इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – भूगोल
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण-29 वे
कर्नाटकातील प्रमुख पर्यटन केंद्रे
स्वाध्याय
1. रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
2. नंदी हिल या चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात आहे.
3. अब्बी धबधबा मडकेरी या शहराजवळ आहे.
4. ‘कर्नाटकाचा नायगारा’ असे गोकाकच्या धबधब्याला म्हणतात.
5. गोकर्ण जवळ ओम हे बीच आहे.
6. ‘राजवाड्याचे शहर’ असे म्हैसूरला म्हणतात.
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. प्रवास करण्यामागचे विविध उद्देश कोणते ?
उत्तर – प्रवासाचे अनेक फायदे आहेत.
विविध ठिकाणी असलेली संस्कृती समजून घेणे.
पर्यटन ठिकाणी असलेल्या लोकांचे राहणीमान समजून घेणे.
विरंगुळा मिळतो.
ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळवणे.
2. पर्यटन स्थळी कोणकोणत्या मूलभूत सोयी आवश्यक आहेत?
उत्तर – पर्यटन स्थळी निवास,उपहार गृह,वाहतूक,सुरक्षा नियोजन इत्यादी मुलभूत सोयी उपलब्ध असणे आवश्यक असते.
3. कुद्रेमुख येथील थंड हवेच्या ठिकाणाबद्दल माहिती लिहा.
उत्तर – चिक्कमंगळूर जिल्ह्यातील कुद्रेमुख हे थंड हवेचे ठिकाण आहे.येथे हिरवीगार जंगले,टेकड्या, कॉफीचे मळे आणि धबधबे असल्याने हे एक सुंदर आणि शांत वातावरण असणारे नयनरम्य ठिकाण आहे.
4. कर्नाटकातील अभयारण्यांची नावे लिहा.
उत्तर – कर्नाटकातील अभयारण्यांमध्ये बंडीपूर, नागरहोळे,दांडेली आणि भद्रा या वन्यप्राणी अभयारण्ये आहेत.
– रंगनाथिट्टू, कोक्करे बेल्लूर, मंदगड्डे आणि गुडवी ही पक्षांसाठी असलेली अभयारण्ये आहेत.
5. कर्नाटकातील ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणांची नावे लिहा.
उत्तर – कर्नाटकातील ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे:
हंपी: युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून ओळखले आणि घोषित केले.
बेलूर, हळेबीड, सोमनाथपूर: होयसळ काळातील सुंदर शिल्पकलेसाठी ओळखले जाते.
बदामी, पट्टदकल, ऐहोळे: समृद्ध चालुक्य वास्तुकला असलेली ऐतिहासिक स्थळे.
विजयापुरचे गोलघुमट: एक ऐतिहासिक समाधी.
लक्कुंडी, बनवासी, बसरालू, : ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व असलेली ठिकाणे.
मैसुरू, श्रीरंगपट्टण: वडेयर घराण्याशी संबंधित.
बिदरचा किल्ला, विजयपुरा, कलबुर्गी: ऐतिहासिक महत्त्व असलेले मजबूत किल्ले.
हंपी (विजयनगर), केळदी, चित्रदुर्ग, मधुगिरी: कर्नाटकचा ऐतिहासिक भूतकाळ प्रतिबिंबित करणारे किल्ले.
ही ऐतिहासिक स्थळे केवळ कर्नाटकची सांस्कृतिक समृद्धीच दाखवत नाहीत तर जगभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींनाही आकर्षित करतात.
3. जोड्या जुळवा
अ ब
1. बिळिगिरी रंगन बेट्ट a) उत्तर कन्नड जिल्हा
2. जोगी टेकड्या b) चामराजनगर
3. याण c) पक्षीधाम
4. अणशी d) चित्रदुर्ग
5. रंगनतिट्टू e) राष्ट्रीय उद्यान
f) मयूरधाम
उत्तर –
अ ब
1. बिळिगिरी रंगन बेट्ट b) चामराजनगर
2. जोगी टेकड्या d) चित्रदुर्ग
3. याण a) उत्तर कन्नड जिल्हा
4. अणशी e) राष्ट्रीय उद्यान
5. रंगनतिट्टू c) पक्षीधाम