About Annual Exam Class 5 & 8 in KARNATAKA (5वी वा 8वी च्या विद्यार्थ्यांची माहिती नोंद करणेबाबत)

मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या 5वी आणि 8वी विद्यार्थ्यांच्या वार्षिक मुल्यांकणाची पूर्वतयारी म्हणून 5वी आणि 8वी इयतांच्या विद्यार्थ्यांची माहिती SATS मध्ये अद्यावत करणेबाबत.







शासनाच्या आदेशात विषय व विवरण पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे.

विषय -: राज्य अभ्यासक्रमाचे अनुसरण करणाऱ्या सर्व सरकारी अनुदानित आणि अनुदानरहित शाळेतील 5वी आणि 8वी इयतांच्या विद्यार्थ्यांची माहिती SATS मध्ये अद्यावत करणेबाबत.

वरील विषय आणि संदर्भाबाबत,2022-23 या वर्षातील राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व शासकीय,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना त्यांची माहिती SATS मध्ये नोंद करणे आवश्यक आहे. शाळेच्या SATS मध्ये नोंद असलेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची परीक्षा होईल.म्हणून,राज्य अभ्यासक्रमाचा अवलंब करणाऱ्या सर्व सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 5 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवडलेले माध्यम, प्रथम भाषा,द्वितीय भाषा तसेच इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवडलेले माध्यम,प्रथम भाषा,द्वितीय भाषा व तृतीय भाषा आणि इतर माहिती SATS मध्ये उपलब्ध करून दिली आहे त्यांचे परिशीलन करून आवश्यक ती दुरुस्ती करावी.




 
SATS मध्ये नोंद केलेली माहिती अंतिम असेल आणि त्यामध्ये नोंद केलेल्या विद्यार्थ्यांचा केलेल्या विद्यार्थ्यांचाच परीक्षेसाठी विचार केला जाईल.तरी चालू वर्षात इयत्ता 5 वी आणि 8 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.त्यामुळे उपनिर्देशक (प्रशासकीय) आणि क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना इयत्ता 5वी आणि 8 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

5वी च्या विद्यार्थ्यांची पुढील माहिती तपासणे आवश्यक आहे.. 
निवडलेले माध्यम
प्रथम भाषा
द्वितीय भाषा व इतर माहिती
 
8वी च्या विद्यार्थ्यांची पुढील माहिती तपासणे आवश्यक आहे.. 
निवडलेले माध्यम
प्रथम भाषा
द्वितीय भाषा
तृतीय भाषा व इतर माहिती
 



अधिकृत आदेश खालीलप्रमाणे –

helpdesk%20(1)

WhatsApp%20Image%202022 12 18%20at%2011.20.22%20AM

 








Share with your best friend :)