आठवी समाज 1 साधने





प्रशोत्तरे 

१) इतिहासाचे साधने याचे दोन भाग कोणते?

उत्तर –पुरातत्व साधने आणि साहित्यिक साधने 

2) साहित्यिक साधने यांचे दोन प्रकार कोणते?

उत्तर –लिखित साधने आणि मौखिक साधने

3)  मौखिक साहित्य म्हणजे काय?

उत्तर –व्यक्ती व्यक्ती कडून तोंडी स्वरूपात सांगितले जाणारे साहित्य म्हणजे मौखिक किंवा तोंडी साहित्य.

 4) मौखिक साहित्यामध्ये कोण कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

उत्तर –कथा लावणी पोवाडा लोककथा लोकगीत इत्यादी

5)पुरातत्व साधने याचे चार प्रकार कोणते? 

उत्तर –शिलालेख नाणे स्मारके आणि इतर अवशेष

6) उत्खनन म्हणजे काय? 

उत्तर –जमिनीचे शास्त्रीय पद्धतीने खुदाई करून पुरातत्व साधने बाहेर काढली जातात 

त्याला उत्खनन असे म्हणतात

7) शिलालेख म्हणजे काय?

उत्तर – शिलालेख म्हणजे कोरुन लिहिलेले लिखाण

8) स्मारकामध्ये कोण कोणते गोष्टी येतात? 

उत्तर – स्मारकामध्ये राजवाडे प्रार्थना गृहे किल्ला आणि स्तंभ इत्यादी गोष्टी येतात

9) साधना मधील इतर अवशेष कोणती येतात?

उत्तर – साधनांमधील इतर अवशेष मध्ये मडक्यांचे तुकडे मणी मुद्रा धातूंचे तुकडे बांगड्या इत्यादी गोष्टी येतात

रिकाम्या जागा भरा 

1)कौटिल्याने अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला. 

2)राजा हल् याने गाथासप्तसती लिहिले.

 3) विशाखा दत्ताचे मुद्राराक्षस प्रमुख साहित्य होय.

4) बाण भटाचे प्रसिद्ध साहित्य हर्ष चरित्र

5) मेगॅस्थेनीस ने इंडिका ग्रंथ लिहिले. 

6) यू-एन-स्तंग याने सियुकी लिहिले. 

7)अशोकाचे शिलालेख ब्राम्ही लिपीत आहेत.

8) अशोकाला शीला लेखकांचा जनक म्हणतात.


Share with your best friend :)