5th EVS 9.FOOD – ESSENCE OF LIFE आहार – जीवनाचा आधार

 इयत्ता – पाचवी 

विषय – परिसर अध्ययन 

पाठ – 9 

आहार – जीवनाचा आधार 

imageedit 13 3414656929

पौष्टिक आहारधान्यांचे उपयोग:-

पौष्टिक आहारधान्ये कमी पाणी वापरुन व कमी वेळेत पिकवू शकतो.
 
ही सर्व प्रकारच्या वातावरणात पिकू शकतात.
 
रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर न करता पिकवू शकतो. यांना दुष्काळाचे मित्र म्हणतात.
 
ही जास्त पौष्टिक असतात.
 

आपण घेत असलेल्या आहारात बरेच पौष्टिक घटक असतात हे माहीत आहेच. पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात असणारे अन्नपदार्थ खाली दिलेले आहेत. पौष्टिक घटक व अन्नपदार्थाशी संबंधीत अचूक विधान जोड.

उत्तर –

imageedit 2 4727038811
 
उत्तर – 
imageedit 3 6447199217
उत्तर – 
imageedit 5 2378935265
5th watermark%20(1) page 0004
imageedit 5 3004027506
imageedit 11 4595650839
imageedit 8 4136583298
खालील प्रश्नांची उत्तरे दे. (वरील तक्त्याचा उपयोग कर.)
1.उन्हाळ्यात तू कोणत्या प्रकारचा आहार घेतोस?
उत्तर – ताक,कोशिंबीर,ज्यूस,पाणी,शीतपेय,फळे,भाज्या यासारखा शरीराला थंड ठेवणारा आहार उन्हाळ्यात घेतो.
2.हिंवाळ्यात तू कोणत्या प्रकारचा आहार घेतोस?
हिंवाळ्यात गाजर, बटाटा,मुळा,रताळे, रताळे, बीट्स इत्यादी तसेच हिरव्या पालेभाज्या,बाजरीचे पदार्थ इत्यादी शरीराला गरम ठेवणारे आहार पदार्थ मी खातो.
3.तुझ्या जिल्ह्यातील लोकांचा मुख्य आहार कोणता?
 
कर्नाटकातील विविध प्रदेशातील लोकांचा सामान्य आहार
उत्तर कर्नाटक – ज्वारीची भाकरी ,मसाले भात,आमटी,मसालेदार भाज्या
दक्षिण कर्नाटक – बाजरीचे गोळे,हिरवी आमटी,म्हैसूर मसाला डोसा,खोबऱ्याची चटणी,सांबार इत्यादी.
किनारपट्टी प्रदेश – चिकन करी,फिश करी,भात इत्यादी.
मलनाड प्रदेश – तांदळाची भाकरी,चटणी,आमटी,कडूबू(तांदळाचा पदार्थ)
 
4.कर्नाटकातील विविध प्रदेशातील लोकांचा आहार वेगवेगळा आहे.का?
उत्तर – हवामान,स्थानिक प्रदेशातील पीक उत्पादन,परंपरा आणि संस्कृती प्रमाणे कर्नाटकातील विविध प्रदेशातील लोकांचा आहार वेगवेगळा आहे.कोणते आहार पदार्थ सहज उपलब्ध आहेत आणि तेथील स्वयंपाकाच्या पद्धतीनुसार कर्नाटकातील विविध प्रदेशातील लोकांचा आहार वेगवेगळा आहे.
 
विचार करा:
जंक फूड आरोग्यासाठी चांगले नाही. का
?
उत्तर -जंक फूडमध्ये अनेकदा आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असतो आणि त्यात स्निग्ध पदार्थ,साखर आणि कृत्रिम पदार्थ यांसारखे घटक जास्त प्रमाणात असतात.अशा अन्नाच्या नियमित सेवनामुळे लठ्ठपणा, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि आजारांचा धोका यासारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
 
विचार करः फास्ट फूड म्हणजे काय?
उत्तर -फास्ट फूड म्हणजे जेवण किंवा स्नॅक्स जे त्वरीत तयार केले जातात,सहज उपलब्ध होतात यामध्ये
पौष्टिक घटक कमी असतात.उदा.पिझ्झा
, बर्गर,सँडवीच इत्यादी.
 
विचार करः मुदत संपलेला आहार किंवा जास्त रासायनिक पदार्थ असलेला आहार खाणे अपायकारी आहे.कसे?
उत्तर – होय,मुदत संपलेला आहार किंवा जास्त प्रमाणात रसायने असलेले अन्न खाल्ल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.मुदत झालेल्या अन्नामध्ये हानिकारक पदार्थ असू शकतात ज्यामुळे अन्न विषबाधा
किंवा इतर आजार होऊ शकतात.त्याचप्रमाणे
, जास्त प्रमाणात रसायने, असलेले पदार्थ नियमित सेवन केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
 
कृती : अनेक प्रसंगामध्ये अन्नाची नासाडी होत असते. असे प्रसंग व त्याची कारणे यांची शिक्षकांच्या मदतीने यादी करा.
उत्तर – लग्न समारंभ,हॉटेल्स,मंदिरातील प्रसाद,घरातील कार्यक्रम,राजकीय कार्यक्रम इत्यादी प्रसंगी अन्नाची नासाडी होत असते.
कारणे –
गरजेपेक्षा जास्त अन्न घेणे.
अन्न चांगले न शिजणे.
अन्न चविष्ट नसणे.
लोकांना कामाची गडबड असणे.
इत्यादी कारणांमुळे अन्नाची नासाडी होते.


 

 
 
Share with your best friend :)