ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
1 खालील प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत त्यापैकी
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. 20×1 = 20
1.’शिवतेज हुशार असून तो नियमित अभ्यास
करतो.” वरील वाक्यातील विशेषण ओळखा –
A. शिवतेज
B. हुशार
C. तो
D. करतो
उत्तर: B. हुशार
2. ‘पोळा सणादिवशी बैलांना सजविले जाते.
वरील वाक्यातील ‘बैल‘ या शब्दांचा
स्त्रीलिंग शब्द कोणता?
A. हंस
B. रेडा
C. गाय
D. शेळी
उत्तर: C. गाय
3. वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये प्रथम
क्रमांक आलेल्या विद्याथ्यांना पारितोषिक दिले जाते. वरील वाक्यातील ‘पारितोषिक ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा –
A. सन्मान
B. बक्षीस
C. मान
D. गौरव
उत्तर: B. बक्षीस
4. ‘मी निबंध लिहीन.‘ वरील वाक्यातील काळ ओळखा-
A. वर्तमानकाळ
B. भूतकाळ
D. अपूर्ण भूतकाळ
C. भविष्यकाळ
उत्तर : C. भविष्यकाळ
5.राजू सहलीला निश्चित जाणार आहे.
वरील वाक्यातील ‘निश्चित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता
A. ठाम
B. नक्की
D. निर्धार
C. अनिश्चित
उत्तर : C. अनिश्चित
6. ‘श्रोता ‘ हा शब्द या शब्द समूहास वापरला जातो-
A. भाषण करणारा
B. भाषण ऐकणारा
C. भाषण लिहून देणारा.
D. भाषण पाठांतर करणारा
उत्तर : B. भाषण ऐकणारा
7. “सुसंगती सदा घडो। सुजन वाक्य
कानी पड़ो। कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा
नावडो।।
वरील पद्य ओळीत शेवटी, मध्ये, ठराविक
ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे सारखी आलेली आहेत उदा. झडो, पडो, घडो, नावडो. तरी वरील पद्य ओळीतील अलंकार कोणता ?
A. यमक
B. अनुप्रास
C. श्लेष
D. उपमा
उत्तर : A. यमक
8. कष्ट घेतल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही या
अर्थाची खालील पैकी म्हणं ओळखा-
A. करावे तसे भरावे
B. आयत्या विळात नागोबा
C. करावे तसे मरावे
D. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
उत्तर : D. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
9. एखादी गोष्ट अधिक चांगली होणे, या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ओळखा-
A. फत्ते होणे
B. उखळ पांढरे होणे
C. आनंद गगनात न मावणे
D. दुधात साखर पडणे
उत्तर : D. दुधात साखर पडणे
10. ? या चिन्हास प्रश्नचिन्ह म्हणतात. तर ! या चिन्हास
काय म्हणतात?
A. पूर्णविराम चिन्ह
B. स्वल्प विराम चिन्ह
C. उद्गारवाचक चिन्ह
D. एकेरी अवतरण चिन्ह
उत्तर :
C.
उद्गारवाचक चिन्ह
11. संत पुरंदरदास आणि संत तुकाराम या दोन्ही
सतांचे आराध्य दैवत कोणते?
A. विठ्ठल
B. महादेव
C. श्रीराम
D. हनुमान
उत्तर : A. विठ्ठल
12. ‘शोधते माझी नजर माय,आता मी उदास होतो. दिसता कृश मोळीवाली, मोळी तिची विकत घेतो. “
कवि कोणाची मोळी विकत घेतो ?
A. म्हातारी स्त्री
C. कामगाराची
B. मोळीवाली स्त्री
D. शेतकऱ्यांची
उत्तर : B. मोळीवाली स्त्री
13. म्हणे भोज्यांच्या परवडी सवंगडी आणिती
तातडी दही दुधाच्या कावडी अति आवडी आणिलिया ।। दही दुधाच्या कावडी कोण आणतात ?
A. परवडी
B. सवंगडी
C. कावडी
D. आवडी
उत्तर : B. सवंगडी
14. अगा वैकुंठीच्या राया।
अगा विठ्ठल सखया अगा पुंडलीक वरदा।
अगा नारायणा
अगा वसुदेवनंदना
अगा विष्णू तू गोविंदा ।
अगा रखुमाईच्या कांता
वरील ओळीमध्ये कोणाचे वर्णन आले आहे –
A. श्रीराम
B. सीता
C. विठ्ठल
D. हनुमान
उत्तर : C. विठ्ठल
15. दगडावरील कोरीव कामास काय म्हणून संबोधले
जाते –
A. शिल्पकला
B. चित्रकला
C. संगीत कला
D. हस्तकला
उत्तर: A. शिल्पकला
16. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार
स्वाक्षरी मागायला आलेल्या विद्यार्थ्यांना ” बहुभाषिक व्हा ” असा संदेश देत.
वरील वाक्यातील स्वाक्षरी यांचा अर्थ सांगा –
A. स्वतः
B. सही
C. नमुना
D. उदाहरण
उत्तर : B. सही
17.
भारत देशात विविधतेतून एकता दिसून येते का ?
A. भारत देशात हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध धर्मीय लोक राहतात
B. भारत देशात फक्त ख्रिश्चन धर्मोय लोक
राहतात
C. भारतात खूप मंदिरे आहेत.
D. भारतात लोकसंख्या जास्त आहे.
उत्तर : A. भारत देशात हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध धर्मीय लोक राहतात.
18.
लोहार लोखंडी वस्तू बनविण्याशी संबंधित काम करतो.
सुतार लाकडी कामाशी संबंधित काम करतो. तर सोनार
A. बांबूपासून वस्तू तयार करतो
B. सोन्या चांदीच्या वस्तू तयार करतो
C. भाजीपाला, वस्तु, विकतो
D. बांधकामाची कामे करतो.
उत्तर : B. सोन्या चांदीच्या वस्तू तयार करतो
19. एखादा
बाल मजूर दिसल्यास तुम्ही काय कराल ?
A. कामाला पाठविणे.
B. त्याला शिक्षणाचे महत्व सांगणे.
C. त्याच्याकडून काम करून घेणे.
D. त्याला काही पैसे देणे.
उत्तर : B. त्याला शिक्षणाचे महत्व सांगणे.
20.
अपघात होऊ नये म्हणून आपण कोणती दक्षता घ्याल ?
A. वाहने वेगात चालवावीत.
B. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे.
C. हेल्मेटचा वापर करावा.
D. दोन वाहनामध्ये अंतर ठेवू नये.
उत्तर : C. हेल्मेटचा वापर करावा
II खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात
लिहा.
21. मराठी महिन्यांची नांवे लिहा – 2 Marks
उत्तर : मराठी महिन्यांची नांवे खालीलप्रमाणे -:
चैत्र, वैशाख,ज्येष्ठ, आषाढ,
श्रावण, भाद्रपद,आश्विन, कार्तिक,
मार्गशीर्ष, पौष,माघ, फाल्गुन
22.
पावसाळा ऋतूतील गंमती जमती लिहा –2 Marks
उत्तर : पावसाळा ऋतू म्हटलं की,
आम्हा सर्व मुलांचा आवडता ऋतू.पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी दिसते.बेडूक डरांव
डरांव करत असतात.पावसाच्या साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडायला खूप मज्जा
वाटते.निरनिराळ्या रंगाचे रेनकोट,छत्र्या घेऊन शाळेला जाताना एक वेगळीच मज्जा
वाटते.पावसाळ्यात मोर आनंदाने बेभान होऊन नाच करतो.तेंव्हा ‘नाच रे मोरा आंब्याच्या
वनात, नाच रे मोरा नाच’ हे गीत आठवते.
23. तुला कोणकोणत्या हस्तकलांची माहिती आहे. ? 2 Marks
उत्तर: सुतारकाम,बुरुड,विणकाम,चर्मकला,दगडावरील कोरीव
काम,अगरबत्ती बनवणे,कागदी वस्तू बनविणे,गवंडीकाम,सोनारकाम,टोपल्या तयार करणे,खेळणी बनविणे,काचकाम,कुंभार
काम,शिल्पकाम इत्यादी हस्तकला मला माहित आहेत.
24. मोबाईलचे चार फायदे लिहा – 2 Marks
उत्तर : मोबाईलचे अनेक फायदे अआहेत ते खालीलप्रमाणे –
1.
जगातील कोणत्याही व्यक्तीशी क्षणात संपर्क साधता येतो.
2.
मोबाईलमुळे कोणतीही माहिती सहज मिळवता येते.
3.
मोबाईलवरून कोणतीही वस्तू घरबसल्या खरेदी करता येते.
4.
Whatsapp सारख्या अॅपमुळे जगातील कोणत्याही व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर
बोलू शकतो.
5.
अभ्यासाशी संबंधित कोणतीही माहिती समजून घेता येते.
6.
एका क्लिकवर बँकेचे
व्यवहार करता येतात.
25.गोलातील
शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. 2 Marks
वेड मोल नतमस्तक सार्थक
उत्तर
:
वेड – मला देशप्रेमाचे वेड
लागले.
मोल – परीक्षेवेळी अभ्यासाचे मोल
समजते.
नतमस्तक – मी दररोज आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होतो.
सार्थक – मला हवे ते यश मिळाले माझ्या कष्टाचे सार्थक झाले.
26.
खालील प्रश्नांची उत्तरे पांच ते सहा वाक्यात लिहा.
शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी धाकटया भावाला पत्र लिहा. 3 Marks
उत्तर :
प्रेषक,
नाव –
शाळा –
मु.पो
पिनकोड
दि. –
चि. अमोल यास,
अनेक शुभाशीर्वाद
कालच दादाचे पत्र मिळाले.त्यातून तुझ्या परीक्षेचा निकाल
समजला.निकाल वाचून आश्चर्याचा धक्काच बसला.तुला सर्व विषयात चांगले गुण मिळाले पण
गणित व इंग्रजी विषयात तू नापासच झाला आहेस.
यावरून असे वाटते की, तू दररोज अभ्यास करत नाहीस.अरे पण शिक्षणाशिवाय
काहीच तरणोपाय नाही.तू जर अभ्यास केलास तरच तुला शिक्षणाचा फायदा होईल.आताच कष्ट
घेतले तर पुढे सुख तरी विचार कर आणि नियमित अभ्यास कर.
घरी ती.आई,काकू,बाबा यांना शि.सा.नमस्कार.
कळावे,
तुझा दादा,
प्रति,
पत्ता –
अमोल देशपांडे
शारदा निवास
निपाणी ता. निपाणी
पिन कोड – 591237
27. खालील चित्रातील व्यक्ती ओळखून त्यांच्या
बद्दल माहिती लिहा. 2 Marks
उत्तर :
चित्रातील व्यक्तीचे नाव आहे – छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती
शिवाजी महाराज एक मराठा योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.ते जगातील
काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान
देतात.शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे.शिवाजी
महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर
झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व आईचे नाव जिजाबाई होते.आई जिजाउनी शूरवीरांच्या,रामायण
महाभारतातील कथा सांगून त्यांच्यावर चांगले संस्कार केल.वयाच्या 15व्या वर्षी
रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली.आदिलशाही,मुघल
यांच्याशी अनेक लढाया करून आपलं स्वराज्याच स्वप्न साकार केलं.रयतेची काळजी घेऊन
रयतेला व जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी राजेना मानाचा मुजरा..
इतिहासाच्या
पानावर
रयतेच्या
मनावर
मातीच्या
कणावर
आणि
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य
करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती….
28. खालील प्रश्नांची उत्तरे सात ते आठ ओळीत लिहा –
हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक
आशा,
एक रंगी रंगू दे
अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे.
वरील ओळीचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर : वरील ओळी या प्रार्थनेच्या असून यामधून कवी माणसाने
माणसाशी माणसासारखे वागावे अशी देवाकडे विनंती व मागणी करत आहे.माणसाने धर्म,जाती,प्रांत,भाषा असा भेद न मानता सर्वांनी एक निष्ठेने व
एकात्मतेने आनदाने राहावे.असे झाल्यास माणसातील अशुद्धता कमी होऊन शुद्धतेचे
पांढरे शुभ्र चांदणे पसरेल असे कवीला वाटते.