सेतुबंध पूर्व परीक्षा
इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
लेखी
परीक्षा
रिकाम्या जागा भरा
1.आपल्याला …….पासून
साखर मिळते.
2. …… जीवनसत्वाच्या
अभावाने बेरीबेरी हा रोग होतो.
3……. आणि……. पासून
नैसर्गिक तंतू मिळतात.
4. पारदर्शक वस्तूचे एक
उदाहरण……
5. …………क्रियेपासून समुद्राच्या
पाण्यापासून मीठ तयार करतात.
चुक की बरोबर ओळखा.
6. दुधाचे दही होणे हा मूळ
स्थितीत येणारा बदल आहे.
7.सर्व प्राण्यांमधील
हालचाल तंतोतंत सारखीच असते.
8. मासा हा भूचर प्राणी
आहे.
9. पर्वतीय प्रदेशातील
झाडे सामान्यपणे शंकूच्या आकाराची असतात.
10. पान हे वनस्पतीचे
स्वयंपाक घर आहे.
खालील प्रश्नांची उत्तरे
लिहा.
11. वनस्पतीची आकृती काढून
भागांना नावे द्या.
12.आवर्तीय गतीचे एक
उदाहरण.
13. प्रकाशाचे उपयोग लिहा.
14. विद्युत मंडळात तारेच्या
ऐवजी दोरा वापरून बल्ब प्रकाशित होऊ शकतो का?
15. चुंबकाच्या प्रकारांची
यादी तयार करा.
तोंडी परीक्षा
16. खालील वस्तूंचे
विद्युत वाहक वर विद्युत रोधक यामध्ये वर्गीकरण करा.
(मोजपट्टी,रबर ,पेन,टाचणी,चावी इत्यादी.)
17. बाष्पीभवन म्हणजे
पाण्याची हानी नाही,का?
18.सामान्यपणे उन्हाळ्यात
तळे विहिरीत कमी प्रमाणात पाणी मिळते,का?
19. वातावरणात आम्लाची पुनरावृत्ती कशी होते?
20. तुमच्या शाळेत
कचऱ्याची विल्हेवाट कशी करतात?