KARNATAKA NMMS सराव प्रश्नपेढी
इयत्ता 8 वी विज्ञान: प्रकाशः आरशे आणि भिंगे
महत्त्वाच्या लिंक्स:
🔗 NMMS Exam 2026-27: Application, Eligibility & Study Material
🔗 NMMS Video Guidance (YouTube)
🔗 8वी गणित प्रकाश: वर्ग आणि घन
🔗 8वी गणित प्रकाश: घातांकांचा खेळ
🔗 8वी गणित प्रकाश: संख्यांची कहाणी
NMMS परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे
- ज्या गोलाकार आरशाचा पृष्ठभाग आतून वक्र असतो, त्याला अंतर्वक्र आरसा म्हणतात.
- ज्या गोलाकार आरशाचा पृष्ठभाग बाहेरून वक्र असतो, त्याला बहिर्वक्र आरसा म्हणतात.
- अंतर्वक्र आरशामुळे प्रतिमा वस्तूपेक्षा मोठी, लहान, सरळ किंवा उलटी असू शकते (अंतरावर अवलंबून).
- बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा नेहमी सरळ आणि आकाराने लहान असते.
- वाहनांचे बाजूचे आरसे (Side mirrors) म्हणून बहिर्वक्र आरसे वापरतात, कारण ते विस्तृत क्षेत्राचे दृश्य दाखवतात.
- बॅटरी, वाहनांचे हेडलाईट आणि दंतवैद्य दात तपासण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरतात.
- परावर्तनाचा पहिला नियम: आपाती कोन आणि परावर्तन कोन समान असतात.
- परावर्तनाचा दुसरा नियम: आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण एकाच प्रतलात असतात.
- बहिर्वक्र भिंग प्रकाश किरण एकत्रित करते (अभिसारी), तर अंतर्वक्र भिंग प्रकाश किरण दूर करते (अपसारी).
SmartGuruji

