7th SS 15.FREEDOM MOVEMENT स्वातंत्र्य युद्ध

 7वी समाज विज्ञान 15. स्वातंत्र्य युद्ध 

कर्नाटक राज्य पाठ्यपुस्तक मंडळ   

इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 15. स्वातंत्र्य युद्ध 

मुख्य इसवी सन

  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची
    स्थापना :
    1885

  • मवाळांचा काळ : 1885-1905

  • जहालांचा काळ : 1905-1919

  • बंगालची फाळणी : 1905

  • मुस्लीम लीगची स्थापना : 1906

  • सूरत दुफळी : 1907

  • जालीयनवाला बाग हत्याकांड : 1919

  • गांधीजींचा जन्म : 2 ऑक्टोबर 1869

  • असहकार चळवळ : 1920-1922

  • चौरीचौरा हत्याकांड : 1922




  • संपूर्ण स्वराज्याची घोषणा : 1929

  • संपूर्ण स्वराज्य दिन : 26 जानेवारी 1930

  • मीठाचा सत्याग्रह : 12 मार्च 1930

  • दुसरे महायुद्ध : 19391945

  • भारत छोडो आंदोलन : 1942

  • भारताला स्वातंत्र्याची घोषणा
    :
    3 जून 1947

  • स्वतंत्र पाकिस्तानची
    निर्मिती :
    14 ऑगस्ट 1947

  • स्वतंत्र भारताची निर्मिती : 15 ऑगस्ट 1947




अभ्यास

एका शब्दात किंवा
वाक्यात उत्तरे द्या

1.
भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसची स्थापना कोणी केली
?
उत्तर – भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ब्रिटिश अधिकारी अॅलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी केली.

2. ‘
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी
मिळवणारच
हे कोणी सांगितले ?
उत्तर – स्वराज्य हा
माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच
हे बाळ गंगाधर टिळक यांनी सांगितले.
3.
इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली ?
उत्तर – इंडिया
मुस्लिम लीगची स्थापना
1906 मध्ये झाली.
4.
कोणत्याही क्रांतिकारी संघटनेचे नाव सांगा.
उत्तर – मित्रमेळा, अभिनव भारत इत्यादी.
5.
गांधीजींचा जन्म कोठे व केंव्हा झाला?
उत्तर – गांधीजींचा
जन्म पोरबंदर येथे
2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला.
6. ‘
फॉरवर्ड ब्लॉकपक्ष कोणी
सुरू केला
?
उत्तर – फॉरवर्ड
ब्लॉक

पक्ष कोणी सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केला.
7. ‘
भारत छोडोआंदोलनात गांधीजींनी कोणती घोषणा केली ?
उत्तर – भारत छोडोआंदोलनात गांधीजींनी करा किंवा मराही घोषणा केली.
8. ‘
तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला
स्वातंत्र्य देतो
अशी घोषणा कोणी केली ?
उत्तर – तुम्ही मला
रक्त द्या
, मी तुम्हाला स्वातंत्र्य
देतो

अशी घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी केली.
9.
संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर – संविधानाच्या
मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बी.आर.आंबेडकर होते.

10.
भारताचा पोलादी पुरुषकोणाला
म्हणतात
?
उत्तर – भारताचा
पोलादी पुरुष
असे सरदार वल्लभभाई पटेल
यांना म्हणतात.

दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे
द्या.

1.
भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसची कोणतीही दोन उद्दिष्टे लिहा.

उत्तर – भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसची उद्दिष्टे-

राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे.
जनतेच्या मागण्या सरकारपुढे मांडून ठोस मत
जाणून घेणे.

प्रांतवाद सोडून राष्ट्रीयता वाढीस लावणे.

2. लाल, बाल आणि पाल या नावाने लोकप्रिय राष्ट्रीय नेते कोण ?
उत्तर – लाल  : लाला लजपतराय
  बाल : बाळ
गंगाधर टिळक

  पाल  : बिपिनचंद्र पाल
हे लाल, बाल
आणि पाल या नावाने लोकप्रिय राष्ट्रीय नेते होते.



3.
होमरुल चळवळ कोणी सुरू केली?
उत्तर – होमरुल चळवळ
अॅनी बेझंट यांनी सुरू केली.


4.
जालीयनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले या घटनेला
जबाबदार ब्रिटिश पोलीस अधिकारी
कोण?.
उत्तर – जालीयनवाला
बाग हत्याकांड
1919 मध्ये घडले. जनरल डायर
हा या घटनेला जबाबदार ब्रिटिश पोलीस अधिकारी होता.

5.
दांडी यात्रेचे महत्व काय ?
उत्तर – 12 मार्च
1930
रोजी नागरी कायदेभंग चळवळीची सुरुवात गांधीजींनी दांडी
यात्रेपासून केली. गांधीजींनी लोकांकडून मीठ तयार करून ब्रिटिशांच्या अन्यायकारक
मीठावरील कायद्याचा विरोध केला.यामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली.

