अध्ययनांश – 10
सामाजिक आणि धार्मिक सुधारणा
अध्ययन निष्पत्ती 10- ब्रिटीश प्रशासनांच्या काळातील भारतामधील समाज सुधारकांची माहिती समजून घेतील.
समाज सुधारक
१.राजाराम मोहन रॉय
राजाराम मोहनरॉय यांचा सांप्रदायिक कुटूंबामध्ये जन्म झालेला असला तरी काही रुढी, परंपरा याबाबत त्यांनी प्रश्न निर्माण केले. महिलांच्या समान हक्कासाठी खूप परिश्रम घेतले. बालविवाह, बहूपत्नित्व, सतीपध्दत यासारख्या अनिष्ट प्रथेमूळे महिलांच्या शोषणाविरुध्द त्यानी प्रथम चळवळ सुरु केली. महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी राजाराम मोहनरॉय यांनी पाहिलेले स्वप्न अजून साकार झाले नाही हे विषादनिय आहे.
2.स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्मातील वाईट गोष्टीविरुध्द लढा दिला. 1893 मधील शिकागो येथील विश्वधर्म संमेलनात मानवता व सर्व, धर्म समानता याबल प्रतिपादन केले. मानवाची आध्यात्मिक दृष्टीवर कार्य केले. आपल्या गुरुंच्या नावाने रामकृष्ण मिशनची स्थापना केली. याच्या अंतर्गत शारदा मातेच्या नावाखाली महिला विभाग मिशनमध्ये कार्य करत होते. मानवी समुहाची सेवा, सौहार्दता आणि सुसंवाद निर्माण करणे हे रामकृष्ण मिशनचे उद्देश होते. अस्पृश्यता विरुध्दसुध्दा त्यांनी खूप कार्य केले.
3. स्वामी दयानंद सरस्वती
स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. अंधश्रध्देचा विरोध केला. मूर्तीपूजा नाकारली, स्त्रीयांना समान हक्क, गौरव मिळावा यासाठी त्यांनी चळवळी केल्या, मुलांच्या शिक्षणाला महत्व दिले सर्व धर्मातील तात्वीक आणि वैज्ञानिक बाबींचे विश्लेषणद्वारे सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ओम (ॐ) हे ईश्वराचे अत्युन्नत शक्ती आहे असे आर्य समाजाच्या माध्यमातून समजून सांगितले. समाजातील सर्व लोकांच्या प्रगतीसाठी आणि विश्वासाठी काम केले. योग आणि लेखन यासह आपल्या जीवनशैलीच्या माध्यमातून वैदिक धर्माचे सार लोकांपर्यंत पोहोचवले, ते चुकीचे म्हणता येणार नाही. वेदाच्या काळात वर्णाश्रम पद्धत अस्तित्वात नव्हती. ती पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.
4.जोतिबा फुले
महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील पूणे शहरामध्ये झाला. त्यांचे पूर्वज फुले विकत होते म्हणून त्यांचे आडनांव फूले होते त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे शिक्षणाचा प्रसार, शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्याने त्यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीबाईना प्रशिक्षण देवून शिक्षिका म्हणून नेमणूक केली. 1848 ते 1852 या कालावधीमध्ये त्यांनी अनेक शाळा स्थापन केल्या. सर्व लोक देवाचे पुत्र आहेत हे तत्व त्यांना खूप आवडले पूढे त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन करुन अस्पृश्यता, जातीपध्दत, बालविवाह, केशमुंडन, बालहत्यांकांड यांच्या विरुध्द जोरदार चळवळी सुरु करुन समाजामध्ये बदल (सुधारणा) करण्याचा प्रयत्न केला.
5) ईश्वरचंद्र विद्यासागर :
माणूस घडविण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आणि तो प्रत्येकाचा हक्क आहे असे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रतिपादन केले. भारतातील ते एक नवोदय, धर्म निरपेक्ष, मानवतावादी होते, या युगातील कोणत्याही साक्षर स्त्रीने अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्मरणामध्ये ठेवण्यासारखे धाडसी व्यक्तीमत्व म्हणजे विद्यासागर. विशेषतः आपल्या देशातील स्त्री मुक्तीसाठी कठोर परिश्रम घेणारी एक महान व्यक्ती होती, ‘विद्यासागर यांच्याकडून स्फूर्ती घेतलेली नाही अशी एकही व्यक्ती आपल्या देशात नाही’ असे गौरवोदगार स्वामी विवेकानंद यांनी विद्यासागर यांच्याबाबत काढले आहेत. त्यांनी आपली धार्मिक मनोभावना ही चळवळीपासून अलिप्त ठेवली. या भूमिमध्ये पहिल्यादांच मानवतावादी चळवळ ही शक्य होईल इतकी विज्ञान, इतिहास तसेंच तर्काच्या आधारे विकसित करण्याचा खूप प्रयत्न केला तसेच त्यांनी आधुनिक शिक्षणाचा पाया घातला.
