राज्य पाठ्याक्रमाच्या सरकारी,अनुदानित,विना अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक मार्गदर्शिकेची अंमलबजावणी करणेबाबत..
दि. 31 मार्च 2023 रोजी कर्नाटक शिक्षण विभागाने तात्कालील क्रिया योजना जाहीर केली असून त्यानुसार 2023-24 या शैक्षणिक वर्षाशैक्षणिक क्रिया योजनाविषयी…
वरील विषयाच्या अनुषंगाने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील उपक्रम सुरू होत असून राज्यभर एकसमान आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी वार्षिक शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये वार्षिक/मासिक पाठांचे वाटप, सहपाठ्य कृती चाचणी आणि मूल्यमापन विश्लेषण,दर्जेदार शिक्षणासाठी परिणामाभिमुख उपक्रमांचे व्यवस्थापन आणि विविध शालेय स्तरावरील CCE उपक्रमांचे नियोजन आणि तयारी असे नियोजन करण्यात आले आहे.
संदर्भ-2 नुसार प्रस्तुत शैक्षणिक वर्षात 29.05.2023 पासून शाळा सुरू करण्याचे सुचवण्यात आले आहे.त्यानुसार वार्षिक शैक्षणिक क्रिया योजना वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये एकसमान शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी,शैक्षणिक कालावधी,सुट्ट्या आणि वार्षिक उपक्रम खालील प्रमाणे नियोजित करण्यात आले आहेत.
द्वितीय सत्र दिनांक 25.10.2023 ते 10.04.2024पर्यंत
दसरा सुट्टी दिनांक 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत
उन्हाळी सुट्टी दिनांक 11.04.2023 ते 28.05.2023 पर्यंत
2023-24 शैक्षणिक वर्षातील शाळा कर्तव्याचे दिवस आणि सुट्टीचे दिवस विवरण
1. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण उपलब्ध शालेय कर्तव्याचे दिवस – 244 दिवस
2.चाचण्या आणि मुल्यांकन कार्य (FA आणि SA)– 26 दिवस
3.सहपाठ्य उपक्रम/अभ्यासक्रम उपक्रम/स्पर्धा व्यवस्थापन – 24 दिवस
4.मूल्यमापन आणि परिणाम विश्लेषण कार्यासाठी– 10 दिवस
5.शालेय स्थानिक सुट्ट्या – 4 दिवस
6.अध्यापन-अध्ययन प्रक्रियेसाठी शिल्लक दिवस – 180 दिवस
1. संदर्भ-2 नुसार 5वी आणि 8वीच्या SA-2 मूल्यमापनासह उर्वरित 1ली ते 9वी इयत्तेचा निकाल दिनांक:08.04.2023 रोजी प्राथमिक शाळा आणि दिनांक:10.04.2023 रोजी माध्यमिक शाळा स्तरावर आयोजित करणे आणि जाहीर करणे.पालक सभा आयोजित करणे.
2. शाळेच्या स्थानिक सुट्ट्यांसंबंधी शाळानिहाय तारखा निर्दिष्ट करून जून-2023 च्या पहिल्या आठवड्यात क्षेत्र शिक्षण अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी.
3. 10.04.2023 रोजी चालू शैक्षणिक वर्षाचा शेवट आहे.इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या मूल्यमापन चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर आणि निकाल 100% गुणांवर एकत्रित केल्यानंतर,नियमानुसार ग्रेड रेकॉर्ड करणे आणि 25.04.2023 पूर्वी SATS पोर्टलवर अपडेट करणे.
4. दिनांक: 14.04.2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक,सहशिक्षक आणि SDMC/खाजगी शाळांनी संबंधित व्यवस्थापनासह आणि मुलांनी चांगली तयारी करून अनिवार्यपणे साजरी करणे.
5. सन 2023-24 साठी सरकारी शाळांमधील इयत्ता 1 ते 10 पर्यंतच्या सर्व मुलांसाठी मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके आणि खाजगी शाळांची पाठ्यपुस्तके संबंधित तालुक्यांना आधीच पुरविली गेली आहेत,ती पहिल्या टप्प्यात दिनांक: 10.04.2023 पर्यंत संबंधित तालुक्यांतील मुख्याध्यापकांमार्फत मुलांपर्यंत पोहोचविण्यात यावीत आणि नंतर टप्प्याटप्प्याने, शाळेच्या उद्घाटन समारंभात मुलांनी गणवेश परिधान करून पाठ्यपुस्तके घेऊन शाळेत उपस्थित राहतील अशी व्यवस्था करावी.
6. दिनांक:11.04.2023 ते दिनांक:28.05.2023 पर्यंत शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर झाल्यामुळे, शाळेच्या मुख्याध्यापकानी अक्षर दसोह कार्यक्रमांतर्गत शालेय साहित्य आणि कागदपत्रे तसेच मध्यान्ह गरम करण्यासाठी लागणारे साहित्य सुरक्षित ठेवावे व विधानसभा निवडणुक मतदान केंद्र असणाऱ्या शाळांनी आवश्यक सहकार्य करावे.
B. शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील महत्वाचे मुद्दे -;
1. नवीन प्रवेश नोंदणी प्रक्रिया 31.05.2023 पासून सुरू होईल आणि 30.06.2023 पर्यंत समाप्त होईल.
2.कोविड-19 ची प्रतिकूल परिस्थितीमुळे ज्या मुलांना शिकण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध झाले नाहीत,जे विद्यार्थी शाळेत सतत गैरहजर असतात आणि शाळा सोडलेले विद्यार्थी अशा यांच्या संपर्कात सर्व अधिकाऱ्यांनी राहावे.नवीन प्रवेश नोंदणी आंदोलन व्यापकपणे अंमलात आणावी.
3. ख्रिसमस सुट्टी विषयी संबंधीत शैक्षणिक संस्थांनी जिल्हा शिक्षण उपनिर्देशक (प्रशासकीय) यांच्याकडे मागणी केल्यास याविषयी संबंधीत जिल्हा शिक्षण उपनिर्देशक (प्रशासकीय) यांनी परिशीलन करून निर्णय घेणे.
सदर डिसेंबर महिन्यातील ख्रिसमस सुट्टीचा कालावधी भरून काढण्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील दसरा सुट्टीतील कमी करून दिलेली ख्रिसमस सुट्टी भरून काढावी.
4.जिल्हा आणि तालुका नोडल अधिकारी राज्य/जिल्हा कार्यालये,क्लस्टर स्तरावरील CRP, क्षेत्र शिक्षण अधिकारी आणि ब्लॉक स्तरावरील कर्मचारी,जिल्हा स्तरावर उपनिर्देशक (प्रशासन) आणि (विकास) यांनी शैक्षणिक मार्गदर्शिकामध्ये विहित केलेली तयारी करुन शाळा प्रारंभोत्सव,शाळा प्रारंभ पूर्व तयारी,शिक्षक कमतरता आणि शिक्षण विभागाच्या प्रोत्साहदायक योजना जसे की, माध्यान्ह भोजन योजना,गणवेश,पाठ्यपुस्तके,शूज आणि सॉक्सचे वितरण इत्यादी योजना आणि शालेय वार्षिक कृती आराखडा, विद्यार्थी दाखलाती यांचे परिशीलन करण्यासाठी मिंचीन संचार आयोजित करणे.
5. राज्यात गणराज्य दिन,स्वातंत्र्य दिन तसेच राज्योत्सव दिन आणि इतर प्रमुख जयंती संबंधित दिनांक दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करणे अनिवार्य असेल.
6. आंदोलन,संप किंवा इतर कारणामुळे शाळेंना सुट्टीची घोषणा दिल्याने निर्धारित शैक्षणिक कर्तव्याचे दिवस कमी झाल्यास या कालावधीतील शालेय कर्तव्याची दिवस पुढील सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस शाळा भरून काढावी.
7. परीक्षेचे दिवस, मूल्यमापन दिवस आणि सहपाठ्य अभ्यासक्रमाचे दिवस हे देखील शालेय कर्तव्य दिवस म्हणून मानले जावेत.
8. शैक्षणिक वर्ष 2023-24 चा वार्षिक अभ्यासक्रम राज्यभर एकसमान घेण्यासाठी महिनावार पाठ नियोजन करण्यात आले आहे.त्यानुसार FA-1,FA-2,FA-3,FA-4 आणि SA-1,SA-2 परीक्षा निर्धारीय अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात.
9. 2022-23 या वर्षी 5वी आणि 8वी वर्गासाठी SA-2 मुल्यांकन घेण्यात आले होते,त्याप्रमाणे 2023-24 या वर्षामध्ये सदर मुल्यांकनाची माहिती कळविला जाईल.