6. भारत छोड़ो आंदोलन चळवळीबद्दल माहिती लिहा.
उत्तर – महात्मा
गांधींनी
8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाचे आवाहन केले.या आंदोलनात
गांधीजींनी
करा किंवा मराची घोषणा केली.या चळवळीला भारतीय समाजातील विविध घटकांकडून
व्यापक पाठिंबा मिळाला.शाळा
, कॉलेज
व कारखान्यात ब्रिटीश सरकार विरुद्ध संप सुरू झाले.ब्रिटीशांनी प्रमुख नेत्यांना
अटक केली आणि चळवळ दडपून टाकली.भारताच्या स्वातंत्र्याच्या मार्गाला आकार देण्यात
महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

7. प्रमुख आदिवासी आणि शेतकरी चळवळींची नावे सांगा.
उत्तर – संथालांचे
बंड
,
बिरसा चळवळ, चंपारण्य सत्याग्रह, खेडा शेतकरी आंदोलन,मापिळ्ळे दंगा इत्यादी प्रमुख आदिवासी आणि शेतकरी चळवळी
झाल्या.

टीपा लिहा
1.
राष्ट्रीयतेच्या
वाढीस हातभार लावणारा एक घटक.

उत्तर –  राष्ट्रीयतेच्या
वाढीस हातभार लावणारे अनेक घटक होते.


  • पाश्चात्य शिक्षण आणि आधुनिक ज्ञान विज्ञानाचा परिचय
  • ब्रिटिशांची एकसमान प्रशासन व्यवस्था
  • ब्रिटिशांकडून आर्थिक शोषण
  • परदेशी विद्वानांच्या संशोधनातून परंपरेची जाणीव
  • भारतीय समाज सुधारकांच्या नेतृत्वाखालील सामाजिक आणि
    धार्मिक चळवळी
  • भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धापासून प्रेरणा
  • इंग्रजांनी केलेला जातीय भेदभाव



2.
रौलेट कायदा:
उत्तर –  1919 मध्ये रौलेट कायदा करण्यात आला.या कायद्याने सरकारला केवळ
संशयावर आधारित व्यक्तींना अटक करण्याची व पूर्व सुचना न देता कोणत्याही भागात शोध
मोहीम हाती घेण्याची परवानगी मिळाली.या कायद्त्यायानुसार अटक केलेल्च्याया
व्यक्तीला वकील ठेवण्याचा अधिकार नव्हता.म्हणून या कायद्याला भारतीयांनी विरोध
केला.या कायद्याचा विरोध करताना
जालियनवाला
बाग

सारखी वाईट घटना घडली.

3. सुभाषचंद्र बोस:
उत्तर – सुभाषचंद्र
बोस हे गांधींच्या राजनीतीचा विरोध करणे स्वातंत्र्य सैनिक होते.त्यानी ब्रिटिश
राजवटीविरुद्ध लढण्यासाठी इंडियन नॅशनल आर्मी (
INA) ची स्थापना केली.दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रीतान्च्या
शत्रूकडून मदत घेऊन भारताला ब्रिटीश राजवटीपासून मुक्त करण्याचे त्यांचे उद्दिष्ट
होते.तुम्ही मला रजत द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो असे आवाहन त्यांनी लोकांना
केले होते.नेताजी धैर्य आणि देशभक्तीचा वारसा जनतेला देऊन गेले.

4. डॉ. बी.आर. आंबेडकर:
उत्तर – डॉ. बी.आर.
आंबेडकर हे दलित आणि समाजातील उपेक्षित वर्गांच्या कल्याणासाठी वकिली करणारी
प्रमुख व्यक्ती होते.भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका
बजावली आणि सामाजिक समतेसाठी लढा दिला.उपेक्षितांसाठी सामाजिक स्वातंत्र्य आवश्यक
आहे असे मानले तसेच उपेक्षित वर्गाना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे असे त्यांचे मत
होते. डॉ. बी.आर. आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.
1990 मध्ये त्याना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला
योग्य शब्दासह रिकाम्या जागा
भरा.

1.
गांधीजींचे राजकीय गुरू गोपालकृष्ण
गोखले
होते.

2.
चौरीचौरा 1922 वर्षात घटना घडली.
3. 1929
मध्ये संपूर्ण
स्वातंत्र्याची घोषणा स्वीकारण्यात आली.

4.
कांग्रेस समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आचार्य
नरेंद्र देव
होते.
5.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित
जवाहरलाल नेहरू
होते.

6.
द्विराष्ट्र सिद्धाताचा पुरस्कार करणारी
व्यक्ती महमद अली जिना होती.

7. ‘
भारतीय राष्ट्रीय सेनेचे (आय. एन.ए.) नेते
सुभाषचंद्र बोस.

8.
संविधान रचना समितीचे अध्यक्ष डॉ.
बी.आर. आंबेडकर
होते.


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *