कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
माध्यम – मराठी
विषय – परिसर अध्ययन
इयत्ता – चौथी
पाठावरील स्वाध्याय नमुना उत्तरे
प्रकरण -1 प्राणी जगत
आम्ही मानव हे देखील प्राणी आहोत हे तुला माहीत आहे का? तुझ्या सभोवताली असलेल्या प्राण्यांचे निरीक्षण कर. तुझ्यात आणि इतर प्राण्यांत असणारे साम्य ओळख आणि लिही.
1. आम्ही माणूस असून आपण डोळ्यांनी पाहतो,तोंडाने खातो आणि कानांनी ऐकतो.प्राणीही तेच करतात.
2. आपण माणसं दोन पायांनी चालतो.प्राणी चार पायांनी चालतात.
3. मानव असून आपल्या शरीरावर कांहीं प्रमाणात केस असतात.तर काही प्राण्यांच्या संपूर्ण शरीरावर जास्त प्रमाणात केस दिसतात.
वरील चित्रे बघ. तुझ्यात आणि गायीमध्ये दिसून येणारे फरक ओळख.
तू ओळखलेले फरक पुढील तक्त्यात लिही.
मी | गाय |
मला दोन हात दोन पाय आहेत. | गाईला चार पाय असतात. |
मी माझ्या शरीरावर कपडे परिधान करतो. | गाय कपडे परिधान करत नाही. |
माझ्या डोक्यावर केस आहेत. | गाईच्या डोक्यावर शिंगे असतात. |
मला शेपूट नाहीत. | गायीला शेपूट असते. |
मी शिजवलेले अन्न खातो. | गाई गवत, चारा, कडधान्ये खाते. |
मी तोंडाने बोलतो हाताने लिहितो. | गाय आपल्याला दूध देते. |
वनजा ही इयत्ता चौथीतील चलाख मुलगी आहे. शिक्षकांच्या सोबत ती बाह्यावलोकन करण्यास गेली असता तिने पाहिलेल्या प्राण्यांची यादी तयार केली. परंतु त्यात त्या प्राण्यांचा आकार, रंग, आहार व निवारा याबद्दल माहिती लिहिण्यास ती विसरली. ती माहिती तू लिही.
मोकळ्या जागा भर :
* माश्यासारखे काही प्राणी पाण्यामध्ये राहतात.
* माकड, पक्षी, कीटक झाडावर राहतात.
* गाय आणि घोडा यासारखे अनेक प्राणी जमिनीवर राहतात.
विविध प्रकारचे प्राणी विविध प्रकारचा आहार सेवन करतात.
* वनस्पतीजन्य पदार्थ असलेले गवत, पाने, फळे, धान्य इत्यादी अन्नपदार्थ खाणाऱ्या प्राण्यांना शाकाहारी प्राणी असे म्हणतात.
प्राण्यापासून मिळणारे मांस, अंडी इत्यादी अन्नपदार्थ खाणाऱ्या प्राण्यांना मांसाहारी प्राणी असे म्हणतात.
* वनस्पती आणि प्राणी या दोन्हीपासून मिळणारे अन्नपदार्थ खाणाऱ्या प्राण्यांना मिश्रहारी प्राणी असे म्हणतात.
तुझ्या सभोवताली आढळणाऱ्या विविध प्राण्यांच्या आकाराचे निरीक्षण कर. तुझ्या घराच्या अंगणात थोडे धान्य पसरुन टाक. थोड्या अंतरावर बसून ते धान्य खाण्यास येणाऱ्या पक्षी व किटकांच्या आकाराचे निरीक्षण कर.
तुझ्या घरात वापरले जाणारे दूध कोणकोणत्या प्राण्यांपासून मिळते ?
घरात वापरले जाणारे दूध गाय व म्हैशीपासून मिळते.
तुझ्या घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या आहार पदार्थांची यादी कर. त्यातील प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांभोवती गोल कर.
दूध, दही, लोणी, तूप, अंडी, गहू, मका, हरभरा, ज्वारी इत्यादी अनेक आहार पदार्थ आम्ही घरात वापरतो.
प्राण्यांपासून आम्हाला होणारे 5 उपयोग लिही.
उत्तर:
1. आपल्याला प्राण्यांपासून दूध मिळते.
2. आम्हाला प्राण्यांपासून लोकर मिळते.
3. प्राणी शेतकऱ्याला शेतीकामात मदत करतात.
4. गाडीच्या सहाय्याने प्राणी शेतकऱ्याला धान्य आणण्यासाठी व वस्तूंची ने आण करण्यासाठी मदत करतात.
5. काही प्राणी माणसाला आहार पदार्थ म्हणून उपयोगी पडतात. उदा: मासे,खेकडा,कोंबडी इत्यादी..
तुझ्या घरी काही प्राणी पाळले आहेस का? त्यांची देखभाल कशी करतोस ?
मी माझ्या घरात कुत्रे,कोंबडी आणि पोपट पाळले आहेत.त्यांना चांगले अन्न आणि धान्य खायला देतो.त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मी त्यांच्यासाठी घरटे आणि पिंजरे बांधले आहेत.
प्राणी उपयोग
बैल लोकर
म्हैस नांगरण
मेंढी मध
कोंबडी दूध
घोडा मृत प्राण्यांना खाऊन परिसराचे शुध्दीकरण
मधमाशी घोडागाडी
मासा अंडी
गिधाड पाण्यातील कीटक खाऊन परिसराचे शुध्दीकरण
उत्तर –
प्राणी | उपयोग |
बैल | नांगरण |
म्हैस | दूध |
मेंढी | लोकर |
कोंबडी | अंडी |
घोडा | घोडागाडी |
मधमाशी | मध |
मासा | पाण्यातील कीटक खाऊन परिसराचे शुध्दीकरण |
गिधाड | मृत प्राण्यांना खाऊन परिसराचे शुध्दीकरण |
ओळख पाहू मी कोण?
• लाल तुरा डोक्यावर, रंगीत माझी पिसे, साऱ्या गावाला जागे करतो, ओळखा मी कोण असे? कोंबडा
• मी मोठ्या पोटाचा आहे. मला पुढे आणि मागे शेपूट आहे.
हत्ती
आकार माझा लहान, लांब माझे कान, लाल माझे डोळे, छोट्याशाच मिशा, पकडायला आलात तर टुणकन उडी मारुन पळून जातो.
• ज्या झाडावर कोणीही चढू शकणार नाही त्या झाड्याच्या टोकापर्यंत चढण्यास मीच धाडशी व तेथील फळे खाण्यास शहाणी.
• उंदीर माझे खाद्य, आकार माझा लहान, वाघाची मावशी म्हणतात मला, पण मिशा आहेत छान.
हे तुला माहीत आहे का?
• वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. अलिकडे त्यांची संख्या कमी होत आहे. त्यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने ‘वाध वाचवा’ ही मोहीम सुरु केली आहे.
• प्राणी जगतामध्ये किटकांची संख्या सर्वात जास्त आहे.
• चित्ता हा 100 km. दर ताशी वेगाने पळतो.
• प्राणी जगतामध्ये 33 m लांबी असलेला निळा व्हेल मासा हा सर्वात मोठा प्राणी आहे.
• सरडा आणि काही कीटक शत्रूपासून आपले रक्षण करुन घेण्यासाठी परिसराप्रमाणे आपला रंग बदलतात.