सेतूबंध म्हणजे काय?
सद्या शिकण्यास आवश्यक अध्ययनांश किंवा अध्ययन निष्पत्तीस संबंधीत पूरक अध्ययन सामर्थ्य किंवा अध्ययनांश जोडणे.मुलांची शिकण्याची पातळी, त्यांची क्षमता ओळखणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करणे हा एक क्रियाकलाप आहे. थोडक्यात मुलांनी जे शिकले आहे आणि जे शिकत आहेत त्यात परस्परसंबंध निर्माण करणे म्हणजे सेतुबंध म्हणता येईल.
सेतुबंध कधी करता येईल?
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कौशल्ये वाढवण्यासाठी सेतुबंध –
शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला दीर्घ सुट्टीतून शाळेत परत आलेल्या विद्यार्थ्यामध्ये पूर्वी आत्मसात केलेली कौशल्ये किती अवघड आहेत?कोणती कौशल्ये आत्मसात केलेली नाहीत? पुढील अध्ययनांशास पूरक सामर्थ्ये कोणकोणती?
हे सर्व लक्षात घेऊन या आधी आत्मसात केलेल्या क्षमतांना पुढे आत्मसात करण्यास आवश्यक असलेल्या क्षमतांमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीची प्रक्रिया म्हणजे सेतुबंध.
सेतुबंध का करावा? (Importance of bridge course)
सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता – तिसरी
पायाभूत सामर्थ्याची यादी
विषय – गणित
1. द्विमितीय आणि त्रिमितीय आकार आणि फरक ओळखा.रेषा व रेषांमधील फरक ओळखतील.
2. एक ते 99 पर्यंत संख्या किहीने व वाचणे.
3. दैनंदिन जीवनातील 2 अंकी बेरजेवर आधारित समस्या सोडवणे.
4. दैनंदिन जीवनातील 2 अंकी वजाबाकीवर आधारित समस्या सोडवणे.
5. पुनरावर्तीत बेरजेच्या सहाय्याने गुणाकार समजून घेणे.
6. समान विभागणीद्वारे भागाकार करणे.
7. 50 पेक्षा कमी रक्कमा तयार करण्यासाठी वेगवेगळ्या नोटा व नाणी यांचा उपयोग करणे.
8. पेन्सिल,ग्लास,टेबल,चमचा,बादली इत्यादी साधनांचा वापर करून वस्तूची लांबी,उंची,रुंदी,जाड,ठेंगू अंदाजे सांगणे.
9. वजनदार आणि हलक्या वस्तूंची तुलना करणे.
10. आठवड्याचे वार व वर्षाचे महिने ओळखणे.
11. संख्या विभागणी करणे व ओळखणे.
12. मापनानुसार माहिती संग्रहित करणे आणि संगाहित माहितीनुसार अनुमान काढणे.
संदर्भ – SETUBANDH LIRETARURE DSERT BENGALURU