6) पंडीत रमाबाई :
हिंदू समाजाचे पुरुषी वर्चस्व, ख्रिश्चन संस्थांचे पुरुषी वर्चस्व आणि वसाहतवादाच्या अधिकाराला रमाबाईंनी सातत्याने विरोध केला. हंटर कमिशनने भारतातील शिक्षणावर आपल्या मतात म्हटले आहे की, 99 टक्के भारतीय पुरुष हे खी शिक्षणाच्या विरोधात आहेत.’ त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या माध्यामातून जातीयवादाची भिंत मोडून काढून सावित्रीबाई फूले यांच्या सोबत शोषितांना शिक्षण देण्यासाठी कष्ट घेतले. अध्ययन पत्रक – 38
कृती क्रमांक 1: ब्रिटीश राजवटीत भारतीय समजासुधारकांनी स्थापन केलेल्या संस्थांची नावे आणि त्यांची प्रमुख तत्वे लिहून सुधारकांच्या सुधारणा लिहा.
संस्थेचे नाव – ब्राम्हो समाज
तत्वे | सुधारणा |
१.भारतीय समाजात चेतना निर्माण करणे. 2.समाजातील वाईट प्रथा नष्ट करणे. | १. 1829 साली सती प्रथा बंद केली. 2. विधवा पुनर्विवाह 3.इंग्रजी शिक्षणाचे प्रतिपादन केले. |
संस्थेचे नाव – आर्य समाज
स्थापना – स्वामी दयानंद सरस्वती
तत्वे | सुधारणा |
१. आदर्श समाज निर्माण करणे. 2. वेदांकडे परत नेणे. 3.शुद्धी चळवळ | १. आंतरजातीय,विधवा पुनर्विवाह 2. मूर्तीपूजा,अस्पृश्यता विरोध केला. 3.वेदांकडे परत चला. |
संस्थेचे नाव – रामकृष्ण मिशन
स्थापना – स्वामी विवेकानंद
तत्वे | सुधारणा |
१. मानवहित आणि निरंतर समाज सेवा करणे. 2. स्त्री उद्धार व राष्ट्र उद्धार | १. समाजातील दुर्बल लोकांची सेवा केली. 2. स्त्रियांचा उद्धार केला. 3.राष्ट्रीयतेचे पितामह |
संस्थेचे नाव – थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया
स्थापना – रशियन महिला मॅडम एच. पी. ब्लॅव्हटस्की आणि अमेरिकन कर्नल एच. एस ऑलकॉट
तत्वे | सुधारणा |
1. भेदरहित विश्वबंधुत्व वाढविणे.
2. धर्म तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या तुलनात्मक अभ्यासास प्रोत्साहन देणे.
3. निसर्ग व मानव यात असलेले अंतर्गत रहस्य, सुप्तशक्ती जाणून घेणे. | १.बालविवाहास विरोध केला. 2.अंधश्रद्धेविरुद्ध प्रचार केला. 3.होमरूल चळवळ चालू केली. ४. बनारस येथे सेन्ट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. |
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 18,19 उत्तरे
अध्ययन पत्रक 20 उत्तरे
अध्ययन पत्रक 21,22 उत्तरे
अध्ययन पत्रक 23,24 उत्तरे
अध्ययन पत्रक 25,26 उत्तरे
अध्ययन पत्रक 27,28
अध्ययन पत्रक 31,32,33,34,35 उत्तरे
अध्ययन पत्रक 36,37 उत्तरे
अध्ययन पत्रक 61,62
व्हिडीओच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक अपडेट्स साठी आमचे YouTube Channel सबस्क्राईब करायला विसरू नका
Subscribtion link
http://youtube.com/@smartguruji2022