सर्वाना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
सर्टिफिकेटसाठी आपले नाव,पत्ता / शाळेचे नाव व आपला जीमेल आयडी इत्यादी अचूक टाईप करा..
प्रश्नमंजुषा मध्ये कमीत कमी 80 टक्के गुण मिळाल्यास आपले सर्टिफिकेट आपल्या मेल आयडी वर येईल..
दररोज पहिल्या शंभर व्यक्तीना प्रमाणपत्र मिळेल..
प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती…
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी क्रूर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. तरीही, आपण ब्रिटिश कॉमनवेल्थचे भाग होतो.. दोन वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली, आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. संविधानाने आपल्याला शिक्षण, भाषण, गोपनीयता आदी जीवनावश्यक मूलभूत अधिकार दिले. भाषणाच्या अधिकाराशिवाय आज आपण इथे जमलो नसतो.
भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ” भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस’ भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो.
आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली. आज पासून भारत प्रजेचा झाला. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन असेही म्हटले जाते.
वतन हमारा ऐसा,कोई ना छोड़ पाये,
रिश्ता हमारा ऐसा,कोई न तोड़ पाये,
दिल एक है,जान एक है हमारी,
हिन्दुस्तान हमारा है,यह शान हैं हमारी।
प्रजासत्ताक दिन आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा