4 थी मराठी
2. भारत माता
★ नवीन शब्दांचे अर्थ
गृहस्थ – व्यक्ती, माणूस
अनायासे – सहज उपलब्ध
दिवाणखाना – बैठकीची खोली
आ) दिलेल्या नमुन्याप्रमाणे खालील जोडशब्द तयार कर.
नमुना : चहा-पाणी
१) आई – वडील
२) विटी – दांडू
४) नदी – नाले
३) टेबल – खुर्ची
६) झाडे – झुडुपे
इ) खालील प्रश्नांची उत्तरे १-२ वाक्यात लिहा.
1) आई कोणावर रागावली ?
उत्तर –आई गजानन वर रागावली.
2) ज्ञानाचे माहेरघर कोणते ?
उत्तर – महाराष्ट्रातील पुणे हे शहर ज्ञानाचे माहेर घर आहे.
3) शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर – शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला
4) मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?
उत्तर – मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी सुरु केली.
5) लोकमान्य टिळकांची मैत्री कोणाशी होती?
उत्तर – गजाननच्या वडिलांशी लोकमान्य टिळकांची मैत्री होती.
6) लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव लिहा.
उत्तर – बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव होय.
7) गजाननच्या आईने गजाननला काय करायला सांगितले?
उत्तर – गजाननच्या आईने गजाननला देवपूजा करायला सांगितले.
8) लोकमान्य रात्रंदिवस कोणत्या देवाची पूजा करत ?
उत्तर – लोकमान्य रात्रंदिवस भारत मातेची पूजा करत.
उ)
खालील प्रश्नांची उत्तरे २-३ वाक्यात लिही.
1) देवपूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी तयार कर.
उत्तर – हळद-कुंकू,अक्षता,विड्याचे पान,सुपारी,श्रीफळ,धूप, कापूर,
अगरबत्ती,दीपक, कापूस इत्यादी हे देवपूजेसाठी लागणारे साहित्य आहे.
2) पुणे शहराचे वैशिष्ट्य लिही.
उत्तर – पुणे शहर
महाराष्ट्रातले पुणे हे शहर पूर्वीपासून ज्ञानाचे माहेरघर.विचारवंतांचे शहर, ऐतिहासिक महत्त्वाचे शहर.याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. थोर समाजसुधारक महात्मा फुले, मुलींची पहिली शाळा प्रारंभ करणाऱ्या सावित्रीबाई फुले, देशाबद्दल प्रखर अभिमान व प्रेम असणारे लोकमान्य टिळक या सर्व थोर माणसांची पुणे च कर्मभूमी.
3) टिळक व गजाननचे वडील यांच्यामध्ये कोणत्या गोष्टींची चर्चा होत असे?
उत्तर – टिळक व गजाननचे वडील यांच्यामध्ये भारतातील ज्ञान,अंधश्रद्धा,शिक्षण इत्यादी गोष्टींवर चर्चा होत असे.
ऊ) खालील वाक्ये कोणी कोणाला म्हटली आहेत ते लिही.
1) “गजू, ऊठ देवाची पूजा कर.”
उत्तर – वरील वाक्य गजुच्या आईने गजुला म्हटले आहे.
2) “अग आई. मी माझी तुलना त्यांच्याशी करत नाही.”
उत्तर – वरील वाक्य गजुने आईला म्हटले आहे.
3) “अरे, लोकमान्य टिळक पूजा करतात की नाही ते तुला नीट माहीत
नसेल.”
उत्तर – वरील वाक्य गजुच्या आईने गजुला म्हटले आहे.
4) “काका, तुम्ही देवाची पूजा करता का?”
उत्तर – वरील वाक्य गजुने लोकमान्य टिळकांना म्हटले आहे.
5) “या भारतमातेची पूजा करतो.”
उत्तर – वरील वाक्य लोकमान्य टिळकांनी गजुला म्हटले आहे.