यातील काबाडकष्टानंतर आईला चार दिवस सुखाचे लाभावे ही डॉ. माशेलकरांची इच्छा होती..

6.डॉ.माशेलकरांच्या आईला काय आवडत नसे?

उत्तर : मुलांनी पत्ते, गोट्या खेळलेले डॉ. माशेलकरांच्या आईला आवडत नसे.

आ. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1.अंजलीबाईंनी मनाशी कोणता निश्चय केला?

उत्तर : अंजलीबाईंना शिक्षणाअभावी नोकरी मिळत नव्हती.म्हणून अंजलीबाईंनी मनाशी निश्चय केला की, ‘मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन.

 

2. महाविद्यालयीन शिक्षणानंतर माशेलकर नोकरी का शोधू लागले?

 

उत्तर : वडिलांच्या निधनानंतर काबाडकष्ट करून माशेलकरांच्या आईने माशेलकरांना शिकविले होते.तिला चार दिवस सुखाचे लाभावेत या इच्छेने महाविद्यालयीन शिक्षणानंतर माशेलकर नोकरी शोधू लागले.

3. डॉ     3. माशेलकरांच्या आईला का समाधान वाटले ?

उत्तर : खूप कष्ट करून,मोलमजुरी करून माशेलकरांच्या आईने माशेलकरांना शिकविले.त्यांच्या कष्टामुळे माशेलकर उच्च शिक्षण घेऊ शकले.या उच्च शिक्षणामुळेच 2000 साली पुण्याच्या विज्ञान अधिवेशनात पंतप्रधान

अटलजी,नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ विविध क्षेत्रातील दिग्गज व हजारो पुणेकर यांच्या उपस्थितीत माशेलकरांनी अध्यक्षीय भाषण केले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भूषविले.हा कार्यक्रम टीव्हीवरून पाहून माशेलकरांच्या आईला समाधान वाटले.

इ.खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

1.सामोरे जाणे तोंड देणे

कितीही वाईट प्रसंग आला तर त्याला सामोरे गेले पाहिजे.

2.डोळ्यात पाणी येणे – वाईट वाटणे

निरोप समारंभवेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

3.निश्चय करणे ठरवणे

मी माझ्या आई वडिलांना सुखात ठेवण्याचा निश्चय केला.

4.सार्थक होणे कृतकृत्य होणे

माझं परीक्षेत पहिला क्रमांक आल्याने माझ्या अभ्यासाचे सार्थक झाले होते.

ई. योग्य जोड्या जुळवा

उत्तर –       अ                                            

1.स्वामी विवेकानंद                     क. तत्त्वज्ञानी

2.छत्रपती शिवाजी महाराज       ड. आदर्श राजा

3.साने गुरुजी                            इ. शामची आई

4.डॉ. माशेलकर                        अ. वैज्ञानिक

5.सचिन तेंडूलकर                      ब. क्रिकेटपटू

उ. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

1.प्रतिकूल x अनुकूल

2.किर्ती x अपकिर्ती

3.यश x अपयश

4.पास x  नापास

5.मृत्यू x जीवन

6. परदेश x स्वदेश

7. व्यक्त x अव्यक्त

8. धीर x उतावळेपणा

 


ऊ. खालील वाक्य कोणी, केव्हा व कोणास म्हटले आहे ते संदर्भासह लिहा.

1.माझी आई माझे प्रेरणास्थान आहे.

उत्तर : हे वाक्य ‘माझी आई’ या पाठातील असून हे वाक्य डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी म्हटले आहे.आपल्या जीवनाबद्दल माहिती सांगताना

माशेलकरांनी आपल्या आईला उद्देशून म्हटले आहे.

2.मी माझ्या मुलाला खूप खूप शिकवीन.

उत्तर : हे वाक्य ‘माझी आई’ या पाठातील असून हे वाक्य डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या आईने म्हणजेच अंजलीबाईंनी म्हटले आहे. अंजलीबाईंना शिक्षणा अभावी नोकरी मिळत नव्हती.तेंव्हा स्वत:ला उद्देशून म्हटले आहे.

3.तुझ्या विषयातील पुढची पदवी कोणती ?

उत्तर : हे वाक्य ‘माझी आई’ या पाठातील असून हे वाक्य अंजलीबाईंनी जेंव्हा डॉ. माशेलकर महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपल्या आईला सुखाचे चार दिवस लाभावेत म्हणून नोकरीचा विचार करत होते.तेव्हा डॉ.

 माशेलकरांना उद्देशून म्हटले आहे.

4. आपल्या कष्टाचे फळ परमेश्वर आपल्याला देतोच.

उत्तर : हे वाक्य ‘माझी आई’ या पाठातील असून हे वाक्य माशेलकरांच्या आईने जेंव्हा डॉ. माशेलकर हे महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपल्या आईला सुखाचे चार दिवस लाभावेत म्हणून नोकरीचा विचार करत होते.तेव्हा

त्यांना धीर देण्यासाठी आईने वरील वाक्य म्हटले आहे.

ए. पाठाच्या आधारे खालील शब्दकोडे पूर्ण करा.

1.लेखकाचे नाव (आडवा शब्द) – रघुनाथ माशेलकर

2.लेखक या देशाचा आहे (उभा शब्द) – भारत

3.आयुष्यातील यांना सामोरे जात लेखक इथवर येऊन पोहोचले ( उभा शब्द) – आव्हानांना

4.मला टी. व्ही. वर पाहून आईला वाटले ( उभा शब्द)  समाधान

5.लेखकाची सुरुवातीची परिस्थिती अशी होती (उभा शब्द) – प्रतिकूल

6. लेखक मोठे झाल्यावर या पदावर पोहोचले ( उभा शब्द) -वैज्ञानिक

ऐ. खालील शब्द कोडे सोडवा.

1.स्वच्छ लख्ख

2.मोठ्याच्या विरुद्ध – लहान

3.उद्देश लक्ष

4.मसाल्याचा एक पदार्थ लवंग

5.लाज, शरम लज्जा

6.रामाचा लहान भाऊ लक्ष्मण

7.शरीरावरील बारीक केस लव

8.कपाळ – ललाट

ओ. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

1.कोणतीही तक्रार न करता विनातक्रार

2.सतत पैसे खर्च करणारा खर्चिक

3.देशाची सेवा करणारा – देशसेवक

4.आपल्याच मनाप्रमाणे चालणारा – स्वच्छंदी

5.इतरांना मार्ग दाखविणारा मार्गदर्शक

6.स्वतःशी केलेले भाषण स्वगत

7.गावच्या पंचाचे राज्य पंचायत राज

8.कधीही नाश न पावणारे अविनाशी

9.शरण आलेला शरणागत

10.कार्य करण्याची पात्रता असलेला कार्यकुशल

व्याकरण
शब्दयोगी  अव्यय

जे शब्द नामांना व सर्वनामांना जोडून येतात व शब्दांमधील संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे
म्हणतात.

उदा.झाडाखाली,विहिरीजवळ,घरामध्ये,शाळेकडे इ.

 


Share with your best friend :)