KARNATAKA 5th EVS
LESSON- 14 आकाश
इयत्ता – पाचवी
विषय – परिसर अध्ययन
पाठ – 14
आकाश
खालील चित्राच्या सहाय्याने खालील प्रश्नाची उत्तरे दे.
• सौरमालेमध्ये किती ग्रह आहेत?
उत्तर – सौरमालेमध्ये आठ ग्रह आहेत.
• ग्रहांची नावे क्रमवार लिही?
उत्तर –बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ,गुरु,शनि,युरेनस,नेपच्यून
• सूर्याच्या अतिजवळ असलेला ग्रह कोणता ?
उत्तर –बुध हा सूर्याच्या अतिजवळ असलेला ग्रह आहे.
• या ग्रहापैकी कोणत्या ग्रहावर आपण राहतो ?
उत्तर –या ग्रहापैकी पृथ्वी या ग्रहावर आपण राहतो.
• सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर –गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.
सौरमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
उत्तर –बुध हा सौरमालेतील सर्वात लहान ग्रह आहे.
• सुर्यापासून अती दूर असलेला ग्रह कोणता ?
उत्तर –नेपच्यून हा सूर्यापासून अती दुर असलेल्या ग्रह आहे.
• सूर्यापासून पृथ्वी कितव्या स्थानावरती आहे?
उत्तर –सूर्यापासून पृथ्वी तिसऱ्या स्थानावरती आहे.
पृथ्वी एक आश्चर्य : तुला या पूर्वी माहीत असल्याप्रमाणे सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवर सजीवाना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांची यादी कर.
उत्तर – अन्न पाणी निवारा उष्णता हवामान जीवसृष्टी ऑक्सिजन इत्यादी.
1. कोणत्या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यास कमी अवधी लागतो ? कारण काय ?
उत्तर – बुध
या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यास कमी अवधी लागतो.कारण तो सूर्याच्या अति जवळ आहे.
2. कोणत्या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जास्तीत जास्त कालावधी लागतो? कारण काय?
उत्तर – नेपच्यून या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास जास्तीत जास्त कालावधी लागतो.कारण
तो सूर्यापासून अति दूर आहे.
3. कोणत्या ग्रहाचा परिवलन कालावधी हा परिभ्रमण कालावधीपेक्षा जास्त आहे?
उत्तर – शुक्र या ग्रहाचा परिवलन कालावधी हा परिभ्रमण कालावधीपेक्षा जास्त आहे.
*खालील दिलेल्या काही ग्रहाच्या वैशिष्टावरुन, त्यांच्या समोर संबंधीत ग्रहांची नावे लिही.
1 | लाल ग्रह | मंगळ |
2 | प्रकाशमान ग्रह | बुध |
3 | सर्वात मोठा ग्रह | गुरू |
4 | निळ्या हिरव्या रंगाचा ग्रह | युरेनस |
5 | जीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह | पृथ्वी |
6 | एका दिवसाचा अवधी एका वर्षापेक्षा जास्त असलेला ग्रह | नेपच्यून |
करुन बघ
: दररोज रात्री आकाशाकडे बघ, चंद्राचा दिसणारा आकार आणि दिसण्याची दिशा यांचे निरीक्षण कर. चमकणाऱ्या ताऱ्याचे निरीक्षण कर. त्यातील विशिष्ट ताऱ्यांच्या समुहाचे निरीक्षण कर व त्यांच्या हालचालीचे लक्षपूर्वक निरीक्षण कर. त्या नंतर खालील प्रश्नांची उत्तरे दे.
1. चंद्राचा दिसणारा आकार नेहमी सारखाच असतो काय?
उत्तर – चंद्राची परिवलन व परिभ्रमण यामुळे चंद्राच्या कला दिसून येतात म्हणून चंद्राचा दिसणारा आकार नेहमीसारखा दिसत नाही.
2.कोणत्या दिवशी चंद्र पूर्ण प्रकाशमान होतो? त्या दिवसाला आम्ही काय म्हणतो?
उत्तर –पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्णपणे प्रकाशमय होतो त्या दिवसाला आम्ही पौर्णिमा असे म्हणतो.
3.कोणत्या दिवशी चंद्र पूर्णपणे दिसत नाही? त्या दिवसाला आम्ही काय म्हणतो?
उत्तर –अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे दिसत नाही त्या दिवसाला आम्ही अमावस्या असे म्हणतो.
4.दररोज चंद्र एकाच ठिकाणी निश्चीत वेळेला दिसतो का?
उत्तर – चंद्राची स्थिती निश्चित नाही.कारण चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना टप्प्याटप्प्याने जातो त्यामुळे आकाशातील त्याची स्थिती दररोज बदलते.
5. तारे एकाच ठिकाणी आहेत का? अथवा त्यांचेही दिसण्याचे स्थान नेहमी बदलते का?
उत्तर –
तारे एकाच ठिकाणी नसतात ते सतत फिरत असतात. कारण पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दैनंदिन
गतीत बदल होतो.
6. काही
ताऱ्याना पाना जोडून कोणतातरी आकार रचू शकतो का? ताऱ्यांचे चित्र काढून वर्गात प्रदर्शित
कर.
उत्तर –होय
रचू शकतो.
कोणत्या
गटात कोण? खाली दिलेल्या कोष्टकात लिही.
सूर्य, पृथ्वी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि आणि ध्रुवतारा
तारा | ग्रह | उपग्रह |
सूर्य | पृथ्वी | चंद्र |
ध्रुवतारा | मंगळ |
|
| बुध |
|
| गुरू |
|
| शुक्र |
|
| शनी |
|
खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1. सूर्यमाला म्हणजे काय?
उत्तर – सूर्य आणि त्याच्याभोवती फिरणाऱ्या अवकाशीय घटकांच्या समुहाला सूर्यमाला असे म्हणतात.
2. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता?
उत्तर – चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
3. खालील अवकाशीय घटकांचे प्रमुख वैशिष्ट्ये लिहा अवकाशीय घटक प्रमुख वैशिष्ट्ये उल्का लघुग्रह
अवकाशीय घटक | प्रमुख वैशिष्ट्ये |
उल्का | जेंव्हा ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरतात तेंव्हा घर्षणाने पेटून प्रकाशमान रेषेसारखे अवकाशात दिसतात. |
लघुग्रह | जास्तीत जास्त लघुग्रह हे मंगळ व गुरु ग्रहाच्या कक्षेमध्ये आढळतात. |
धूमकेतू | धूमकेतू हे बर्फमय अवकाशीय घटक असून ते सूर्याभोवती फिरतात. |