इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
प्रकरण – 4
वेदकालीन संस्कृती
नमुना उत्तरे
अभ्यास
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. अक्षरांचा परिचय नसलेल्या कालखंडाला इतिहास पुर्व काळ म्हणतात.
2. सूक्ष्म शिलायुगाला मध्य शिलायुग असे म्हणतात.
3. भारतीय उपखंडात कृषीसंबंधी सुरवातीचे अवशेष (पुरावे) मेहेरगर या ठिकाणी आढळतात.
4. इतिहासाचे पितामह हिरोडोटस यांना म्हणतात.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. इतिहासाचे तीन प्रमुख कालखंड कोणते ?
उत्तर – इतिहासाचे तीन प्रमुख कालखंड-:
1. प्राचीन शीलायुग
2. मध्य शीलायुग
3. नवे शीलायुग
2. प्राचीन शिलायुगातील मानवाच्या उपकरणांची नावे लिहा.
उत्तर – हात कुऱ्हाडी, धारदार दगडी पाते, मोठी दगडी उपकरणे इत्यादी प्राचीन शिलायुगातील मानव वापरत असे.
3. कोणत्या युगात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली?
उत्तर – नवीन युगात मानवाने शेती करण्यास सुरुवात केली.
4. मानवाने विकसीत केलेला पहिला धातू कोणता ?
उत्तर – तांबे हा मानवाने विकसीत केलेला पहिला धातू होय.
5. इतिहासाच्या आधारांची यादी करा.
उत्तर – पुरातत्व साधने, साहित्यिक साधने आणि मौखिक साधने इत्यादी हे इतिहासाचे आधार आहेत.
6. पुरातत्व आधारांची उदाहरणे द्या?
उत्तर – लिपी,नाणी,स्मारके,थडगी,मडकी इत्यादी पुरातत्व आधारांची उदाहरणे आहेत.
III. गटात चर्चा करून उत्तरे लिहा.
1. नवीन शिलायुगातील शेतीच्या उदयास कारणीभूत गोष्टी कोणत्या ?
उत्तर – नवीन शिलायुगातील शेतीच्या उदयास कारणीभूत घटकांमध्ये खालील गोष्टींचा समाविष्ट होतो:
– हवामानातील बदल- ज्यामुळे शेतीसाठी योग्य परिस्थिती निर्माण झाली.
– पशुपालन – पशुपालन करण्यास सुरुवात केल्याने त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक झाले.
– शेतीसाठी साधने आणि तंत्रांचा विकास
– स्थायिक जीवन- ज्यामुळे कायमस्वरूपी घरे आणि धान्याची साठवण करण्याच्या सुविधांचा विकास झाला.
2. लोखंडाचा शोध लागल्यानंतर लोह युगामध्ये कोणते बदल घडले?
उत्तर –
लोखंडाचा शोध लागल्यानंतर लोह युगामध्ये खालील बदल घडले..
– लोखंडाची हत्यारे आणि उपकरणे कृषी आणि हस्तकला व्यवसायाला आश्रय मिळाला.
– सुधारित कृषी साधने निर्माण झाली ज्यामुळे शेती उत्पादन वाढले.
– व्यापाराचा विकास – कारण लोखंडी वस्तूंचा व्यापार वापर वाढल्याने व्यापाराचा विकास झाला.
– सामाजिक बदल – नवीन सामाजिक वर्ग आणि व्यवसायांच्या उदयाने सामाजिक बदल झाले.
– प्रदेशांचा विकास – लोखंडी साधनांमुळे जमीन स्वच्छ करणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे सोपे झाले.