सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
पूरक अध्ययन सामर्थ्य
1. वनस्पती व प्राण्यांच्या मूळ आहार स्त्रोतांची यादी तयार करतील.
2. संतुलित आहाराचे महत्त्व तसेच पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या
रोगाबद्दल समजून घेतील.
3. नैसर्गिक तंतू तसेच कपडे तयार करण्याच्या टप्प्यांची माहिती मिळेल.
4. विविध प्रकारच्या पदार्थांचे त्यांच्या गुणवत्तेनुसार वर्गीकरण करतील.
5. मिश्रणातील घटक वेगळे करण्याच्या पद्धती समजून घेतील व आपल्या आयुष्यात
त्यांचा वापर करतील.
6. आपल्या सभोवतालच्या बदलणाऱ्या व बदल घडणाऱ्या गोष्टींबद्दल समजून घेतील.
7. विविध सजीवांच्या शरीरातील स्नायू आणि हाडे हालचालीसाठी कशी मदत करतात
याविषयी विवरण करतील.
8. निवासस्थानाचे प्रकार समजून घेतील.
9. विविध निवासस्थानातील सजीवांची वैशिष्ट्ये आणि अनुकूलनाच्या पद्धतीविषयी
समजून घेतील.
10. वनस्पतीच्या विविध भागांची कार्ये सांगतील.
11. नमुनेदार वनस्पती व फुलांचे चित्र काढून त्यांचे भाग ओळखतील.
12. गतीचे प्रकार समजून घेऊन प्रत्येकाची उदाहरणे देतील.
13. प्रकाशाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये यांची यादी करतील.
14. विद्युत मंडळासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून विद्युत मंडळ
तयार करतील.
15. चुंबकाचे वैशिष्ट्ये गुणधर्म आणि उद्योगांची यादी करतील.
16. विद्युत वाहक आणि विद्युत रोधक पदार्थांची यादी तयार करतील.
17. जल चक्रावर आधारित भवन व द्रवीभवन बद्दल विवरण करतील.
18. पाण्याचे महत्व व पाणी बचतीच्या पद्धती बद्दल समजून घेतील.
19. हवेचे घटक तसेच त्यांचे उपयोग समजून घेतील.
20. स्वच्छता राखण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास शिकतील